'यशाला' शॉर्टकट नाहीच ! जीवनात यश मिळवण्यासाठी जो तो धडपड करत असतो, आपल्या जीवनाचं ध्येय गाठण्यासाठी, यशाची शिखरं गाठण्यासाठी प्रत्येकाला वेगवेगळी प्रगतीची मार्गं शोधून त्या माध्यमातून यश मिळवायचं असतं ते त्याला मिळतं सुधा. पण काही यश मिळवण्यासाठी एकाग्र बुध्दीमत्ता न वापरता, कष्ट न करता, आयतं मिळवं या अपेक्षेने कष्ट, मेहतन करत नाहीत व जीवनात नेहमी शॉर्टकटच्या शोधात असतात पण महापुरूष, संतांनी, साहित्यीकांनी एका ओळीत सांगितले आहे की, यश मिळवायचे असेल तर त्याला कष्टाशिवाय, मेहनतीशिवाय व एकाग्र बुध्दीमत्तेचा वापर करुन व्यवस्थापन केल्याशिवाय दुसरा तिसरा कोणताही पर्याय नाही. पण ते लोक ऐकायला मुळीच तयार होत नाहीत. शेवटी त्यांच्या पदरी राहतं ते अपयश. अशा निवडक लोकांच्या आयुष्यात त्यांना असं वाटतं की, आपल्या जीवनातील बदलासाठी एखादा चमत्कार घडावा व आपलं जीवनंच बदलून जावं, गरीबी ही प्रत्येकाच्या आयुष्यात असते. माणसांच्या गरजेनुसार प्रत्येकाची गरीबी ठरलेली असते. पण ती बदलणे आपल्या हातात आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती संगणक क्षेत्रातील गॉड फ ादर बिल गेटस म्हणतात, जर तुम्ही गरीब ...
Comments
Post a Comment