Posts

Showing posts from May, 2018

खेडयातही माणसंच राहतात ...

खेडयातही माणसंच राहतात ... शहरांपेक्षा खेडयांमध्ये आजही खेडयातील लोक समस्येच्या विळख्यात पार अडकलेले पहावयास मिळतात व शासकीय लाभपासून प्रत्येक व्यक्ती हा तितकाच तहानलेला असतो हे मान्य करावेच लागेल . देश स्वतंत्र झाल्यापासूनचा आजपर्यंतचा अभ्यास केला असता . शहरांचा विकास अतिशय तेजीत होतोय परंतू खेडयांमध्ये आजही अन्न , वस्त्र निवारा व इतर मुलभूत हक्कांपासून खेडयातील माणसं आजही वंचीत आहेत . आजही बऱ्याच खेडेगावात पिण्यासाठी मुबलक पाणी नाही , रस्ते नाहीत , विज नाही , बऱ्याच नागरीकांना स्वत : ची पक्की घरं नाहीत . बरेच मजुर हे कामापासून वंचीत आहेत पत्येकाच्या हाताला काम हे वाक्य सुध्दा आता अपुरी पडत आहेत अपुरी नाही तर हे म्हणणे लागूच होत नाही . हे वाक्य सत्ताधाऱ्यांनी जाहिरातीत वापरंलेलं आहे आत्ताचे सत्ताधारी असोत किंवा यापूर्वी होवून गेलेले आत्ताचे विरोधक . मात्र प्रत्येकाच्या हाताला काम कोणीच देवू शकलं नाही ही या महान अशा महाराष्ट्र राज्याची शोकांतीका आहे . राज्यात कित्येक त