Posts

Showing posts with the label प्रासंगिक

एक व्हिडीओ कॉल आणि बँक खाते रिकामे झाल्यावर व्हाल बेहाल …

Image
एक व्हिडीओ कॉल आणि बँक खाते रिकामे झाल्यावर व्हाल बेहाल … दिवसेंदिवस सायबर गुन्हेगारी मोठया प्रमाणत वाढत आहे. सायबर सेलच्या आवाक्याबाहेर सायबर गुन्हेगारी जाईल की काय अशी भिती वाटत आहे. जसं आयटी क्षेत्रात दररोज विविध शोध लागत आहेत व आयटी क्षेत्रामुळे मानवाच्या दैनंदिन जीवनात क्रांती झाली तसंच सायबर गुन्हेगारी क्षेत्रातही आयटी क्षेत्राप्रमाणेच नवनवीन तंत्राज्ञानाचा वापर करुन जणू सायबर गुन्हेगारी प्रगतीपथावरच आहे असं वाटत आहे. सायबर गुन्हेगारांनी मात्र नेहमीच अटकेपार झेंडे लावून सर्वसामान्यांची आर्थिक लूट आजवर केली आहे. कधी बँक खाते रिकामे करतात, तर कधी फोन करुन एटीएम क्रमांक मागून ओटीपीद्वारे बँक खात्यामधील पैसे गायब करतात, तर कधी क्रेटीड कार्डवरुन शॉपींग करतात, तर कधी मॉलध्ये जाऊन डेबीड कार्डवरुन शॉपींग करतात, तर कधी युपीआय ॲपच्यामाध्यमातून कोड स्कॅनर पाठवून आर्थिक लुट करतात, तर कधी गुगल पे, फोन पे किंवा इतर वॉलेटवर रिक्वेस्ट पाठवून डल्ला मारतांनाचे प्रकार आपण नेहमीच पाहिले आहेत. आता हे सर्व चोरीचे प्रकार आपण आपल्या दैनंदिन जीवनशैली मध्ये ॲडजस्ट केले आहे आणि आपण दुसरं करु तरी काय शकतो...

बलात्कारांचा कहरच कहर ...

Image
आज दोन घटना समोर आल्या, एक मुंबईत बलात्कार झाला आणि दुसरीकडे पुण्यात अल्पवयीन मुलीवर दोन बलात्काराच्या घटना घडल्या या बालात्काराच्या घटना अतिशय भयंकर होत्या. सदर घटना माणुसकीला काळीमा फ ासणार्‍या आहेत. अमानुषपणे केले जाणारे अत्याचार दिवसेंदिवस वाढतच आहेत. पुण्यामध्ये एका 14 वर्षीय मुलीवर अत्याचार केले या घटनेचा विसर पडला नाही तोवरच दुसरी बलात्काराची धक्कादायक घटना घडते. हे किती दुर्देव आहे. नराधमांनी सहा वर्षाच्य चिमुकलीवर सामुहिक अत्याचार केल्याची घटना पुण्यामध्ये घडली. पुण्यात रेल्वे स्टेशनच्या फुटपाथवर झोपलेल्या आईच्या कुशीतून उचलून नेवून तिच्यावर सामुहीक अत्याचार झाला. मुंबईमध्ये तर याहीपेक्षा विचित्र व धक्कादायक प्रकार घडला. ही अतिशय निंदनीय घटना आहे. एका तीस वर्षीय पीडीतेवर बलात्कार करुन तिच्या गुप्तांगामध्ये रॉड घुसवला. र्‍ह्दय पिळवटून टाकणारी अशी ही घटना साकीनाका परिसर मुंबई याठिकाणी घडली. राज्यात महिला तर सुरक्षित नाहीतच. बलात्कारांच्या वाढत्या घटनांमुळे राज्यात व देशात वासनांध व व्यसनांध झालेल्या नाराधमांकडून बलात्काांच्या अपराधाचे सत्र  कमी होतांना दिसून येत नाही. माणुसक...

वाचकांच्या शोधात ...

Image
भारताच्या इतिहासातील एक महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे संपूर्ण देश डिजीटल झाला. आता माहितीची देवाणघेवाण करणं अगदी काही सेकंदामध्ये पूर्ण होत असल्याने ही मोठी अभिमानाची गोष्ट आपल्या सर्वांसाठी आहे. दिवसेंदिवस तंत्रज्ञानामध्ये मोठया प्रमाणात अमुलाग्र बदल होतांना दिसत आहे. विज्ञानाची कास धरुन डिजीटल क्षेत्रात मोठी क्रांती झाली. सकाळी झोपेतून उठल्या उठल्या पूर्वीपासूनच चहासोबत वर्तमानपत्र वाचण्याची चांगली सवय भारतीयांना आहे. सकाळी वर्तमानपत्र वाचणे हा दिनक्रम आजही अनेकांचा आहे. परंतू हातामध्ये स्मार्टफोन आल्यामुळे आजच्या पिढीला वाचण्याची आवड व सवड या दोन्ही गोष्टींचा लोप पावल्याचे अभ्यासातून समोर आले आहे. फक्त दृक-श्राव्य माध्यमांचा अधिक वापर होऊ लागल्यामुळे वाचनाची सवय मोडली आहे. पुस्तकं माणसाला हुशार बनवतात. वाचन केल्यामुळे आपल्या ज्ञानात भर पडते व वाचन केलेली व्यक्ती ही विचारांनी श्रेष्ठ असते. वाचाल तरच वाचाल, पुस्तकांमुळं माणसाचं मस्तक सशक्त होतं आणि सशक्त झालेलं मस्तक कधीही कोणासमोर नतमस्तक होत नसतं असं म्हणतात. पण तरुणाई व्हीडीओ रिलच्या नादी लागल्याने त्यांचा व वाचनाचा संपर्क कायमचा तुटला आ...

जरा जपूनच बरं; ऑनलाईन फसवणुकीचा कहर ...

Image
जरा जपूनच बरं; ऑनलाईन फसवणुकीचा कहर ... बंधूंनो आणि भगिनींनो, तुमच्या हातात स्मार्टफोन मोबाईल आहे. त्यामुळं अगदी स्मार्ट पध्दतीनं तुम्हाला ऑनलाईनच्या माध्यमातून फसवणुक करुन अगदी सहजच गंडवलं जावू शकतं. तुमचं आर्थिक नुकसान होऊ शकतं. जरा जपूनच बरं. लॉकडाऊन काळात गेल्या अनेक महिन्यांपासून सायबर गुन्हयांमध्ये मोठया प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळं देशातील अनेकांचे आर्थिक नुकसान होऊन त्यांच्या सोबत ऑनलाईन माध्यमाद्वारे म्हणजेच मोबाईल, सोशल मिडीयाच्या माध्यमातून फसवणुक झाली आहे. अनेकांना लाखोंचा गंडा बसला आहे. त्यामुळे यापासून तुम्हाला स्वत:चा बचाव करायचा आहे. प्रथमत: कोणत्याही प्रकारचा अनोळखी फोन कॉल आला व त्यांनी सांगितलं की, मी बँकेतू बोलतोय. असं म्हटल्याबरोबर तो खरंच बँकेतूनच बोलतोय का ? याची खातरजमा करा, त्यांनी केलेला फोन क्रमांक हा खरंच बँकेचाच आहे. का ? बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तुम्ही त्याचा शोध घ्या व खात्री करा किंवा त्या फसव्या असणाऱ्या फोन कॉलवर कोणी निर्बंध घालावा म्हणून संबंधीत कंपनीकडे रिपोर्ट तर केला नाही याचीही खात्री करा. हे झालं एक. आता दुसरं. हल...

घोटाळ्यांचा देश …

घोटाळ्यांचा देश … भारत देश हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो, याच कृषीप्रधान देशाची ओळख आता घोटाळ्यांचा देश म्हणून होत आहे. त्याचं असंय की, या देशात सर्वात जास्त प्रमाणात घोटाळे हे राजकीय क्षेत्राशी निगडीत आहेत. भारत देशाची अर्थव्यवस्था ही शेतीपासून सुरु होते व राजकीय वर्तुळात गोल गोल फिरु लागते. असंच समीकरण या देशात गेल्या सत्तरहून अधिक वर्षांपासून घडत आहे. या देशातील सुजाण जनता चुकीच्या व्यक्तींना लोकप्रतिनिधी म्हणून निवडून देतो. तसेच या देशात घरणेशाहीचे राजकारण मोठया प्रमाणात आहे. याच घराणेशाहीच्या राजकारणामुळे गरीब श्रीमंतीच्या मधले अंतर हे जास्त वाढत चालले आहे. इथं प्रत्येकाला राजकारणात नाव नाही तर बक्कळ पैसा व गडगंज संपत्ती कमावण्यासाठी यायचं असतं. राजकारणाचा दुसरा अर्थच जणू घोटाळा. समाजकारणाच्या नावाखाली लागलेला हा कलंकच म्हणावा लागेल. पैशांशिवाय निवडणुका जिंकताच येत नाहीत. हे वाक्य इथल्या प्रत्येक राजकारण्यांच्या डोक्यात फिट्ट बसलेलं व दृढ झालेलं आहे. घराणेशाहीच्या राजकारणामुळे पैसा दुपटी तिपटीने याच घरात वाढतो, त्यानंतर हळूहळू घोटाळयात सामील असलेले कार्यकर्ते यांची घर...

एवढ्यात हार मानू नका; देश पुन्हा नव्यानं उभा करु ! एकमेकांना मदत करा, आपली माणसं ओळखायला शिका; नाहीतर भविष्यात मागाल भिका !

एवढ्यात हार मानू नका; देश पुन्हा नव्यानं उभा करु ! एकमेकांना मदत करा, आपली माणसं ओळखायला शिका; नाहीतर भविष्यात मागाल भिका ! देशाची लोकसंख्या पाहता देशात गरीबीचे सावट आहेच, शिवाय दिवसेंदिवस गोरगरीब, मध्यमवर्गीय नेहमीच कोणात्या ना कोणात्या संकटाशी सामना करत असतो, त्यांचा संघर्षही तेवढाच. गेल्या महिनाभरा पासून कोरोनामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. अनेकांचे भूकबळी गेले आहेत. यावर मात करत प्रत्येकजण येईल तो दिवस कसाबसा पुढे ढकलून उद्याचा दिवस नक्कीच सखुदायक होईल अशी आशा ठेवून जगत आहे. शासन देशापातळीवर, राज्यपातळीवर जिल्हा पातळीवर, तालुकापातळीवर व गावपातळीवर कोणीही उपाशी राहू नये याासठी विविध उपाययोजना करत आहे. अन्नधान्य पुरवठा करत आहे. शिवाय दानशुर व्यक्ती, विविध सामाजिक, सेवाभावी संस्था, वैयक्तिक, व्यापारी व इतर निस्वार्थपणे गोरगरीबांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करत आहेत. गेल्या महिनाभरापासून देशातील जनतेनं देशासाठी दिलेलं   योगदान खरंच खूप मोठं आहे. जनतेनं पुकारलेल्या एक दिवसीय बंद मुळे देशातील लॉकडाउन आजपर्यंत यशस्वी झाले व होत आहे. भाविष्यात रुग्णांची संख्या न...

चायना वाल्यांनी एवढी ‘जिरवली’, तरीबी टिकटॉकवर चालूय ‘ढंगाळांग मचाळांग’

चायना   वाल्यांनी एवढी ‘जिरवली’,  तरीबी टिकटॉकवर चा लूय ‘ढंगाळांग मचाळांग’ असे शब्द, अशी भाषा लेखकांकडून अनपेक्षितच. किमान वाचनात अशुध्द भाषा म्हटलं की, जरा ऑड  वाटणारंच, पण काय करु. काहीजण सुधरायला तयारच नाहीत. ढंगाळांग मचाळांग म्हटलं की, थोडसं हसू आलंच असेल, वरचा मथळा वाचून थोडासा विनोद वाटलाच असेल आणि तुम्हाला थोडसं खुदकन हसायला सुध्दा आलंच अ सेल. आजचा  विषय जेवढा विनोदानं घ्यावा तेवढाच गांभिर्यानं सुध्दा. मुद्दामहुन अ सा मथळा लिहिला आहे. कारण त्याचं गांभिर्य आपल्या सर्वांना लक्षात यायला हवं. टिकटॉ कवरील नाच म्हणजेच ‘ढंगाळांग मचाळांग’. हा शब्द मराठवड्यात ओळखीचा शब्द आहे.   कोणत्याही गोष्टीला मर्यादा असतात, माणूस म्हणून आपल्याला पिढ्यान-पिढ्या काही संस्कार घालून दिलेले आहेत. टिकटॉक बनवणाऱ्यांचं वाढतं प्रमाण पाहून व त्या माध्यमातून नव्या पिढीला जो संदेश जातोय हे पाहून भविष्यात काय बरं परिणाम होतील याचे जरा जास्तच भय वाटत आहे. नौटंकी करणारे करत बसतील पण बालबुध्दीवर होणाऱ्या विपरीत परिणामाचे जास्त दु:ख वाटते. अश्लिल हावभाव, अश्लिल संवाद याम...

माकडांच्या हातात मोबाईलचं खोकडं …

Image
माकडांच्या हातात मोबाईलचं खोकडं … तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल ! आता हे काय नवीन. पण तुम्ही जे वाचताय ना, ते खरंच आहे. जर माकडांच्या हातात मोबाईल दिला, तर ते माकड, त्या मोबाईलचं काय करेल ?  हे तुम्हाला सांगण्याची मुळीच गरज नाही. कारण माकड हा प्राणी. त्यामुळे मोबाईल चालवायचा कसा, याचे ज्ञान त्यास नसल्यामुळे तो त्या मोबाईलचे काहीही करेल, त्याला हवं तसं करेल. तसंच जगामध्ये सर्वत्र कोरोना व्हायरसने थैमान घातले असतांना. प्रत्येकजण आपला जीव वाचण्यासाठी प्रयत्न करतोय.  त्यात भर म्हणून अशीच काही माकडं आपल्या समाजामध्ये आहेत. जे समाजाची दिशाभूल करण्यासाठी सज्ज असून याच मोबाईलच्या खोकडयाचा वापर वाईट पध्दतीने करत आहेत. देशात काय परिस्थिती आहे. याचं गांभिर्य व भान असल्याचं या माकडांना मुळीच दिसून येत नाही. परिस्थितीचं गांभिर्य लक्षात आलं असंत तर यांनी असं केलं नसतं मुळीच. जीवावर बेतण्याची परिस्थीती निर्माण झाली असतांना व्हॉटसॲप, टिकटॉक, फेसबुक, इन्सटाग्राम, टेलीग्राम व इतर सोशल मिडयाचा वापर करुन काहीजण अफवा पसरवणे, चुकीच्या माहितीचा प्रसार व प्रचार करणे, एखादा संदेश समाजामध्ये ते...

जीवंत रहायचे असेल तर घरातच बसा; दीड जीबी वाल्यांनो उगाच वळवळ करु नका

Image
जीवंत रहायचे असेल तर घरातच बसा; दीड जीबी वाल्यांनो उगाच वळवळ करु नका. आपल्या देशातील नेटकर्‍यांनी कोरोना वर विनोद करण्याची हद्दच पार केली आहे. जणू काही यांच्या एकट्यावरच हे जागतिक संकट आलं आहे. यांच्या डोक्यात अजूनही विनोदाचे फवारे सोशल मिडीयावर सुरूच आहेत. कोरोना या व्हायरसमुळे जगामध्ये कित्येकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. मात्र भारतामध्ये अजूनही या गंभीर व्हायरसला गांभिर्याने घ्यायला नेटकरी मुळीच तयार नाहीत. काही दीडशहाण्या दीडजीबी वाल्यांमुळे अफूची गोळी असलेल्या सोशल मिडीयावर बावळटांकडून उगाच नको त्या गोष्टींचा बाऊ होतांना दिसत आहे. यांनी कोरोना या व्हारसची गांभिर्याने दखल जर घेतली नाही तर येणार्‍या काळात शासनाला नक्कीच ठोस पावलं उचलावी लागतील. संचार बंदीच्या काळात नियमाचं पालन न करणे, उगाच घराबाहेर फेरफटका मारणे, विनाकरण गाड्या घराबाहेर नेउन मला कहीच होत नाही असा डायलॉग मारणे, अशा प्रकारचे विविध चाळे हे दीडशहाणी मंडळी करातंना दिसत आहे. माकडांच्या हातातल्या खोकड्यात दीड जीबी भरल्यामुळे हे अतिउत्साही माकडं उगाच वळवळ करतांना सोशल मिडीयावर पहावयास मिळत आहेत. शासन स्तरावर बे...

हे आयुष्य पुन्हा पुन्हा नाहीच ...

Image
हे आयुष्य पुन्हा पुन्हा नाहीच ... संपूर्ण जगामध्ये कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे, हा व्हायरस आला कसा यावर चर्चा करण्यापेक्षा, आता प्रत्येकाला आपला जीव वाचवण्याची भ्रांत पडली आहे. या रोगाची सुरूवात चीन देशात झाली. वुहान शहरामध्ये या रोगाची सुरूवात झाली असून यामध्ये अनेकजण मृत्यूमुखी पडले. तसा तसा याचा प्रसार संपूर्ण जगामध्ये वार्‍याच्या वेगाप्रमाणे पसरतोय व अनेकांचे जीव घेतोय. जीव गेलेल्या व्यक्तीचा देह सुध्दा पाहणं, त्यावर अंत्यसंस्कार करणं याचं सुध्दा भाग्य त्या परिवाराला मिळत नाही. याचं कारण म्हणजे हा रोग संसर्गजन्य आहे. या महामारीमुळे संपुर्ण जगामध्ये कडेकोट बंद पाळण्यात येतोय. प्रत्येक देशामध्ये किडयामुंग्यांसारखे लोक मरत असल्यामुळे आपापल्या स्तरावर रुग्णांची काळजी घेतली जात आहे. प्रशासन आपापल्या स्तरावर नागरीकांची काळजी घेण्यासाठी पुढाकार घेवून देशवासीयांच्या आरोग्याची काळजी घेत आहे व मिडीया व सोशल मिडीयाच्या माध्यमातून जनजागृती करण्याचे काम करत आहे. जेणे करुन मृत्यूदर कमी व्हावा. त्याप्रमाणे नैतिक जबाबदारी म्हणून आपणही आपापल्या पातळीवर प्रशासनाला सहकार्य करणे कर्तव्य ...

पीडीएफ मुळं वृत्तपत्रांवर वाईट वेळ ?

Image
पीडीएफ मुळं वृत्तपत्रांवर वाईट वेळ ? धक्काच बसला ना ? होय खरंच  असं नक्कीच झालं आहे. आता तुम्ही म्हणाल ही पीडीएफ  म्हणजे काय भानगड आहे ? होय तर, एखाद्या समस्येचं निराकरण होत नसेल तर त्याच्या मुळाशी जायला नको ? गेलंच पाहिजे ! नाही तर आपल्या बाबतीत नेमकं काय ? कुठे ? केव्हा ? कसं ? आणि का ? घडलं हे नक्की कळलंच नसतं ! हा तर   पत्रकारीतेचा नियमच आहेे. हल्ली एक पीडीएफ  नावाचं तंत्रज्ञान विकसीत झाल्यामुळं वृत्तपत्र आपल्या अगदी खिशातच येउन पोहचले आहे. म्हणजे स्मार्ट पध्दतीने स्मार्ट फोनमध्ये. कारण पीडीएफ  म्हणजे पोर्टेबल डॉक्युमेंट फॉरमॅट असं त्याचं विश्लेषन रुप व पीडीएफ  PDF हे त्याचं सक्षीप्त रुप आहे. आता तुम्ही म्हणाल या तंत्राज्ञानाचा आणि वृत्तपत्राचा काय संबंध ? होय नक्कीच आहे तर संबंध. त्याचं असं आहे की, हल्ली सोशल मिडीयावर व्हॉट्ट्सअ‍ॅप नावाचं एक अ‍ॅप आहे. अ‍ॅप म्हणजे एक प्रोग्राम. याच्या माध्यमातून आपण वृत्तपत्र तयार केल्यानंतर संपूर्ण वृत्तपत्राची एक  फाईल पीडीएफ  स्वरुपात वाचकांना पाठवू शकतो. म्हणजे प्रिंट व्हर्जन वेगळे आणि पीडीएफ ह...

पोरगं हाटेलात तुपाशी, अन् मायबाप रानात उपाशी ! ...

पोरगं हाटेलात तुपाशी,  अन् मायबाप रानात उपाशी ! ... पोटाची खळगी भरण्यासाठी बाप शेतात राब राब राबतोय, कृषीप्रधान देशात शेतकरी अर्ध्या पोटावर, आनवाणी पायानं     चालतोय, का ? तर, आपल्या मुलांनी शिकावं, खुप मोठं व्हावं म्हणून. पण देश जसाजसा महासत्ता होत आहे ? तसं तसं देशतील परिस्थिती मात्र   हाताबाहेर जातांना दिसत आहे. आई वडील आपल्या पाल्याला शिक्षणासाठी वाटेल तेवढे पैसे पुरवठा करतात, वाटेल तशी हौस करतात, लाड करतात, कसल्याही प्रकारची कमतरता भासू देत नाहीत, का? तर आपला मुलगा-मुलगी शिकावी, मोठा अधिकारी व्हावेत व आपल्या घरची परिस्थीतीमध्ये बदल करावा. गरीबी दुर करावी, आई वडीलांची हालाखीची परिस्थिती बदलून टाकावी. शेतकर्‍यांशिवाय इतर पालकांचीही या पिढीनं हीच अवस्था करुन ठेवली आहे आणि त्यात भर म्हणजे सेन्सॉर बोर्डच्या कृपाशिर्वादामुळे अख्खा देश बरबाद करुन ठेवला आहे. तो कसा ? देशात काय प्रकाशित व्हावं व काय होऊ नये यासाठी काही बंधनं असावेत, देशात ब्रॉडकास्टींग व्यवस्था, मिडीया यांनी काय प्रसार करावा व काय करु नये यासाठी परवानाग्या देण्याचं काम सेन्सार बोर्ड व ब्रॉडका...

चालक, वाहक व प्रवाशांसाठी थोडसं !

Image
चालक, वाहक व प्रवाशांसाठी थोडसं ! महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ यांच्याविषयी काही समारात्मक व नकारात्मक गोष्टींचा आढावा आपण आज या संपूर्ण लेखामध्ये पाहणार आहोत. सोबतच चालक वाहक व प्रवाशांबाबतही थोडसं परखड भाष्य या ठिकाणी होणार असल्यामुळे काय अपेक्षीत बदल परिवहन मंडळाकडून व चालक वाहक व प्रवाशांकडून अपेक्षीत आहेत, त्याबाबत लोकभावनेची जोड प्रत्येकाच्या भावनेशी कशी जोडता येईल याबाबत आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. महाराष्ट्र राज्य हे भावनिक माणणांची खान व सकारात्मक विचारांच्या हिऱ्यांची खान असेलेले राज्य म्हटले तर वावगे ठरु नये. कारण इथें माणूस सकारात्मकच विचार करणारा व वागणारा नक्कीच सापडेल. सर्वसामान्यांपासून ते असामान्यांपर्यंतचा माणूस हा बसने प्रवास नक्कीच करतो. प्रवास ही प्रत्येकाच्या आयुष्यातील निरंतर पक्रिया असल्यामुळे प्रत्येकाला याची गरज नक्कीच भासते. आपण आता मुळ मुद्याचं बोलूया ! महत्वाचं म्हणजे स्वत:चा व्यक्तीमत्व विकास जर साधायचा असेल तर नम्रता हे मूल्य प्रत्येकाच्या अंगी असणं फार महत्वाचं असतं. चालक, वाहक व प्रवाशी या  बाजूशिवाय परिवहन मंडळाचं ध्येय पूर्ती होवू शकत नाह...

तरुणाईचा संघर्ष

तरुणाईचा संघर्ष आयुष्यामध्ये तीन गोष्टींसाठी संघर्ष करावा लागतो. जगण्यासाठी, स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी व ओळख टिकवण्यासाठी. पण हे सर्व होण्याआधी काहीतरी उदरनिर्वाह करण्याचे साधन असणे अत्यंत गरजेचे असते. जेणेकरुन हया तीन गोष्टींचा संघर्ष पूर्ण होऊ शकेल. ते म्हणजे नोकरी, व्यवसाय किंवा इतर अन्य माध्यम तरुणांकडे असायला हवे. ‍नोकरी मिळवण्यासाठी ती करण्यासाठी व टिकवण्यासाठी, आज देशामध्ये तरुणाईला अत्यंत तारेवरची कसरतच करावी लागत आहे, तिथं मग शासकीय असो किंवा खाजगी. अतिशय हालाखीच्या स्थितीमधून जावून संघर्ष करावा लागत आहे. लोकसेवा आयोग राज्यपातळीवर व देशपाळीवर स्पर्धा परिक्षांच्या माध्यमातून अनेक रिक्त पादांच्या भरतीसाठी परीक्षा घेतं.  पण तिथं एवढी मोठी स्पर्धा असल्यामुळे सर्वांनाच नोकरी मिळेल असे नाही. पैकी दरवर्षी संघ लोकसेवा आयोगामार्फत हजाराच्या आसपासच अधिकारी म्हणून तरुण-तरुणींची निवड होत असते. तसेच महाराष्ट्र व अन्य राज्यांच्या राज्य आयोगांमार्फत रिक्त पादांच्या भरतीसाठी पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षा व नंतर मुलाखत या प्रक्रियेद्वारे भरती करण्यात येते मात्र या भरतीची सरासरी...

अन् पुन्हा एकदा ‘ती’ नकोशी झाली …

Image
अन् पुन्हा एकदा ‘ती’ नकोशी झाली … ज्याच्याकडं आई नाही त्याच्याकडं काहीच नाही, ‘आ’ म्हणजे आत्मा आणि ‘ई’ म्हणजे ईश्वर. एखादी स्त्री जेव्हा अपत्यास जन्म देते त्यावेळेस तिला मातृत्व प्राप्त होते आणि समाजाच्या दृष्टीने ती त्या अपत्याची आई बनते. आई हा शब्द जीवंत व्यक्तींच्या भावनाशी निगडीत असा शब्द आहे. त्यामुळे आईला जगात सर्वश्रेष्ठ मानले जाते. ज्याच्याकडे आई नाही त्याला जाऊन विचारा आईची किंमत काय असते. मातृत्व ज्या स्त्रीला मिळाले तीला जाऊन विचारा मातृत्व स्विकारल्यानंतर त्यात तिला कसले समाधान वाटते. मराठीतील प्रसिद्ध कवी यशवंत यानी आपल्या कवितेत "स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी " ही ओळ लिहून आई या शब्दाची व्याख्या जगासमोर मांडली आहे, परंतू ही मातृत्वाची जाणीव एकीकडे व महाराष्ट्रातील बीड जिल्हा पुन्हा एकदा हादरला आहे. कारण, इथं मातृत्वाला काळीमा फासणारी या महिन्यातील दुसरी घटना घडली, चक्क आईने जिच्या विना जीवनाची सुरूवातच होत नाही, अशा एक वैरीणीने आपल्या दोन दिवसाच्या स्त्री अर्भकाला बाभळीच्या काटयाच्या आळयामध्ये टाकून दिले. अरे ! हे काय ऐकतोय ? असा प्रकार ऐकायला सुध्दा ...

सावधान ! तुमची फसवणुक तर होत नाही ना ?

Image
सावधान ! तुमची फसवणुक तर होत नाही ना ? सध्याच्या डिजीटल युगात जवळपास 99 टक्के आर्थिक व्यवहार हे ऑनलाईन पध्दतीने केले जातात. भारत महासत्ता होण्यासाठी देशपातळीवर सर्वच शासकीय, खाजगी, शालेय व इतर जवळपास सर्वच अर्थिक व्यवहार हे ऑनलाईन पध्दतीनेच होतात. हा ऑनलाईन पध्दतीचा वापर केल्यामुळे वेळेची बचत तर   होतेच शिवाय सुलभ व सहजरित्या आर्थिक व्यवहार पूर्ण होतात. त्यामुळे तरुणाई सोबतच सर्वांचाच कल या ऑनलाईन पध्दतीच्या व्यवहारांकडे होत आहे. जसे फायदे आहेत तसेच याचा काही लोक गैरफायदाही घेऊन फसवणूक करतात. तसेच ऑनलाईन फिशिंग म्हण्जेच फसवणुकीचेही तितकेच प्रमाण मोठया प्रमाणात वाढले आहे. एक किस्सा असा आहे की, मी स्वत: आयटी क्षेत्रात गेली पंधराहून अधिक वर्षे झालं काम करतोय, मला स्वॉफ्टवेअर व हार्डवेअरमधील जवळपास बऱ्यापैकी ज्ञान आहेच शिवाय बेवसाईटबद़दल व कॉप्युटरचे तसेच मोबईलचे वेगवेगळे सॉप्टवेरबाबत माझा अभ्यास सुरू असतो. थोडक्यात काय तर मी जनरेशन प्रमाणे अपडेट असतोच.   त्या पंधदा वर्षामध्ये ऑनलाईन आर्थिक फसवणूक झालेले व फिशिंगच्या प्रकारात अडकलेले बळीचे बकरे अनेक आहेत, पैकी सात-आठ प्रकरणं...

अपघातावर बोलू काही !

Image
अपघातावर बोलू काही ! सध्या जगणं अवघड व मरणं सोपं अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, किड्या मुंग्यांसारखं माणसं मारायला लागली आहेत. जीवाची किंमत कवडीमोल होत चालली असल्याने भीतीचे वातावरण निर्माण होत आहे, जणू जीवाची पर्वा कोणालाच नाही ! त्याचे महत्व काहीच शिल्लक नाही असे वाटायला लागले आहे. कारण आपण जीवाची किंमत वेळेला दिली आहे, आता माणसाच्या जीवापेक्षा, माणसाच्या शरीरापेक्षा वेळ अधिक मौल्यवान ठरत आहे. कित्येक उदाहरणं अशी आहेत की या वेळेपाई एखाद्या ठिकाणी वेळेत लवकर पोहोचण्याच्या नादात अनेकजण देवाघरी पोहचले, गतप्राण झाले. एवढी वेळ महत्वाची ? जीवाला काहीच किंमत नाही? टीव्ही लावला की अपघात झाल्याच्या बातम्या, पेपर उघडला की अपघात झाल्याच्या बातम्या, सोशल मीडियावर तर न पहावणारे, मन हेलकवणारे, काळजाचे ठोके वाढवणारे विचित्र अपघाताच्या फोटो, व्हिडिओ आपण पाहतो. जीव कासावीस होतो, निराश वाटते पण यावर उपाययोजना ? काहीच नाही ! वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, तसतसे अपघाताचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढत आहे, किडा-मुंग्यासारखं  निष्पाप लोकांचे बळी जात आहेत. देशामध्ये सर्वात जास्त अपघाताने म...