Posts

Showing posts with the label व्यक्ती विशेष

ॲड. शंकर चव्हाण परिवर्तनवादी नेतृत्व

Image
  परळी विधानसभा मतदारसंघात एक नवं परिवर्तनवादी, केवळ विकासात्मक धोरण असणारं गतिशिल विचाराचं वादळ आता परळी मतदार संघाचा कायापालट करण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरलं आहे. ज्याच्या अंगी समाजपरिवर्तन करण्याची ताकद व उच्च विचारणसणी असणारं अष्टपैलू उमदं व्यक्तीमत्व म्हणजे ॲड. शंकर चव्हाण. स्व. लोकनेते गोपिनाथरावजी मुंडे साहेब व स्व. विलासरावजी देशमुख साहेब यांच्या सामाजिक, राजकीय कारकीर्दीचा ॲड. शंकर चव्हाण यांच्यावर प्रभाव असल्यामुळे सामाजिक जीवनात सर्वसामान्यांच्या पावलो पावली काय समस्या, अडीअडचणी असतात याची त्यांना तंतोतंत जाणीव आहे. व्यवस्था कशी असायला हवी व त्याला तंत्रज्ञानाची जोड कशी देता येईल याबाबत त्यांचा हात कोणीच धरु शकरणार नाही असं म्हटलं तर वावगं ठरु नये. दुरदृष्टी असणारं व विकासात्मक धोरणाची मशाल हाती घेऊन अंधाऱ्या वाटेने हा एकटा निघालेला तरुण त्याच्यासोबत परळी मतदार संघातील तरुणाई सोबत असल्यास ॲड. शंकर चव्हाण परळी मतदार संघाचा चेहरा मोहरा बदलून टाकतील असं यावरुन लक्षात येते. वकीली, पत्रकारीता, सामाजिक, राजकीय, तंत्रज्ञान, समुपदेशन, कला इ. विविध क्षेत्रात आपली छाप उमटवणा...

महाराष्ट्राचं भूषण द ग्रेट माऊंट एव्हरेस्टवीर कॅप्टन नंदकुमार जगताप सेना मेडल – दैनिक शिवजागर टीम

Image
  महाराष्ट्र ाच्या पावन भूमीत   एव्हरेस्टवीर कॅप्टन नंदकुमार जन्माला आले ,   महाराष्ट्र ाच्या पावन भूमीत अनेक वीरांनी देशाला वीर योध्दे दिले आहेत .   या मातीत जन्माला येणं म्हणजे नशीबच लागतं .   माऊंट एव्हरेस्टवीर नंदकुमार जगताप यांच्या देशसेवेमुळे व कामगिरीमुळे   महाराष्ट्र ाच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला आहे हे मान्य करावेच लागेल .   बीड जिल्हयात ,   अंबाजोगाई तालुक्यात वसलेलं मुडेगाव हे त्यांचं मुळ गाव .   याच गावच्या शूरवीरानं व त्यांच्या टीमने आज जगात आपल्या देशाचं नाव उंचावलं आहे .   माऊंट एव्हेरेस्ट सर करुन सहीसलामत परत येणं म्हणजे जीवघेण्या संकटावर मात करुन जणू मृत्यूच्या दारातून परत येणं .   दोन मजली घराच्या पायऱ्या चढणं सर्वसामान्य माणसाला असाह्य होतं आणि तो धापा टाकायला सुरुवात करतो .   समुद्रसपाटीपासून ८८४८   मीटर उंच असे जगातील सर्वोच्च शिखर माऊंट एव्हरेस्ट पादाक्रांत करणारे नंदकुमार जगताप हे भारतीय सैन्य दलातील चौथा मराठा एल . आय . रेजीमेंट मध्ये कार्यरत असतांना जगताप यांनी एव्हरेस्ट टीममधील दोन नंबर दुकड...

बील गेट्स म्हणतात …

Image
जगातल्या श्रीमंत व्यक्तींपैकी एक असणारे मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बील गेट्स यांचा संगणक क्षेत्राच्या क्रांतीमध्ये सिंहाचा वाटा आहे. जगात यशस्वी असलेली मायक्रोसॉफ्ट विंडोज ही ऑरेटींग सिस्टीम साऱ्या जगातील संगणक प्रणालीच्या क्षेत्रामध्ये यश मिळवण्यासाठी सर्वांनाच उपयुक्त ठरली आहे. अनेकांनी कोटयावधी पैसा या माध्यमातून कमावला आहे. 'फोर्ब्स' जाहीर करत असलेल्या जगातील श्रीमंत लोकांच्या यादीत त्यांचा समावेश होत आला आहे. इ.स. २००९ पर्यंत जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून त्यांची ख्याती होती. अमेरिका मधील न्यू मेक्सीको मध्ये त्यांच्या कंपनीचे मुख्यालय स्थित आहे. बिल गेट्स आणि त्यांच्या पत्नी यांनी सामाजिक जाणीवेतून एका एनजीओ सेवाभावी संस्थेची स्थापना केली असून त्या माध्यामातून गोरगरीब कष्टकऱ्यांना मदतीचा हात म्हणून समाजसेवा हा भला माणूस करतोय ही अत्यंक कौतुकास्पद गोष्ट आहे. बील गेट्स यांच्याकडून नवतरुणांना शिकण्यासाठी प्रेरणादायी खुप मोलाच्या गोष्टी आहेत. ते म्हणतात   “जर तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात तर त्यामध्ये तुमचा कसल्याही प्रकारचा दोष नाही, पण जर तुम्ही गरीब म्हणून मेलात तर तो...