Posts

Showing posts with the label यशोगाथा

ऑटोमेशन इंजिनियर बालाजी शेषेराव चव्हाण या तरुणाचा "नांदगाव ते जर्मनी" संघर्षमय प्रवास

Image
  नांदगाव हे अंबाजोगाई तालुक्यातलं छोटसं खेडंगाव, खरं पाहिलं तर या तरुणाची ही एक विलक्षण यशोगाथा आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण ऑटोमेशन इंजिनियर बालाजी शेषेराव चव्हाण या तरुणाचा प्रवास संघर्षमय आहेच तेवढा. जीवनाच्या वाटेवर समस्यांचा सामना करत कठीण परिस्थितीवर मात करुन यशाचं शिखर गाठून त्यानं यशाला गवसणी घातली आहे. कारण केल्याने होत आहे रे आधि केलेची पाहिजे असं ब्रीदवाक्य आहे. यश मिळवण्यासाठी कसल्याही प्रकारचा शॉर्टकट पर्याय नसतो याचं ज्ञान बालाजी या तरुण अभियंत्याला ज्ञात होतं. त्यामुळं अगदी लहानपणापासूनच त्याची चिकाटी व जिद्दी स्वभाव असल्यामुळं एखादं काम हाती घेतलं की तो ते काम पूर्ण केल्याशिवाय शांत बसत नसे. कष्ट हेच भांडवल असतं या तत्वाला धरुन आयुष्यात पुढं वाटचाल करावी लागते याचं भान बालाजी या तरुणाला होतं. विदेशात जाण्याचं स्वप्न प्रत्येक तरुण तरुणींचं असतं पण ते स्वप्न साकार करण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते. तेव्हा कुठं ते स्वप्न प्रत्यक्षात साकार होतं, ते बालाजीनं आज पूर्ण केलं आहे याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे व तेवढाच त्यानं मिळविलेल्या या यशाबद्दल त...

अंबाजोगाईचा सांस्कृतिक वारसा जपणारे कलावंत, सोशलमिडीयावर नेटकर्‍यांना मिळतोय सदाबहार गाण्यांचा अस्वाद

Image
अंबाजोगाईचा सांस्कृतिक वारसा जपणारे कलावंत सोशलमिडीयावर नेटकर्‍यांना मिळतोय सदाबहार गाण्यांचा अस्वाद   अंबाजोगाईचा इतिहास पाहिला तर अंबाजोगाईचा इतिहास प्रचंड मोठा आहे. अंबाजोगाईने अनेक कलावंत घडवले आहेत. अंबाजोगाईने महाराष्ट्राला अनेक कलावंत दिले आहेत. अंबाजोगाई शैक्षणिक व सांस्कृतिक राजधानी तर आहेच शिवाय अंबाजोगाई कलावंतांची खान आहे असं म्हटलं तर वावगं ठरु नये. अंबाजोगाईच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारे कलावंत अंबाजोगाईच्या खानीत नव्याने तयार होत आहेत व झालेही आहेत. तरुण पिढी ही संगीत क्षेत्राकडे वळतेय हे पाहून आपल्या भुवया नक्कीच उंचावतील व ही बाब अभिमानाची व कौतुकाची आहेच. विविध क्षेत्रातील आपापल्या जबाबदार्‍या पार पाडून हे सर्व कलावंत संगीत क्षेत्रातही आपला ठसा नव्या जोमानं उमटवत आहेत. ही अंबाजोगाईकरांसाठी अभिमानाची बाब आहे. काही कलावंतांनी संगीत क्षेत्रात स्वतःला इतके वाहून घेतले आहे की, आता गाणंच त्यांचा श्वास बनला आहे. संगीत क्षेत्रातही अनेक कलावंत विविध कलागुणांनी समृध्द असल्याने त्यांचे अनेक पैलू पहावयास मिळतात. आपल्या सर्वांना वरदान ठरत असेलेली सोशल मिडीया जसं एक...

आय.टी. इंजिनिअर ते यशस्वी उद्योजक ओमकार वायकर, तरुणांसाठी प्रेरणादायी व्यक्तीमत्व; नोकरी सोडून फ्लॉवर डेकोरेटर्सचे बनले मालक

Image
आय.टी. इंजिनिअर ते यशस्वी उद्योजक ओमकार वायकर तरुणांसाठी प्रेरणादायी व्यक्तीमत्व; नोकरी सोडून फ्लॉवर डेकोरेटर्सचे बनले मालक क्षेत्र कोणतंही असो तिथं स्पर्धा आहेच, स्पर्धेमध्ये टिकूण रहायचं म्हटलं तर तेवढं बळ, सामर्थ्य आपल्यामध्ये असलं पाहिजे. ते सामर्थ्य आपल्यामध्ये आहे असं जेव्हा ज्यांना कळतं ते स्पर्धेत टिकून राहतात आणि जिंकतातही. असंच एक उदाहरण म्हणजे ओमकार वायकर या अवलियाचं. म्हणतात ना कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है, तसंच काहीसं करुन ओमकार यांनी एक आगळावेगळा आदर्श तरुणांसमोर ठेवला आहे. त्यांच्या या अनुभवातून बरंच काही शिकण्यासारखं तर आहेच शिवाय आय.टी क्षेत्रात काम करणार्‍यांसाठी हे एक उत्तम प्रेरणेचा स्त्रोत ठरु शकतो. कारण असं एवढया लहान वयात असं पहिल्यांदाच झालंय असं म्हटलं तर वावगं ठरु नये. गाव नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथील ओमकार विश्वास  वायकर हे नाव मुंबई नगरीमध्ये एका आयटी कंपनीत नोकरीला लागलं. त्यांनी नोकरी अगदी काही वर्षे म्हणजे अडीच वर्षे केली. नोकरी करतांना त्यांची काही तरी स्वत:चं करण्याची उर्मी त्यांना शांत बसू देत नव्हती. त्यांना सतत वाटायचं...

आदर्श पत्रकार वसंत मुंडे यांची यशोगाथा

Image
आदर्श पत्रकार वसंत मुंडे यांची यशोगाथा लोकशाहीचा चौथा आधार स्तंभ असणाऱ्या पत्रकारीता क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणारे वसंत मुंडे समाजासमोर एक आदर्श पत्रकार म्हणून उभे आहेत . सामाजिक जाणीव असणारे पत्रकार वसंत मुंडे यांची यशोगाथा म्हणजेच त्यांच्या पत्रकारीता क्षेत्रातील खडतर प्रवास व त्यांचा भला अनुभव होय . पत्रकार वसंत मुंडे यांचे पूर्ण नाव वसंत माधवराव मुंडे असे आहे . लाडझरी ( तालुका परळी ) येथे त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाले . माध्यमिक शिक्षण घाटनांदूर ता . अंबाजोगाई या गावी पूर्ण केले . बी . ए . बी . जे . ( बॅचलर ऑफ जर्नालिझम ) डॉ . बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद या विद्यापीठातून येथे पूर्ण झाले .  स . न . 2003 पासून दैनिक लोकसत्ताचे बीड जिल्हा प्रतिनिधी म्हणून ते कार्यरत आहेत . त्यापूर्वी महाविद्यालयीन शिक्षण घेत असतांनाच दैनिक मराठवाडा साथी व दैनिक लोकपत्र या दैनिकांसाठी बातमीदार म्हणून काम करण्याची त्यांना संधी मिळाली होती . हा त्यांचा अल्पसा ...