Posts

Showing posts with the label विशेष

घोटाळ्यांचा देश …

घोटाळ्यांचा देश … भारत देश हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो, याच कृषीप्रधान देशाची ओळख आता घोटाळ्यांचा देश म्हणून होत आहे. त्याचं असंय की, या देशात सर्वात जास्त प्रमाणात घोटाळे हे राजकीय क्षेत्राशी निगडीत आहेत. भारत देशाची अर्थव्यवस्था ही शेतीपासून सुरु होते व राजकीय वर्तुळात गोल गोल फिरु लागते. असंच समीकरण या देशात गेल्या सत्तरहून अधिक वर्षांपासून घडत आहे. या देशातील सुजाण जनता चुकीच्या व्यक्तींना लोकप्रतिनिधी म्हणून निवडून देतो. तसेच या देशात घरणेशाहीचे राजकारण मोठया प्रमाणात आहे. याच घराणेशाहीच्या राजकारणामुळे गरीब श्रीमंतीच्या मधले अंतर हे जास्त वाढत चालले आहे. इथं प्रत्येकाला राजकारणात नाव नाही तर बक्कळ पैसा व गडगंज संपत्ती कमावण्यासाठी यायचं असतं. राजकारणाचा दुसरा अर्थच जणू घोटाळा. समाजकारणाच्या नावाखाली लागलेला हा कलंकच म्हणावा लागेल. पैशांशिवाय निवडणुका जिंकताच येत नाहीत. हे वाक्य इथल्या प्रत्येक राजकारण्यांच्या डोक्यात फिट्ट बसलेलं व दृढ झालेलं आहे. घराणेशाहीच्या राजकारणामुळे पैसा दुपटी तिपटीने याच घरात वाढतो, त्यानंतर हळूहळू घोटाळयात सामील असलेले कार्यकर्ते यांची घर...

चायना वाल्यांनी एवढी ‘जिरवली’, तरीबी टिकटॉकवर चालूय ‘ढंगाळांग मचाळांग’

चायना   वाल्यांनी एवढी ‘जिरवली’,  तरीबी टिकटॉकवर चा लूय ‘ढंगाळांग मचाळांग’ असे शब्द, अशी भाषा लेखकांकडून अनपेक्षितच. किमान वाचनात अशुध्द भाषा म्हटलं की, जरा ऑड  वाटणारंच, पण काय करु. काहीजण सुधरायला तयारच नाहीत. ढंगाळांग मचाळांग म्हटलं की, थोडसं हसू आलंच असेल, वरचा मथळा वाचून थोडासा विनोद वाटलाच असेल आणि तुम्हाला थोडसं खुदकन हसायला सुध्दा आलंच अ सेल. आजचा  विषय जेवढा विनोदानं घ्यावा तेवढाच गांभिर्यानं सुध्दा. मुद्दामहुन अ सा मथळा लिहिला आहे. कारण त्याचं गांभिर्य आपल्या सर्वांना लक्षात यायला हवं. टिकटॉ कवरील नाच म्हणजेच ‘ढंगाळांग मचाळांग’. हा शब्द मराठवड्यात ओळखीचा शब्द आहे.   कोणत्याही गोष्टीला मर्यादा असतात, माणूस म्हणून आपल्याला पिढ्यान-पिढ्या काही संस्कार घालून दिलेले आहेत. टिकटॉक बनवणाऱ्यांचं वाढतं प्रमाण पाहून व त्या माध्यमातून नव्या पिढीला जो संदेश जातोय हे पाहून भविष्यात काय बरं परिणाम होतील याचे जरा जास्तच भय वाटत आहे. नौटंकी करणारे करत बसतील पण बालबुध्दीवर होणाऱ्या विपरीत परिणामाचे जास्त दु:ख वाटते. अश्लिल हावभाव, अश्लिल संवाद याम...

अन् पुन्हा एकदा ‘ती’ नकोशी झाली …

Image
अन् पुन्हा एकदा ‘ती’ नकोशी झाली … ज्याच्याकडं आई नाही त्याच्याकडं काहीच नाही, ‘आ’ म्हणजे आत्मा आणि ‘ई’ म्हणजे ईश्वर. एखादी स्त्री जेव्हा अपत्यास जन्म देते त्यावेळेस तिला मातृत्व प्राप्त होते आणि समाजाच्या दृष्टीने ती त्या अपत्याची आई बनते. आई हा शब्द जीवंत व्यक्तींच्या भावनाशी निगडीत असा शब्द आहे. त्यामुळे आईला जगात सर्वश्रेष्ठ मानले जाते. ज्याच्याकडे आई नाही त्याला जाऊन विचारा आईची किंमत काय असते. मातृत्व ज्या स्त्रीला मिळाले तीला जाऊन विचारा मातृत्व स्विकारल्यानंतर त्यात तिला कसले समाधान वाटते. मराठीतील प्रसिद्ध कवी यशवंत यानी आपल्या कवितेत "स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी " ही ओळ लिहून आई या शब्दाची व्याख्या जगासमोर मांडली आहे, परंतू ही मातृत्वाची जाणीव एकीकडे व महाराष्ट्रातील बीड जिल्हा पुन्हा एकदा हादरला आहे. कारण, इथं मातृत्वाला काळीमा फासणारी या महिन्यातील दुसरी घटना घडली, चक्क आईने जिच्या विना जीवनाची सुरूवातच होत नाही, अशा एक वैरीणीने आपल्या दोन दिवसाच्या स्त्री अर्भकाला बाभळीच्या काटयाच्या आळयामध्ये टाकून दिले. अरे ! हे काय ऐकतोय ? असा प्रकार ऐकायला सुध्दा ...

फक्त दृष्टिकोन चांगला ठेवा …

Image
फक्त दृष्टिकोन चांगला ठेवा … समाजामध्ये चांगल्या गोष्टी खूप काही आहेत, पण त्या हल्ली अदृश्य होत चालल्या आहेत. एकूणच काय तर प्रत्येक व्यक्तीचा मानसिक दृष्टिकोन हा एकमेकांविषयी बदलत चाललेला आहे. असे आढळून आले.   यामध्ये बदल घडवायचा तरी कसा ? हा मोठा यक्ष प्रश्न. यावर उपयोजना ही स्वतःच करावी लागेल. समाजामध्ये काम करत असतांना “ लोक काय म्हणतील ” ? या तीन शब्दामुळे हिम्मत असून सुध्दा पुढचं पाऊल उचलायला अनेकजण घाबरतात. व त्याची प्रगती तिथेच खुंटते. प्रत्येकाने जीवन जगताना दृष्टीकोन बदलला पाहिजे. ज्या क्षणाला आपण आपला दृष्टिकोन बदलू त्या क्षणापासून आपला व समाजातील प्रत्येक व्यक्तीचा दृष्टिकोन बदललेला असेल. प्रत्येक व्यक्ती हा प्रामाणिक असतो, फक्त त्याचे विचार प्रामाणिक असायला हवे. प्रत्येक व्यक्ती हा बुद्धिमान असतो, पण त्याच्या अप्रामाणिक विचारशक्ती मुळे तो त्याच्या बुद्धीचा आवश्यक तेवढा वापर करत नाही. म्हणजे तो त्याचा नकारात्मक दृष्टिकोन बदलायला तयार नसतो, त्यामुळे तो माणूस वाईट आहे असा समज समाजामध्ये होतो. ज्या क्षणाला त्या व्यक्तीने त्याचा दृष्टिकोन बदलला व विचार प्रामाणिक कराय...

कर्तव्यापासून दूर गेलेली पत्रकारिता

Image
कर्तव्यापासून दूर गेलेली पत्रकारिता लोकशाहीचा चौथा स्तंभ, लोकशाहीचा आरसा ज्याला दर्पण म्हणतो, त्या लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला लोकशाहीचा व कर्तव्याचा हल्ली विसर पडल्यासारखं वाटतंय. त्याचं कारण म्हणजे एक पाऊल जनतेच्या हितासाठी, अशी शपथ घेतलेल्या लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला आपण कशा प्रकारची पत्रकारिता, कशाप्रकारचे कर्तव्य बजावतोय, याचाच जणू विसर पडला आहे. उगाच लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर तोंडसुख न घेता खरंच त्याच्याकडून काही नकळत होत चुकांसाठी हा शब्दप्रपंच. अगदी थोडक्यात आणि स्पष्ट. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला देशात एक वेगळे स्थान आहे. त्याची एक वेगळीच ओळख आहे. ती ओळख निर्माण झाली ती त्याच्या कर्तव्यामुळे, तो त्या क्षेत्रात कार्य करत असल्यामुळे, लोकशाहीचा अर्थ आरसा, दर्पण. त्याच्याकडे पाहिलं की अन्याय झालेल्याला न्याय नक्कीच मिळणार आहे याचं समाधान असतं. त्याला मिळणारे समाधान हे पत्रकारितेत कार्यरत असलेल्या स्वच्छ पाण्याप्रमाणे, पारदर्शी कर्तव्य करणाऱ्या पत्रकाराकडून मिळते. पण हल्ली याची व्याख्या काही वेगळी झाली आहे, हा खरंच चिंतन करण्याचा विषय आहे. ज्या गोष्टी समाजाला पत्रकारांकडून ...

हीच का ती समानता ? अन हेच का ते महापुरूषांचे विचार ?

Image
हीच का ती समानता ? अन हेच का ते महापुरूषांचे विचार ? महिलांना चुल अन मुल शिवाय आजच्या युगात फ क्त नावालाच आरक्षण अन संरक्षण आहे. केवळ महिलांना आम्ही पुरूष वर्ग तिला पुरूषासमान वागणुक देतो असं भासवतात. मात्र तिला ना आरक्षण आहे ना संरक्षण, गेल्या कित्येक वर्ष झालं बलात्काराचं प्रमाण देशात काही कमी होता होत नाही. ही कीड निघून जाण्याचं नाव घेत नाही. तेंव्हा आपण महापुरूषांचे व्याख्यानं जनजागृती साठी, परिवर्तनासाठी, क्रांती घडवण्यासाठी, चांगल्या जीवनाचा मार्ग शोधण्यासाठी विचार आत्मसात करतो. परंतु त्यांचे विचार खरंच आत्मसात होवून त्याप्रमाणे आपण स्वत: अनुकरून करतो का ? तर बिलकुलच नाही असे लक्षात येते. स्त्रीयांना समानतेची वागणुक मिळावी यासाठी महापुरूषांनी त्यांच्या साहित्य विचारातून प्रेरणा मिळावी यासाठी जीवाचं रान केलं पण आपणा आजही त्यांच्या त्या विचारांना मान्य करायला तयार नाहीत. क्वचीत एखादा अपवाद वगळता. आजही स्त्रीयांना शिवजयंती (भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती वगळता) किंवा अन्य जयंती निमित्त मिरवणुक असो वा विविध कार्यक्रम महिलांना घरातच ठेवण्याची प्रथा बहुतेक ठिकाणी चालते....

तरीही आत्महत्या थांबेनात …

Image
तरीही आत्महत्या थांबेनात शेतकऱ्यांच्या बाबतीत सर्वच घटकांनी संकटाची दारे उघडी करुन ठेवली आहेत. खरा शेतकरी, शेतमजुर बिचारा लाभापासून वंचित तर सालो साल झाली आहेच. परंतू दैनंदीतन जीवनातील संकटं काही पाठ सोवडवेनात. शेतकरी गरीब का असतो ? या प्रश्नाचं उत्तर का शब्दा काढला की लगेच मिळतो. कारण शेतकरी हा गरीबच असतो. देश कृषीप्रधान अन साऱ्या देशाला जवगवणाराच आज भिकारी झाला आहे. शेतकऱ्यांच्या बाजून निवडणुका आल्यावरच सर्वजन त्यांच्या समस्यांचं भांडवल करुन खुर्च्या बळकावतात. शेतकरी विवंचेने दाद मागयला गेल्यावर त्याला त्याच्या पार्श्वभागावर लाथ मारुन मोकळया हाताने परत पाठवण्याची मालिका पांढऱ्या कपडयातील माणूसकी संपलेली गटारातील किडे करत असतात. अंह ! हा शब्दा सुध्दा खुप वजनाचा आहे. तो त्यांना वापरणेही योग्य नाही. कारण माणसातला माणूस आज संपलाय. तो कुठेतरी पैशांना पैसा जोडण्यात गुंतलाय. अन असा गुंतलाय की दुसऱ्याच्या मुंडीवर पाय ठेऊन, इतरांचे नुकसान करुन, गोलमाल करुन, अवैध मार्गाने, भ्रष्ट परंपरेचाच अवलंब करुन पैसा जोडण्याची तयारीला लागला असल्यानेच शेतकऱ्यांच्या नशिबी शेवटी गोटाच आहे. शेतकऱ्यांना ...

सावधान ! आपली मुलं सैराट तर होत नाहीत ना !

Image
सावधान !  आपली मुलं सैराट तर होत नाहीत ना ! धावपळीच्या जीवनात व स्पधेर्र्च्या युगात टिकूण राहण्यासाठी पालकांना अतिशय कष्टयातनेतून आपला उदरनिर्वाह करावा लागतो. पाल्यांच्या शिक्षणासाठी पैसाच लागतो म्हणून पोटाला मारुन तारेवरची कसरत करावी लागत आहे. हे चालू असतांनाच हल्लीची तरुन पिढी पार बिघडून वाया चाललेली दिसून येत आहे, आपली संस्कृती, पालकांचे संस्कार, वडीलधाऱ्यांचा मान राखणे जणू हे सर्व विसरुनच गेले आहेत असंच वाटतं. कधी कधी तर समोरुन येणारा मुलगा आहे की, मुलगी हे ओळखणंच फार कठीण झालं आहे. त्याचं कारण म्हणजे आजकालची फॅशन, अंगप्रदर्शन वगैरे वगैरे. राहणीमाना सोबतच वागण्यातही मोठा परिणाम झालेला दिसतो. कधी काळी महिला वर्गाला चूल आणि मूल यापुढे काहीही करु दिलं जात नव्हतं. मात्र लोकशाही राज्यात स्वातंत्र्याचा एवढाही दुरूपयोग कधी कुठं झाला असेल तर तो फक्त भारतातच. स्वातंत्र्य असावं, याला विरोध नाही पण स्त्री वर्गाने व पुरूष वर्गाने त्याचा वापर चांगल्या कामासाठी केला तर स्वत:साठी व देशहीतासाठी व आपल्या पालकांसाठी वरदान ठरेल. गेल्या काही वर्षांपासून अल्पवयीन प्रेमप्रकरणे, घरातून ...

लवकर निर्णय घ्या !

लवकर निर्णय घ्या ! शेतकऱ्यांच्या हिताच्या मागण्या करण्यात आपर्यंत किती तरी शेतकऱ्यांच्या म्होरक्यांनी आपले स्वार्थ साधले. आपल्या पोळया भाजून घेतल्या. शेतकरी नेते म्हणून जणू हे शास्त्रज्ञच झाले. पण शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यात व शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना पूर्ण करणयात या धूर्त शेतकरी नेत्यांना अपयश आले हे मान्य करावेच लागेल शिवाय ही शोकांतीका आपल्या राज्यात असल्याने शेतकरी दिवसेंदिवस आत्महत्येच्या वाटेवर जातोय अशा सर्वच नेत्यांना याबाबत गांभिर्य नसल्याचे दिसून येते. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री गेली कित्येक दिवस अभ्यास करत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे मात्र मुख्यमंत्री हे ठोस भूमिका घेण्यास तयार दिसत नसल्याने शेतकरी आता संपावर गेला असल्याने राज्यभरातून तीव्र निषेध व्यक्त होतांना दिसू लागला आहे. शेतकरी कधीच एवढा आक्रमक झाला नव्हता. आपर्यंत अन्याय व त्रास सहन करत आपला राग गिळून गप्प होता मात्र आता ही बाब सहनशिलतेल्या पलिकडे गेल्याने शेतकरी संप करत आहे. राज्य बंदचे चित्र चालू असतांना या अपयशी सरकारविरोधात एवढी जनता विरोध करत असल्याने या सरकारचे अपयश व निष्क्रीयत सरळ सरळ...