Posts

Showing posts from July, 2021

बंड करा …

Image
  बंड करा … तुम्ही एखाद्या ठिकाणी कोणत्याही स्तरावर काम करत असाल तर तुम्हाला मानसिक त्रास हा होतोच. हा कृत्रिम मनुष्यनियम झाला आहे.   जीवघेण्या स्पर्धेच्या व धकाधकीच्या जीवनात फास्ट फॉरवर्ड दुनियेत माणुसकी अजिबातच शिल्लक राहिली नाही. जो तो मानसिक तणावात वावरत आहे. ज्याला त्याला मानसिक त्रासामधुन आपले जीवन जगावे लागत आहे. जोतो वरिष्ठांचा, समाजातील विशिष्ठ व वरिष्ठ घटकांच्या दबावाखाली येऊन काम करतो आहे. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक व इतर विविध क्षेत्रांमधील वाढत्या मानसिक दबावतंत्रामुळे अनेकांनी आपली जीवनयात्रा संपवली. त्याचं कारण म्हणजे ते समाजामध्ये एडजस्ट झालेच नाही व त्याचा परिणाम म्हणून मरण पत्कारलं. जीवनात काही लोकं तत्वनिष्ठ व स्वाभिमानी असतातात. त्यांना समाजातल्या काही गोष्टी नेहमीच बोचत असतात, खटकत असतात. त्यामुळे अशा घोडयांचा आणि समाजामधील कुविचारी गाढवांसोबत मुळीच ताळमेळ लागत नाही. त्यामुळे ते बंड करतात व आपला स्वतंत्र रस्ता निवडून समाजापासून अलिप्त राहण्याचा प्रयत्न करतात. अनेक संस्था, कंपन्या, शासकिय कार्यालयं, पक्ष इत्यादी ठिकाणी अनेकांना काम करतांना आपल्या वरिष्ठांकडून मा