साहेब ! मी शेतकरी बोलतोय … साहेब ! मी शेतकरी बोलतोय … रोज रोज शेतात राब राब राबतोय कितीही मेहनत घेतली तरी पोटाला आर्धीच खातोय वाटलं होतं ऐकेल कोणी माझी हाक होईल कोणी माझ्या आयुष्याच्या प्रगतीचं चाक पण मला आजवर सगळयांनी दिला ठेंग्याचा हात माझ्याविषयी सगळयांच्या मनात पापच पाप पोटभर खाऊन ढेकर देता तुम्ही शिळया तुकडयावरच दिवस काढतो आम्ही असाच संसाराचा गाढा हजारो वर्षे ओढतोय साहेब ! मी शेतकरी बोलतोय … दुष्काळ आला, त्याला पाहुणा समजुन पाहुणचार केला सावकार आला, त्याचाही खिसा भरता केला अजुनही बँकाची कर्ज फेडतोय साहेब ! मी शेतकरी बोलतोय … एसीत बसुन आमच्यासाठी संघर्षाचं नका घेऊ सोंग संघर्ष तर आम्ही करतोय, नका करु तुम्ही नुसतंच ढोंग दुपारचा सुर्य डोक्यावर घ्या मग कळेल तुम्हाला आम्ही कसे कष्ट करतोय साहेब ! मी शेतकरी बोलतोय … मंत्रालयात बसुन फक्तं बोलनं असतं लई सोप्पं कितीही खोटी आश्वासनं दिले तरीही आम्ही आजवर गप्पं आम्ही काय गुन्हा केला तुमच्याकडं नाही पैका आमच्यासाठी एकतरी आयोग लागू करा, एवढं तुम्ही ऐका पोराच्या शिक्षणापाई आज सुध्दा मी...
आई माझी मायेचा सागर … या विश्वात असं एकच न्यायालय आहे जिथं सर्व गुन्हे माफ होतात ती म्हणजे आई. आई म्हणजे मायेचा सागरं आहे, समुद्र पाहतांना डोळयाची नजर जिथवर जाईल तिथवर समुद्र दिसतो म्हणजे समुद्र आपल्या डोळयात देखील मावत नाही त्यापेक्षाही कितीतरी पटीने आपली आपल्या लेकराला जीव लावते. तिच्या जीवापेक्षाही जास्त ती आपल्या लेकरांवर प्रेम करते. तिलां असं वाटतं की, माझ्या लेकराला काही झालं नाही पाहिजे. मातृत्व ज्या स्त्रीला मिळालं त्या स्त्रीला जाऊन विचारा आई झाल्यावर काय समाधन मिळतं. आई होणं एवढं सोप्पं काम नाही. कारण आईची जागा कोणीही घेऊ शकत नाही. आई एक साक्षात्कार आहे. साक्षात परमेश्वर सुध्दा आजपर्यंत आईची जागा घेऊ शकलेला नाही. देवाला प्रत्येक व्यक्तीवर माया, प्रेम व सांभाळ करता येत नाही म्हणून त्याने आई बनवली. त्यामुळे प्रत्येकाला आई मिळाली. समुद्राची शाई आणि आकाशाचा कागद केला तरी आईची व्याख्या लिहून होणार नाही असं हे आईचं प्रेम आहे. जे प्रेम जगाच्या पाठीवर कुठेही मिळणार नाही. आईची माया ही ज्याला समजली तो धन्य झाला. कारण नशिबानं ज्यांच्याकडं आई आहे ते खुप भाग्यवान आहेत. ज्याच्या...
माणुसकी हरवलेला माणुस ... माणसाच्या शरीराचा विचार केल्यास त्याच्या शरीराला चालना देणारा मेंदू हा सर्व प्रक्रियांना जबाबदार असतो . त्याचे मुख्य कारण म्हणजे त्याची नियंत्रण व्यवस्था ही मेंदूद्वारे चालते . समाजामध्ये वावरत असतांना या मेंदूचा कोणत्या ना कोणत्या घटकाची संबंध येतोच . या मेंदूचे लक्ष सकारात्मक व नकारात्मक आहे हे कळते . काहीसं माणुसकीचा माणुसकीच्या शब्दांमध्ये बेरीज - वजाबाकी होतेच , परंतु माणूस या मेंदूचा उपयोग निगेटिव चालना देण्यासाठी जास्त वापरतो . या निगेटिव पावरचा समाजामध्ये विपरीत परिणाम होणारच . स्वतःचे अस्तित्व टिकवायचं की घालवायचं हे या मेंदूवर अवलंबून असते . आपल्याकडे या मेंदूचाच फारसा प्रमाणामध्ये दूरुपयोग होताना दिसतोय . आपल्या देशाची संरक्षण व्यवस्था ही काही प्रमाणात या मेंदूसारखे काम करत असते . अर्थात पोलिस यंत्रणा . मला पोलिस यंत्रणेच्या चांगल्या कामाबद्दल बोलायचे असल्यास नक्की अभिमान वाटेल पण नकारात्मक गोष्टींचा लेखाजोखा जर पाहिला तर शरमेनं मान ...
आदर्श पत्रकार वसंत मुंडे यांची यशोगाथा लोकशाहीचा चौथा आधार स्तंभ असणाऱ्या पत्रकारीता क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणारे वसंत मुंडे समाजासमोर एक आदर्श पत्रकार म्हणून उभे आहेत . सामाजिक जाणीव असणारे पत्रकार वसंत मुंडे यांची यशोगाथा म्हणजेच त्यांच्या पत्रकारीता क्षेत्रातील खडतर प्रवास व त्यांचा भला अनुभव होय . पत्रकार वसंत मुंडे यांचे पूर्ण नाव वसंत माधवराव मुंडे असे आहे . लाडझरी ( तालुका परळी ) येथे त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाले . माध्यमिक शिक्षण घाटनांदूर ता . अंबाजोगाई या गावी पूर्ण केले . बी . ए . बी . जे . ( बॅचलर ऑफ जर्नालिझम ) डॉ . बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद या विद्यापीठातून येथे पूर्ण झाले . स . न . 2003 पासून दैनिक लोकसत्ताचे बीड जिल्हा प्रतिनिधी म्हणून ते कार्यरत आहेत . त्यापूर्वी महाविद्यालयीन शिक्षण घेत असतांनाच दैनिक मराठवाडा साथी व दैनिक लोकपत्र या दैनिकांसाठी बातमीदार म्हणून काम करण्याची त्यांना संधी मिळाली होती . हा त्यांचा अल्पसा ...
परळी विधानसभा मतदारसंघात एक नवं परिवर्तनवादी, केवळ विकासात्मक धोरण असणारं गतिशिल विचाराचं वादळ आता परळी मतदार संघाचा कायापालट करण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरलं आहे. ज्याच्या अंगी समाजपरिवर्तन करण्याची ताकद व उच्च विचारणसणी असणारं अष्टपैलू उमदं व्यक्तीमत्व म्हणजे ॲड. शंकर चव्हाण. स्व. लोकनेते गोपिनाथरावजी मुंडे साहेब व स्व. विलासरावजी देशमुख साहेब यांच्या सामाजिक, राजकीय कारकीर्दीचा ॲड. शंकर चव्हाण यांच्यावर प्रभाव असल्यामुळे सामाजिक जीवनात सर्वसामान्यांच्या पावलो पावली काय समस्या, अडीअडचणी असतात याची त्यांना तंतोतंत जाणीव आहे. व्यवस्था कशी असायला हवी व त्याला तंत्रज्ञानाची जोड कशी देता येईल याबाबत त्यांचा हात कोणीच धरु शकरणार नाही असं म्हटलं तर वावगं ठरु नये. दुरदृष्टी असणारं व विकासात्मक धोरणाची मशाल हाती घेऊन अंधाऱ्या वाटेने हा एकटा निघालेला तरुण त्याच्यासोबत परळी मतदार संघातील तरुणाई सोबत असल्यास ॲड. शंकर चव्हाण परळी मतदार संघाचा चेहरा मोहरा बदलून टाकतील असं यावरुन लक्षात येते. वकीली, पत्रकारीता, सामाजिक, राजकीय, तंत्रज्ञान, समुपदेशन, कला इ. विविध क्षेत्रात आपली छाप उमटवणा...
महापुरूषांच्या जयंतीला ‘डॉल्बी’ कशाला ? अखंड भारत देशामध्ये जागतिक किर्तीच्या महापुरूषांची किर्ती आजच्या शतकातसुध्दा तेवढीच आहे. खरंतर महापुरूषांच्या कार्याचा इतिहास आपण अभ्यासून आपला वर्तमानकाळ सुखकर व्हावा व त्यांच्या आदर्शाचं रोपटं आपल्या मनी रुजवण्यासाठी अभ्यासतो. शिवछत्रपती शिवाजी राजे भोसले, भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतीबा फुले, छत्रपती शाहु महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, टिपू सुलतान, डॉ ए.पी.जे.अब्दुल कलाम अशी किती तरी महापुरूष होऊन गेले ज्यांनी नावं लिहिण्यासाठी एक पुस्तक सुध्दा कमी पडेल. आज त्यांच्या एका एका कार्याचा इतिहास वाचत असतांना आपण रोमांचक होतो व अंगावर काटा आणणाऱ्या घटना त्यांच्यासोबत घडल्या, स्वराज्य मिळवण्यासाठी व आपल्याला लोकशाही मिळवून देण्यासाठी कित्येक महापुरुष व क्रांतीकारकांनी आपल्यासाठी प्राणांची आहुती दिली. ते हे दिवस पाहण्यासाठी नाही. काय नशीब काढलंय आपण. आज समाजामध्ये निस्वार्थ वृत्तीने समाजप्रबोधन करणारे कित्येक अविलये सापडतील. अशा महापुरषांच्या कर्तृत्वाचं हेच पांग फेडता का तुम्ही ? महापुषांच...
लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ हरवत चाललाय ! शब्दांनी करतो प्रहार, धाडसी झुंजार, समाजसुधारणा निर्धार, विचारांत बळ शब्दांना धार, सुरक्षित समाजाचा शिल्पकार, झेप गरुडाची नजर सभोवार, असत्याचा करतो संहार, हाती लेखाणी तलवार. अशा या शब्दअलंकाराने लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभाची म्हणजेच पत्रकार या व्यक्तीमत्वाची व्याख्या तोंड भरुण केली तरी कमीच आहे असं मी नक्कीच म्हणणे. समाजासाठी हा सत्याचा आरसा समजला जातो. लोकांचा प्रचंड विश्वास असणारं प्रतिभावंत व प्रामाणिक उदाहरण म्हणून पत्रकारीतेकडं पाहिलं जातं. वृत्तपत्रविदया अवगत करण्यासाठी लेखणी तलावार व शब्दांची ढाल करुन अन्यायाच्या विरोधत लढण्यासाठी सज्ज असलेला पत्रकार. भल्याभल्यांना आपल्या शब्दांनी व परखड लेखणीच्या माध्यमातून चारीमुंडयाचित करणारा पत्रकार. पण हल्ली पत्रकरीता क्षेत्रामध्ये काही उणीवा जाणवू लागल्या आहेत. पत्रकारीतेला एक वेगळंच वळण लागलेलं पहावयास मिळत आहे. जनतेच्या मनात पत्रकारीतेबद्दल ज्या भावना होत्या त्या भावना बदलल्याचं कुठंतरी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या जाणवत आहे. गेल्या काही वर्षापूर्वी पत्रकाराची जी छाप होती ती आज राहिली नसल्याचे...
पुढारी बोलीव वजन वाढतंया ! ... हल्ली पुढारी, नेते मंडळी, मंत्री-संत्री ह्या कोणत्याही शुभकार्यासाठी, उदघाटन समारंभासाठी, लग्न, मुंज वा इतर कोणात्याही कार्यक्रमासाठी बोलावण्याची प्रथा पुरोगामी महाराष्ट्रात आजवर चालत आली व चालवली आपणच, गर्दी असल्याशिवाय कार्यक्रम शोभून दिसत नाही. त्यासाठी पुढारी असल्याशिवाय गर्दी जमत नाही हे समिकरण यशस्वी झाल्यामुळे जवळपास प्रत्येकजण कार्यक्रम वा समारंभासाठी आषर्कण म्हणून शक्यतो नावाजलेला, गाजलेला थोडकयात इंप्रेशन पाडणारा पुढारीच बोलावतो. ही नेते मंडळी, मंत्री यांना जनतेने ज्या कामासाठी निवडुन दिलेलं असतं, ती कामं प्रत्येकजण बाजूला सारुन त्याला वेळ न देता प्रसिध्दीच्या हावेपोटी अशा कामांना वेळ जास्तीचा देतात. त्यामुळे विकासाच्या कामांना आपोआप पूर्णविराम मिळतोच. शिवाय जनतेनी त्यांच्या मागंपुढं करावं असा ङ्कपणङ्ख त्यांनी केलेलाच असतो. असंच काही एका अमूक अमूक गावात एका अमूक अमूक इमारतीचं उदघाटन करायचं होतं. गण्या आता त्या गावचा जणू म्होरक्याच समाजा, हया म्होरक्याच्या गावात एक इमारत कईक महिन्यांपासून लोकापर्णन करायचं काय ते पेंन्डींग ऱ्हायलं हुतं. त्या...
चला पत्रकारितेवर बोलू काही ! ... रात्रीचा दिवस करून समाज हितासाठी जनतेची सेवा करण्यासाठी, एक पाऊल जनतेच्या हितासाठी, आपल्या धारदार लेखणीने प्रहार करून अन्यायाला वाचा ङ्गोडणारा झुंजार पत्रकार, निर्भिड पत्रकार, खरतर पत्रकारितेची व्याख्या काही वेगळीच आहे १००% पारदर्शक स्वच्छ पाण्याप्रमाणे त्याचा स्वभाव, प्रत्येक घटकाला समान न्याय आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजासमोर लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला आरशाप्रमाणे सर्व बाजूंनी कायद्याच्या चौकटीत राहून तारेवरच्या कसरती प्रमाणे काम करावे लागते. पत्रकार हा दिवस पहात नाही, रात्र पाहत नाही, काट्याकुट्यांचा रस्ता पाहत नाही, संकटांना तोंड देत देत समाजाला न्याय देण्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य देऊन समाजासमोर सत्य ठेवतो. या सत्यासाठी या पत्रकाराला कसा संघर्ष करावा लागतो याचा विचार कोणीच करत नाही ? पत्रकारांचा संघर्ष म्हणजे वंचित घटकांसाठी, समाजात होणार्या अन्यायाला वाचा ङ्गोडण्यासाठी, भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी राजकारणातील, समाजकारणातील दोन्ही बाजू जनतेचे प्रश्न त्यांच्यापुढे ठेवण्यासाठी अथक संघर्ष करावा लागतो. पत्रकार बांधवांना काय सम...
लाखोंचा पोशिंदा जगलाच पाहिजे ….. पहाटे पहाटे जीवा शिवाची बैल जोडं …… असं गाणं म्हणत चार पाच च्या सुमारास गणपत रोज उठायचा , नांगर घेऊन शेतात नांगरत असे , लवकर लवकर शेतातलं काम आटोपून , आपल्या बैलजोडीला वैरण काडी करुन , बरोबर सात वाजता घरी यायचा हात पाय धुवायचा अन् बायकोला म्हणलायचा अगं ए कारभारणी रातीचं पिठलं अन् शिळी भाकर हाय का ? बाको लाडात येऊन म्हणायची आवं कारभारी आहे त्या दुरडीत घ्या अन रानातच जाऊन खावा . भाकरी आणि रातीचं पिठलं घरच्यापरीस रानातच गोड लागतय . हसून खेळुन दिवस जायचे . घरची सुखाची मीठ भाकरी खाऊन गणपत व त्याची कारभारीन सुखानं संसाराचा गाढा ओढत होते . रानात सगळीकडं हिरवळ पहावयास मिळायची वेळेवर पेरण्या व्हायच्या , वेळेवर शेतातली सर्व कामे आटपायची , शेतात पिकवलेला माल तातडीने आडती दुकानादारांडे नेऊन विकून त्यात मिळालेला पैका पाहिजे तेवढा वर खर्चासाठी ठेऊन उरलेला जीभेला आवर घालून , काळजाला कुलूप लावून पुढील आयुष्यासाठी जतन करुन बँकेत ठेवायचा . ...
Comments
Post a Comment