मन अस्वस्थ अस्वस्थ होतं राव …
मन अस्वस्थ अस्वस्थ होतं राव … जवा दुकानतल्या बियाण्याला असतुया भाव अन पिकवीलेल्या पिकाचा घसरतो भाव तवा, मन अस्वस्थ अस्वस्थ होतं राव नका काढू राव त्या पावसाचे नाव त्याच्या अंगात आता नुसताच भरलाय बाव जवा उन्हाळयागत रक रक करतंय गाव असं गांव जवा डोळयानं बघवत नाय राव तवा, मन अस्वस्थ अस्वस्थ होतं राव पाऊस का पडना राव, ते कुणास तरी हाय का ठाव ? पावसाळा संपला तरी, त्याचा काई ठिकाणाच न्हाई राव तवा, मन अस्वस्थ अस्वस्थ होतं राव मला वाटलं त्यानं बी पक्ष बदलला की काय ? पडतोय तिकडंच पडतोय गावोगाव, अन, आमचं मात्र करतोय दुष्काळगाव … तवा, मन अस्वस्थ अस्वस्थ होतं राव ढगामंदी तवा इमाईन आलं होतं राव पैसं बी खर्चीले तवा, पर साधला नाही डाव तवा, मन अस्वस्थ अस्वस्थ होतं राव आता तरी पड की बाबा, जीव घेतो का काय ? तुला देईन म्या पैसं, ते आता खोटं व्हनार न्हाय मी पावसाला ईचारलं, तु असा कसा आगावैस राव त्यो मला मनला, आधी तू रोपटं लाव अन, मला ते झाड झालेलं दाव पुन्हयांदा म्हणू नको मला आता मन अस्वस्थ अस्वस्थ होतं राव मन अस्वस्...