Posts

Showing posts with the label भाष्य

मैत्री पुस्तकांशी

Image
  ज्ञानाचा अथांग महासागर जर कुठं असेल तर तो पुस्तकं वाचण्यात आहे असं माझं मत आहे. ज्याची मैत्री पुस्तकांशी असते त्याचं मस्तक सशक्त असतं हे माझ्या अनेक संशोधनावरुन मला उमजलेलं आहे. हे सुध्दा माझं मत आहे. त्यामुळे विचारल प्रगल्भ करायचे असतील तर पुस्तकांशी मैत्री जेवढं लवकर होईल तेवढं करा. कारण या जगात पुस्तकांएवढं सुंदर काहीच नाही. आपण धरतीवर जन्म फक्त चांगलं जीवन जगण्यासाठी घेतला आहे. म्हणूनच जीवन चांगलं केंव्हा होईल जर विचार सशक्त असतील व सकारात्मक असतील. विचार तेंव्हाच सकारात्मक व सशक्त होतील जेंव्हा तुम्ही फक्त आणि फक्त पुस्ताकांशी मैत्री कराल. हे एक वेगळंच विश्व आहे आणि या विश्वास रमणारी माणसं ही अतिशय आनंदी असतात हे माझ्या वैयक्तिक संशोधनावरुन मला लक्षात आलेली बाब आहे. हल्ली सोशल मिडीया व उगवत्या तंत्रज्ञानाच्या वाटचालीवरुन असं लक्षात येतं की पुस्तकाच्या दुनियेचा ऱ्हास झाला आहे. पण असं काहीच नाही जसं दारुडयाला दारुचं दुकान न सांगता सापडतं तसेच पुस्तक वाचणाऱ्या वाचनवेडया व्यक्तीला पुस्ताकाचं वाचनालय न सांगता सापडतं. त्याचं महत्वाचं कारण म्हणजे त्याची असलेली पुस्तकांशी मैत्री. त्...

अै बाप पोरगं संभाळ ! शेंबडं खूनं करायलंय …

Image
  अै बाप पोरगं संभाळ ! शेंबडं खूनं करायलंय … सध्या देशाची मानसिक स्थिती अशी झाली आहे की ,  ट्रेंडच्या नावाखाली काहीही खपवलं जात आहे .  काहीतरी नवीन कुरापती करायच्या व त्याला नवीन ट्रेंड आला म्हणून आपण साऱ्यांनी अशा बाबींना अगदी डोक्यावर घ्यायाचं .   ट्रेंडींगच्या नावाखाली मग तो देशाचा ,  धर्माचा अपमान का असेना .  देशप्रेम नाही ,  धर्मप्रेम नाही ,  आदर सन्मान नाही आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कायद्याचा धाक मुळीच नाही .  ट्रेंडींच्या नावाखाली या ट्रेंडवाल्यांनी कायद्याच्या चौकटी मोडून त्याच्या शेकोट्या केंव्हाच केल्यात आणि शेकोटया करुन त्याची पार राखरांगोळी झाली हे मात्र अद्याप कोणाच्याही लक्षात आलंच नाही .  अलीकडेच एका बारावीत शिकत असलेल्या शेंबडया पोरानं एका  समवयस्क पोराला  साऊथच्या सिनेमाच्या सिनप्रमाणे धारदार कोयत्याने भोसकले .  त्यात त्याचा मृत्यू झाला .  हे सगळे त्या ट्रेंडींग रिलचे व साऊथच्या सिनेमांमधील विकृत दृष्यांचे दुष्परीणाम आहेत यात शंक्काच नाही .  ट्रेंडच्या नावाखाली काही महिला व मुलींनी रिल तयार करुन...

दीड जीबीनं ‘घोडे’, लावले कामाला …

Image
दीड जीबीनं ‘घोडे’, लावले कामाला …  pic source by : google.com इथं प्रत्येकजण मोबाईलच्याच भाषेत बोलतोय ! म्हणलं बुवा आपण पण थोडंसं बोलूयात म्हणून आज जवळ जवळ शालजोडे हाणायचा ईचार आला अन मग केलं सुरु, तर त्याचं असंय की, दीड जीबी इंटरनेटचा डेटापॅक एका दिवसात दिवाळीचं रॉकेट उडवावं तसं संपवणारी तरुण मंडळी अर्थात लंबे रेस के घोडे अर्थात देशाचा मजबूत असा भक्कम  पाया अर्थात उदयाचा भारत देश वगैरे वगैरे.  महिना असो अथवा तीन महिने असोत अन्न, वस्त्र, निवारा आणि स्मार्टफोन व त्यात दीड जीबीचा डेटा पॅक हया नवतरुण मंडींसह सर्वांच्याच मुलभूत गरजा बनल्या आहेत. इथं प्रत्येकाकडं मोबाईमध्ये दीड जीबी डेटापॅक असतोच व त्या मोबाईलवरच्या त्या टचपॅडवर अंगठा खाली वर सरकतांना कधी दिवस उगवला अन कधी मावळला याची जराशीही चाहूल तरुण मंडळींना आजकाल लागत नाही. त्या टाईमपासच्या नादात वडीलधाऱ्यांनी सांगितलेली कामं सुध्दा रेंगाळली जातात. तसेच जीवनात अमुलाग्र असा नको तो बदल हया दीड जीबी च्या पॅकनं समाजात करुन ठेवला आहे. कधी काळी इंटरनेचा वापर हा संदेशवहन तसेच महत्वाच्या कामासाठीच असतो असं समीकरण होतं व ...

घोटाळ्यांचा देश …

घोटाळ्यांचा देश … भारत देश हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो, याच कृषीप्रधान देशाची ओळख आता घोटाळ्यांचा देश म्हणून होत आहे. त्याचं असंय की, या देशात सर्वात जास्त प्रमाणात घोटाळे हे राजकीय क्षेत्राशी निगडीत आहेत. भारत देशाची अर्थव्यवस्था ही शेतीपासून सुरु होते व राजकीय वर्तुळात गोल गोल फिरु लागते. असंच समीकरण या देशात गेल्या सत्तरहून अधिक वर्षांपासून घडत आहे. या देशातील सुजाण जनता चुकीच्या व्यक्तींना लोकप्रतिनिधी म्हणून निवडून देतो. तसेच या देशात घरणेशाहीचे राजकारण मोठया प्रमाणात आहे. याच घराणेशाहीच्या राजकारणामुळे गरीब श्रीमंतीच्या मधले अंतर हे जास्त वाढत चालले आहे. इथं प्रत्येकाला राजकारणात नाव नाही तर बक्कळ पैसा व गडगंज संपत्ती कमावण्यासाठी यायचं असतं. राजकारणाचा दुसरा अर्थच जणू घोटाळा. समाजकारणाच्या नावाखाली लागलेला हा कलंकच म्हणावा लागेल. पैशांशिवाय निवडणुका जिंकताच येत नाहीत. हे वाक्य इथल्या प्रत्येक राजकारण्यांच्या डोक्यात फिट्ट बसलेलं व दृढ झालेलं आहे. घराणेशाहीच्या राजकारणामुळे पैसा दुपटी तिपटीने याच घरात वाढतो, त्यानंतर हळूहळू घोटाळयात सामील असलेले कार्यकर्ते यांची घर...

चायना वाल्यांनी एवढी ‘जिरवली’, तरीबी टिकटॉकवर चालूय ‘ढंगाळांग मचाळांग’

चायना   वाल्यांनी एवढी ‘जिरवली’,  तरीबी टिकटॉकवर चा लूय ‘ढंगाळांग मचाळांग’ असे शब्द, अशी भाषा लेखकांकडून अनपेक्षितच. किमान वाचनात अशुध्द भाषा म्हटलं की, जरा ऑड  वाटणारंच, पण काय करु. काहीजण सुधरायला तयारच नाहीत. ढंगाळांग मचाळांग म्हटलं की, थोडसं हसू आलंच असेल, वरचा मथळा वाचून थोडासा विनोद वाटलाच असेल आणि तुम्हाला थोडसं खुदकन हसायला सुध्दा आलंच अ सेल. आजचा  विषय जेवढा विनोदानं घ्यावा तेवढाच गांभिर्यानं सुध्दा. मुद्दामहुन अ सा मथळा लिहिला आहे. कारण त्याचं गांभिर्य आपल्या सर्वांना लक्षात यायला हवं. टिकटॉ कवरील नाच म्हणजेच ‘ढंगाळांग मचाळांग’. हा शब्द मराठवड्यात ओळखीचा शब्द आहे.   कोणत्याही गोष्टीला मर्यादा असतात, माणूस म्हणून आपल्याला पिढ्यान-पिढ्या काही संस्कार घालून दिलेले आहेत. टिकटॉक बनवणाऱ्यांचं वाढतं प्रमाण पाहून व त्या माध्यमातून नव्या पिढीला जो संदेश जातोय हे पाहून भविष्यात काय बरं परिणाम होतील याचे जरा जास्तच भय वाटत आहे. नौटंकी करणारे करत बसतील पण बालबुध्दीवर होणाऱ्या विपरीत परिणामाचे जास्त दु:ख वाटते. अश्लिल हावभाव, अश्लिल संवाद याम...

माकडांच्या हातात मोबाईलचं खोकडं …

Image
माकडांच्या हातात मोबाईलचं खोकडं … तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल ! आता हे काय नवीन. पण तुम्ही जे वाचताय ना, ते खरंच आहे. जर माकडांच्या हातात मोबाईल दिला, तर ते माकड, त्या मोबाईलचं काय करेल ?  हे तुम्हाला सांगण्याची मुळीच गरज नाही. कारण माकड हा प्राणी. त्यामुळे मोबाईल चालवायचा कसा, याचे ज्ञान त्यास नसल्यामुळे तो त्या मोबाईलचे काहीही करेल, त्याला हवं तसं करेल. तसंच जगामध्ये सर्वत्र कोरोना व्हायरसने थैमान घातले असतांना. प्रत्येकजण आपला जीव वाचण्यासाठी प्रयत्न करतोय.  त्यात भर म्हणून अशीच काही माकडं आपल्या समाजामध्ये आहेत. जे समाजाची दिशाभूल करण्यासाठी सज्ज असून याच मोबाईलच्या खोकडयाचा वापर वाईट पध्दतीने करत आहेत. देशात काय परिस्थिती आहे. याचं गांभिर्य व भान असल्याचं या माकडांना मुळीच दिसून येत नाही. परिस्थितीचं गांभिर्य लक्षात आलं असंत तर यांनी असं केलं नसतं मुळीच. जीवावर बेतण्याची परिस्थीती निर्माण झाली असतांना व्हॉटसॲप, टिकटॉक, फेसबुक, इन्सटाग्राम, टेलीग्राम व इतर सोशल मिडयाचा वापर करुन काहीजण अफवा पसरवणे, चुकीच्या माहितीचा प्रसार व प्रचार करणे, एखादा संदेश समाजामध्ये ते...

जीवंत रहायचे असेल तर घरातच बसा; दीड जीबी वाल्यांनो उगाच वळवळ करु नका

Image
जीवंत रहायचे असेल तर घरातच बसा; दीड जीबी वाल्यांनो उगाच वळवळ करु नका. आपल्या देशातील नेटकर्‍यांनी कोरोना वर विनोद करण्याची हद्दच पार केली आहे. जणू काही यांच्या एकट्यावरच हे जागतिक संकट आलं आहे. यांच्या डोक्यात अजूनही विनोदाचे फवारे सोशल मिडीयावर सुरूच आहेत. कोरोना या व्हायरसमुळे जगामध्ये कित्येकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. मात्र भारतामध्ये अजूनही या गंभीर व्हायरसला गांभिर्याने घ्यायला नेटकरी मुळीच तयार नाहीत. काही दीडशहाण्या दीडजीबी वाल्यांमुळे अफूची गोळी असलेल्या सोशल मिडीयावर बावळटांकडून उगाच नको त्या गोष्टींचा बाऊ होतांना दिसत आहे. यांनी कोरोना या व्हारसची गांभिर्याने दखल जर घेतली नाही तर येणार्‍या काळात शासनाला नक्कीच ठोस पावलं उचलावी लागतील. संचार बंदीच्या काळात नियमाचं पालन न करणे, उगाच घराबाहेर फेरफटका मारणे, विनाकरण गाड्या घराबाहेर नेउन मला कहीच होत नाही असा डायलॉग मारणे, अशा प्रकारचे विविध चाळे हे दीडशहाणी मंडळी करातंना दिसत आहे. माकडांच्या हातातल्या खोकड्यात दीड जीबी भरल्यामुळे हे अतिउत्साही माकडं उगाच वळवळ करतांना सोशल मिडीयावर पहावयास मिळत आहेत. शासन स्तरावर बे...

पोरगं हाटेलात तुपाशी, अन् मायबाप रानात उपाशी ! ...

पोरगं हाटेलात तुपाशी,  अन् मायबाप रानात उपाशी ! ... पोटाची खळगी भरण्यासाठी बाप शेतात राब राब राबतोय, कृषीप्रधान देशात शेतकरी अर्ध्या पोटावर, आनवाणी पायानं     चालतोय, का ? तर, आपल्या मुलांनी शिकावं, खुप मोठं व्हावं म्हणून. पण देश जसाजसा महासत्ता होत आहे ? तसं तसं देशतील परिस्थिती मात्र   हाताबाहेर जातांना दिसत आहे. आई वडील आपल्या पाल्याला शिक्षणासाठी वाटेल तेवढे पैसे पुरवठा करतात, वाटेल तशी हौस करतात, लाड करतात, कसल्याही प्रकारची कमतरता भासू देत नाहीत, का? तर आपला मुलगा-मुलगी शिकावी, मोठा अधिकारी व्हावेत व आपल्या घरची परिस्थीतीमध्ये बदल करावा. गरीबी दुर करावी, आई वडीलांची हालाखीची परिस्थिती बदलून टाकावी. शेतकर्‍यांशिवाय इतर पालकांचीही या पिढीनं हीच अवस्था करुन ठेवली आहे आणि त्यात भर म्हणजे सेन्सॉर बोर्डच्या कृपाशिर्वादामुळे अख्खा देश बरबाद करुन ठेवला आहे. तो कसा ? देशात काय प्रकाशित व्हावं व काय होऊ नये यासाठी काही बंधनं असावेत, देशात ब्रॉडकास्टींग व्यवस्था, मिडीया यांनी काय प्रसार करावा व काय करु नये यासाठी परवानाग्या देण्याचं काम सेन्सार बोर्ड व ब्रॉडका...

चालक, वाहक व प्रवाशांसाठी थोडसं !

Image
चालक, वाहक व प्रवाशांसाठी थोडसं ! महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ यांच्याविषयी काही समारात्मक व नकारात्मक गोष्टींचा आढावा आपण आज या संपूर्ण लेखामध्ये पाहणार आहोत. सोबतच चालक वाहक व प्रवाशांबाबतही थोडसं परखड भाष्य या ठिकाणी होणार असल्यामुळे काय अपेक्षीत बदल परिवहन मंडळाकडून व चालक वाहक व प्रवाशांकडून अपेक्षीत आहेत, त्याबाबत लोकभावनेची जोड प्रत्येकाच्या भावनेशी कशी जोडता येईल याबाबत आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. महाराष्ट्र राज्य हे भावनिक माणणांची खान व सकारात्मक विचारांच्या हिऱ्यांची खान असेलेले राज्य म्हटले तर वावगे ठरु नये. कारण इथें माणूस सकारात्मकच विचार करणारा व वागणारा नक्कीच सापडेल. सर्वसामान्यांपासून ते असामान्यांपर्यंतचा माणूस हा बसने प्रवास नक्कीच करतो. प्रवास ही प्रत्येकाच्या आयुष्यातील निरंतर पक्रिया असल्यामुळे प्रत्येकाला याची गरज नक्कीच भासते. आपण आता मुळ मुद्याचं बोलूया ! महत्वाचं म्हणजे स्वत:चा व्यक्तीमत्व विकास जर साधायचा असेल तर नम्रता हे मूल्य प्रत्येकाच्या अंगी असणं फार महत्वाचं असतं. चालक, वाहक व प्रवाशी या  बाजूशिवाय परिवहन मंडळाचं ध्येय पूर्ती होवू शकत नाह...

अन् पुन्हा एकदा ‘ती’ नकोशी झाली …

Image
अन् पुन्हा एकदा ‘ती’ नकोशी झाली … ज्याच्याकडं आई नाही त्याच्याकडं काहीच नाही, ‘आ’ म्हणजे आत्मा आणि ‘ई’ म्हणजे ईश्वर. एखादी स्त्री जेव्हा अपत्यास जन्म देते त्यावेळेस तिला मातृत्व प्राप्त होते आणि समाजाच्या दृष्टीने ती त्या अपत्याची आई बनते. आई हा शब्द जीवंत व्यक्तींच्या भावनाशी निगडीत असा शब्द आहे. त्यामुळे आईला जगात सर्वश्रेष्ठ मानले जाते. ज्याच्याकडे आई नाही त्याला जाऊन विचारा आईची किंमत काय असते. मातृत्व ज्या स्त्रीला मिळाले तीला जाऊन विचारा मातृत्व स्विकारल्यानंतर त्यात तिला कसले समाधान वाटते. मराठीतील प्रसिद्ध कवी यशवंत यानी आपल्या कवितेत "स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी " ही ओळ लिहून आई या शब्दाची व्याख्या जगासमोर मांडली आहे, परंतू ही मातृत्वाची जाणीव एकीकडे व महाराष्ट्रातील बीड जिल्हा पुन्हा एकदा हादरला आहे. कारण, इथं मातृत्वाला काळीमा फासणारी या महिन्यातील दुसरी घटना घडली, चक्क आईने जिच्या विना जीवनाची सुरूवातच होत नाही, अशा एक वैरीणीने आपल्या दोन दिवसाच्या स्त्री अर्भकाला बाभळीच्या काटयाच्या आळयामध्ये टाकून दिले. अरे ! हे काय ऐकतोय ? असा प्रकार ऐकायला सुध्दा ...

मोर्चे इथले संपत नाहीत ...

Image
मोर्चे इथले संपत नाहीत भारत देशामध्ये न्याय व हक्कासाठी मोठ्या प्रमाणात मोर्चे काढले जातात, समाजातील वंचित घटक आपल्या मागण्या मान्य व्हाव्या यासाठी मोर्चे काढतात, शेतकरी त्यांच्या न्याय व हक्कासाठी मोर्चे काढतात, विद्यार्थी त्यांच्या न्याय व हक्कासाठी व त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी मोर्चे काढतात, समाजातील विविध धर्मातील विविध जाती आरक्षणासाठी मोर्चे काढतात, शहराला पाणी मिळालं नाही म्हणून मोर्चे काढले जातात, वीज वेळेवर मिळत नाही म्हणून मोर्चे काढले जातात, शहरांमध्ये घाणीचे साम्राज्य वाढलं म्हणून मोर्चे काढले जातात, राज्यात वाहतूक व्यवस्था सुरळीत चालावी म्हणून मोर्चे काढले जातात, अमानुषपणे बलात्कार होतात तेव्हा मोर्चे काढले जातात, डॉक्टर संप करतात, संविधान जाळले जाते म्हणून मोर्चे काढले जातात, भारत माता की जय कुणी म्हणत नाही म्हणून मोर्चे काढले जातात, सोशल मीडियावर एखादया महापुरूषाची बदनामी होते म्हणून मोर्चे काढले जातात,तिरंगा जाळला जातो म्हणून मोर्चे काढले जातात.   देशांमध्ये अशा अनेक समस्या आहेत की त्यासाठी आंदोलनं, मोर्चे, उपोषणं करावी लागतात. सत्ताधारी व प्रशासकीय...

पक्ष काढणार म्हणे …

पक्ष काढणार म्हणे …   महाराष्ट्रामध्ये पक्ष नावाच्या टपऱ्या दिवसेंदिवस वाढत आहेत. हा लोकशाही व्यवस्थेला बाधक परिणाम ठरत आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला स्वातंत्र्य दिलेले असल्यामुळे त्याच स्वातंत्र्याचा वापर करून लोकशाही मधल्या समाजाची दिशाभूल करून पक्ष नावाची नवीन टपरी चालू करून सर्वसामान्य जनतेची लूट करू पाहणारे, लूट करणारे, लूट केलेले असे अनेक टपरी संस्थापक आपल्या महाराष्ट्राच्या माती मध्ये अजूनही ताठ मानेने जगत आहेत. तसेच असे डोमकावळे संस्थापक यांच्या नावाने राज्यभर गडगंज संपत्ती जमा आहे. ज्याला आपण घबाड असं म्हणतो. ते घबाड येणाऱ्या सात पिढ्या खातील एवढी संपत्ती यांनी जनतेची दिशाभूल करून पक्ष नावाच्या टपरी च्या माध्यमातून कमावलेली आहे ती कमावलेली संपत्ती चांगल्या मार्गाने कमावली आहे असे कागदोपत्रावर दाखवून राज्यातील सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावण्याचं काम या पांढऱ्या पोशाखातील चोरांनी केली आहे. याठिकाणी पक्ष नावाच्या शब्दाला मुद्दाम टपरी हा शब्द वापरला आहे त्याचं कारण म्हणजे कोणत्याही एखाद्या शहरांमध्ये आपण गेलो असता पावला दोन पावलावर चहाची, पान टपरी इ. यांची मांडणी केल...

कर्तव्यापासून दूर गेलेली पत्रकारिता

Image
कर्तव्यापासून दूर गेलेली पत्रकारिता लोकशाहीचा चौथा स्तंभ, लोकशाहीचा आरसा ज्याला दर्पण म्हणतो, त्या लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला लोकशाहीचा व कर्तव्याचा हल्ली विसर पडल्यासारखं वाटतंय. त्याचं कारण म्हणजे एक पाऊल जनतेच्या हितासाठी, अशी शपथ घेतलेल्या लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला आपण कशा प्रकारची पत्रकारिता, कशाप्रकारचे कर्तव्य बजावतोय, याचाच जणू विसर पडला आहे. उगाच लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर तोंडसुख न घेता खरंच त्याच्याकडून काही नकळत होत चुकांसाठी हा शब्दप्रपंच. अगदी थोडक्यात आणि स्पष्ट. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला देशात एक वेगळे स्थान आहे. त्याची एक वेगळीच ओळख आहे. ती ओळख निर्माण झाली ती त्याच्या कर्तव्यामुळे, तो त्या क्षेत्रात कार्य करत असल्यामुळे, लोकशाहीचा अर्थ आरसा, दर्पण. त्याच्याकडे पाहिलं की अन्याय झालेल्याला न्याय नक्कीच मिळणार आहे याचं समाधान असतं. त्याला मिळणारे समाधान हे पत्रकारितेत कार्यरत असलेल्या स्वच्छ पाण्याप्रमाणे, पारदर्शी कर्तव्य करणाऱ्या पत्रकाराकडून मिळते. पण हल्ली याची व्याख्या काही वेगळी झाली आहे, हा खरंच चिंतन करण्याचा विषय आहे. ज्या गोष्टी समाजाला पत्रकारांकडून ...