Posts

Showing posts with the label कविता

आठवण ...

आठवण ... आठवण आली की, आठवणींना उजाळा मिळतो, आठवणींच्या आठवणीत, माणूस खूप काही आठवतो, आठवून आठवून एकमेकांना, खूप आठवण येते, आठवणींच्या विश्वात, त्या आठवणींच्या स्वर्गात, आठवणींच्या समुद्रात, आठवणींच्या शोधात फक्त आणि फक्त त्या आठवणींसाठी आठवत आठवत तळाशी खोलवर जातो, त्यालाच आपण प्रेमाची आठवण म्हणतो.... - शंकर चव्हाण,  9921042422

मन अस्वस्थ होतंय राव

मन अस्वस्थ होतंय राव आज खुप अस्वस्थ वाटतंय राव,  का ? कुणास ठाऊक ?  पण गुदमरल्यासारखं होतंय राव !  जणू आता सगळंच संपलंय !  मेंदू बंद पडल्यागत वाटतंय राव,  का ? कुणास ठाऊक ?  पण जीवनात कुठंतरी काहीतरी  बिनसल्यागत वाटतंय राव ! मन पुन्हा अस्वस्थ होतंय राव ...  कुणाच्या कर्माचे खापर कुणाच्या माथ्यावर ? डोळयादेखत निष्पाप जातोय सरणावर.  ज्याला त्याला आपलाच जीव प्यारा ना मोर्चा, ना दिसेना कुठेच जयघोष नारा सर्वांचा विचार आता एकच संपणार आता सगळं डोळयादेखत मन पुन्हा अस्वस्थ होतंय राव ...   निसर्गाशी स्वार्थी खेळ मांडलास तू, जसं हवं तसंच केलंस तू,  निसर्गाच्या मना विरुद्ध सारचं चालवलंस तू, अन आता का रडतोस तु ?  पशु, पक्षी मागत होते जेंव्हा तुझ्याकडे  त्यांच्या जीवाची भिक, तेंव्हा नाही वागला त्यांच्यासोबत तू नीट  आता तरी बाबा एवढयातुन काहीतरी शिक! निसर्गाच्या विरुद्ध चालणार्‍या, तुझी रे कशाला आता किव तुझ्यामुळेच जाणार आता निष्पपांचे जीव मन पुन्हा अस्वस्थ होतंय राव.....

गुदमरलेला तो आवाज …

गुदमरलेला तो आवाज आवाज येत होता, आवाज येतच होता, आतलाच आवाज येत होता, तो सांगत होता, तो सांगतच होता, आवाज तो आतलाच होता आवाज तो आतलाच होता वाटलं खोटं सांगतोय तो, खोटं सांगतोय तो … पण तो थोडासा गुदमरलेला होता पण तो थोडासा गुदमरलेलाच होता … त्याला मदतीचा हात मिळत नव्हता, त्याला मदतीचा हात मिळतच नव्हता, जगणं सोपं असतं ? मरणं अवघड असतं ! मग दोन्ही वाक्यात तो फरकच काय ? मेल्यावर मिळते मदत हा देश कसला ? मेल्यावरच मिळते मदत हा देश माझा ! जीवंत पणाची किंमत शून्य मरणोत्तर भारतरत्न ? गादीसाठी रक्त सांडीले पैशांसाठी घरे फोडीले खरंच मी गुदमरलेला आवाज … खरंच मी गुदमरलेलाच आवाज … -     शंकर चव्हाण, अंबाजोगाई,  9921042422

फक्त तू ...

फक्त तू तू माझी मी तुझा अजबच नियम प्रेमाचा आठवणीत फक्त मी तुझ्या वाहून गेलो प्रेमात तुझ्या जग सारे पायास माझ्या संसार हृदयात तुझ्या साथी आहेस तू माझी प्राण आहेस तू माझी चुकलं कधी माफ कर स्वप्न तुझे तू साकार कर जगातलं आठवं आश्चर्य तू हृदयाचे ठोके आहेस तू प्रेमात सर्व काही माफ कर तू दुर्गुणांचा साफ आहेस तू दुर्गा, आहेस तू  जाणकार एकटाच होतो मी, दूर केलास तू अंधकार माझा आहेस जीव तू माझा श्वास तू माझं काळीज तू माझा विश्वास तू माझ्या शिवाय अर्ध तू माझा आहेस अर्थ तू तुझ्या विना मी शून्य  माझं विश्व आहेस तू प्रेम म्हणजे फक्त तू दिवस तू, रात्र तू तुझ्यामुळेच कवी झालोय मी पहिल्या भेटीचा क्षण आठवतोय मी अगं माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर अन तुझं माझ्यावर जीवन फक्त तू प्राण फक्त तू श्वास फक्त तू आवाज फक्त तू फक्त तू, फक्त तू बस फक्त तूच - शंकर चव्हाण, अंबाजोगाई,  ...

मन अस्वस्थ अस्वस्थ होतं राव …

मन अस्वस्थ अस्वस्थ होतं राव … जवा दुकानतल्या बियाण्याला असतुया भाव अन पिकवीलेल्या पिकाचा घसरतो भाव तवा, मन अस्वस्थ अस्वस्थ होतं राव नका काढू राव त्या पावसाचे नाव त्याच्या अंगात आता नुसताच भरलाय बाव जवा उन्हाळयागत रक रक करतंय गाव असं गांव जवा डोळयानं बघवत   नाय राव तवा, मन अस्वस्थ अस्वस्थ होतं राव पाऊस का पडना राव, ते कुणास तरी हाय का ठाव ? पावसाळा संपला तरी,   त्याचा काई ठिकाणाच न्हाई राव तवा, मन अस्वस्थ अस्वस्थ होतं राव मला वाटलं त्यानं बी पक्ष बदलला की काय ? पडतोय तिकडंच पडतोय गावोगाव, अन, आमचं मात्र करतोय दुष्काळगाव … तवा, मन अस्वस्थ अस्वस्थ होतं राव ढगामंदी तवा इमाईन आलं होतं राव पैसं बी खर्चीले तवा, पर साधला नाही डाव तवा, मन अस्वस्थ अस्वस्थ होतं राव आता तरी पड की बाबा,   जीव घेतो का काय ? तुला देईन म्या पैसं, ते आता खोटं व्हनार न्हाय मी पावसाला ईचारलं, तु असा कसा आगावैस राव त्यो मला मनला, आधी तू रोपटं लाव अन, मला ते झाड झालेलं दाव पुन्हयांदा म्हणू नको मला आता मन अस्वस्थ अस्वस्थ होतं राव मन अस्वस्...

साहेब ! मी शेतकरी बोलतोय …

Image
साहेब ! मी शेतकरी बोलतोय …   साहेब ! मी शेतकरी बोलतोय … रोज रोज शेतात राब राब राबतोय कितीही मेहनत घेतली तरी पोटाला आर्धीच खातोय वाटलं होतं ऐकेल कोणी माझी हाक होईल कोणी माझ्या आयुष्याच्या प्रगतीचं चाक पण मला आजवर सगळयांनी दिला ठेंग्याचा हात माझ्याविषयी सगळयांच्या मनात पापच पाप पोटभर खाऊन ढेकर देता तुम्ही शिळया तुकडयावरच दिवस काढतो आम्ही असाच संसाराचा गाढा हजारो वर्षे ओढतोय साहेब ! मी शेतकरी बोलतोय … दुष्काळ आला, त्याला पाहुणा समजुन पाहुणचार केला सावकार आला, त्याचाही खिसा भरता केला अजुनही बँकाची कर्ज फेडतोय साहेब ! मी शेतकरी बोलतोय … एसीत बसुन आमच्यासाठी संघर्षाचं नका घेऊ सोंग संघर्ष तर आम्ही करतोय, नका करु तुम्ही नुसतंच ढोंग दुपारचा सुर्य डोक्यावर घ्या मग कळेल तुम्हाला आम्ही कसे कष्ट करतोय साहेब ! मी शेतकरी बोलतोय … मंत्रालयात बसुन फक्तं बोलनं असतं लई सोप्पं कितीही खोटी आश्वासनं दिले तरीही आम्ही आजवर गप्पं आम्ही काय गुन्हा केला तुमच्याकडं नाही पैका आमच्यासाठी एकतरी आयोग लागू करा, एवढं तुम्ही ऐका पोराच्या शिक्षणापाई आज सुध्दा मी...