Posts

Showing posts with the label राजकीय भाष्य

घोटाळ्यांचा देश …

घोटाळ्यांचा देश … भारत देश हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो, याच कृषीप्रधान देशाची ओळख आता घोटाळ्यांचा देश म्हणून होत आहे. त्याचं असंय की, या देशात सर्वात जास्त प्रमाणात घोटाळे हे राजकीय क्षेत्राशी निगडीत आहेत. भारत देशाची अर्थव्यवस्था ही शेतीपासून सुरु होते व राजकीय वर्तुळात गोल गोल फिरु लागते. असंच समीकरण या देशात गेल्या सत्तरहून अधिक वर्षांपासून घडत आहे. या देशातील सुजाण जनता चुकीच्या व्यक्तींना लोकप्रतिनिधी म्हणून निवडून देतो. तसेच या देशात घरणेशाहीचे राजकारण मोठया प्रमाणात आहे. याच घराणेशाहीच्या राजकारणामुळे गरीब श्रीमंतीच्या मधले अंतर हे जास्त वाढत चालले आहे. इथं प्रत्येकाला राजकारणात नाव नाही तर बक्कळ पैसा व गडगंज संपत्ती कमावण्यासाठी यायचं असतं. राजकारणाचा दुसरा अर्थच जणू घोटाळा. समाजकारणाच्या नावाखाली लागलेला हा कलंकच म्हणावा लागेल. पैशांशिवाय निवडणुका जिंकताच येत नाहीत. हे वाक्य इथल्या प्रत्येक राजकारण्यांच्या डोक्यात फिट्ट बसलेलं व दृढ झालेलं आहे. घराणेशाहीच्या राजकारणामुळे पैसा दुपटी तिपटीने याच घरात वाढतो, त्यानंतर हळूहळू घोटाळयात सामील असलेले कार्यकर्ते यांची घर...

पक्ष काढणार म्हणे …

पक्ष काढणार म्हणे …   महाराष्ट्रामध्ये पक्ष नावाच्या टपऱ्या दिवसेंदिवस वाढत आहेत. हा लोकशाही व्यवस्थेला बाधक परिणाम ठरत आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला स्वातंत्र्य दिलेले असल्यामुळे त्याच स्वातंत्र्याचा वापर करून लोकशाही मधल्या समाजाची दिशाभूल करून पक्ष नावाची नवीन टपरी चालू करून सर्वसामान्य जनतेची लूट करू पाहणारे, लूट करणारे, लूट केलेले असे अनेक टपरी संस्थापक आपल्या महाराष्ट्राच्या माती मध्ये अजूनही ताठ मानेने जगत आहेत. तसेच असे डोमकावळे संस्थापक यांच्या नावाने राज्यभर गडगंज संपत्ती जमा आहे. ज्याला आपण घबाड असं म्हणतो. ते घबाड येणाऱ्या सात पिढ्या खातील एवढी संपत्ती यांनी जनतेची दिशाभूल करून पक्ष नावाच्या टपरी च्या माध्यमातून कमावलेली आहे ती कमावलेली संपत्ती चांगल्या मार्गाने कमावली आहे असे कागदोपत्रावर दाखवून राज्यातील सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावण्याचं काम या पांढऱ्या पोशाखातील चोरांनी केली आहे. याठिकाणी पक्ष नावाच्या शब्दाला मुद्दाम टपरी हा शब्द वापरला आहे त्याचं कारण म्हणजे कोणत्याही एखाद्या शहरांमध्ये आपण गेलो असता पावला दोन पावलावर चहाची, पान टपरी इ. यांची मांडणी केल...

कोटयावधी रुपये खर्चूनही भारत शेवटी अस्वच्छच !

Image
कोटयावधी रुपये खर्चूनही भारत शेवटी अस्वच्छच !  स्वच्छ भारत मिशन च्या नावाने भारत सरकारने देश स्वच्छ होण्याचे धडे गिरवण्याचे काम शिपायांपासून ते वर्ग 1 च्या अधिकाऱ्यांपर्यंत दिले व स्वच्छ भारत मिशन ही सक्तीची योजना केली.परंतू शेवटी भारत देश हा अस्वच्छच दिसतोय सर्वत्र. मागील काही महिन्यांपूर्वी वर्तमानपत्रातून एक विदेशी जोडप्यांचा फोटो प्रसिध्द झालेला सोशल मिडीयावर पाहितला. तो फोटो बरंच काही आपल्या देशातीत जनतेला शिकवण करुन देणारा होता. त्या फ फोटोमध्ये एका व्यक्तीने सिगारेट ओढल्यानंतर उरलेला तुकडा इतरत्र न टाकता आपल्या बॅगमध्ये टाकला, तेथीलच जवळ असलेल्या भारतीय व्यक्तीने हे कृत्य पहात होता, न राहून त्याने विचारले, असे का केले ? त्या विदेशी पर्यटकाने जे उत्तर दिले खरंच आश्चर्यकारक होते ! देश घाण करण्यात जे जे सहभागी आहेत अर्थात आपण सर्वचजण त्यांनाही लाज वाटेल असेच होते. ते विदेशी पर्यटक म्हणाले, की मी हा कचरा इथे टाकला तर मलाही माझ्या मायदेशी गेल्यावर अशीच सवय लागेल आणि आमच्या देशामध्ये असे कृत्य करणारास भारतीय रक्कमेप्रमाणे जवळपास पंधरा हजार रुपये दंड ठोठावतात. बघा हा देश,...

बाजारात ‘तुरी’ अन् मुख्यमंत्री शेतकऱ्यांना आत्महत्येस प्रवृत्त करी !

Image
बाजारात ‘तुरी’ अन् मुख्यमंत्री शेतकऱ्यांना आत्महत्येस प्रवृत्त करी ! खचलेला, खंगलेला शेतकरी शेतावरी, टवटवीत एसीत सर्वांगानी फुगलेले मुख्यमंत्री अन् बाजारात भाव न मिळाल्याने धुळखात पडलेल्या ‘तुरी’ हे समीकरण व हा राडा गेल्या दोन महिन्यांपासून सोशल मिडीयासह सर्व मिडीयांचा विषय बनला आहे. राज्यात नेमकं काय चाललंय ? विरोधक टिका करतात पण राजकिय वर्तुळात हे असावं पण शेतकऱ्यांसोबत असा खिलवाड करणारे कृत्य करणे व त्यांच्या जीवाशी खेळणे हे मात्र जरा अतिच होत आहे. भाजप सरकार शेतकऱ्यांना त्रासदायक ठरत आहे. निव्वळ शेतकऱ्यांनाच नव्हे तर शेतमजुरांना सुध्दा याचा फटका बसला आहे. शेतकऱ्याने शेतात पिकवलेले उत्पन्न दरवेळी त्याचे भाव कमी असल्याने त्याच्या पदारात काहीच उरत नाही. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमालाला हमी भाव मिळवून देऊ अन् आता या तुरीच्या पिकाचा बाऊ करत असून शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाचं काय झालं देवेंद्र भाऊ अशी म्हणायची वेळ आल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांच्या बाबतीत मात्र फडणवीस सरकार गंभीर नसल्याने शेतकऱ्यांना त्रासदायक ठरत आहे की काय असं वाटू लागले आहे. नेमके हे सरकार शेतकऱ्...

भाजपचं नेमकं काय चुकलं ?

Image
भाजपचं नेमकं काय चुकलं ? सत्तेत असणाऱ्यांवर सत्तेत नसणारे तोफेतून बारुद उडवावा तशा टिकेच्या फैरी झाडत असतातच. मग सत्ता कोणाचीही असो, भारत असा एकमेव देश आहे जिथं नको त्याच गोष्टीला जास्त महत्व देऊन त्याचे महत्व वाढवले जाते. लक्षात ठेवा आपल्या देशामध्ये समाजकारणापेक्षा राजकारणालाच जास्त महत्व दिले जाते. सर्व जनता खाली माना घालून कळत नसल्यासारखं आपली अक्कल दुसऱ्या कोणाकडे गहाण ठेऊन, दोन मांसाच्या तुकडया पायी व हजार पाचशे रुपयांपायी आपले बहुमूल्य मत जे पवित्र दान करायचे असते ते विकून माणूसकिला काळीमा फासण्याचं काम आजवर करत आलीय. अशा प्रकारे माणूसकी विकून काय साध्य करणार कोणास ठाऊक ? भारतातील प्रत्येक माणूस वेगळा आहे, प्रत्येक माणूस जातीने निराळा आहे, प्रत्येक माणूस विचाराने वेगळा आहे पण हाच मतदार लोकशाही मार्गाने सत्ता चुकीच्या हाती कसा काय देऊ शकतो हे त्याचं त्यालाच माहित. हे इंग्रज राजवट संपल्यानंतर पासून चालत आलेली परंपरा आहे, महत्वाचं म्हणजे हे तेवढेच दुर्देव आहे. सत्ता ही पैशांचा जोरावर मिळवण्याची सध्या भारत देशाला साथ लागली आहे आणि या साथीमध्ये भोळयाभाबडया नसलेल्या, कळत असून ...

"मोदीराज चांगभलं" ...

Image
"मोदीराज चांगभलं "... भाजप सरकारने हल्ली जनतेमध्ये स्वतःचा विश्वास संपादन करण्याचं काम सुरु केलं आहे . ते असं की भाजप सरकार कामगिरी दमदार असे बोलून भाजप सरकारचा जाहिरात बाजीवर प्रचंड   प्रमाणात खर्च करुन उधळपटटी करण्याचं काम सध्या सुरु आहे . भाजप सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेतला हे खरे आहे पण या ऐतिहासिक निर्णयामध्ये सर्वसामान्य जनतेचं वाटोळं आणि पैसेवाल्याचं चांगभलं झालं हे स्पष्ट . यात काही टिकात्मक भुमिका नाही वा पक्षविरोध नाही . पण सत्य परिस्थिती लक्षात घेता हल्ली देशभरामध्ये नोट   बंदीमुळे बॅंकाच्या पाय - या झिजवले कोणी ? तर ते   सर्वसामान्य गोरगरीब जनतेनं . बॅंकाच्या मागच्या दरवाज्यातून भल्या भल्यांनी आपली गाठोडी रातोरात बदलून घेतली . बॅंकेतील कर्मचा - यांना हातशी धरुन आपल्या ताकतीचा दुरुपयोग ज्यांच्याकडं काळा पैसा आहे त्यांनी केला . मोदींच्या या ऐतिहासिक हजार पाचशेच्या नोटा बंदी केल्यामुळे व दोन हजाराच्या व पाचशेच्या नविन नोटा छपाई खर्च व कागदाचा ...

बळीराजाची होतेय दिशाभुल अन् सरकारचं चालूय ‘आठ हात लाकूड, नऊ हात धलपी’ काढण्याचं काम

बळीराजाची होतेय दिशाभुल अन् सरकारचं चालूय ‘आठ हात लाकूड, नऊ हात धलपी’ काढण्याचं काम' शेतकऱ्यांना , कामगारांना व सर्वसामान्य भोळयाभाबडया जनतेला खोटी आश्वासनं देऊन गेली पन्नास वर्षे पुढाऱ्यांनी गादया मिळावल्या . विकासाच्या नावचा पत्ताच नाही , निवडणुक जवळ आली की नेतेमंडळीचा शहणपणा जागा होतो . गल्ली बोळांपासून ते झोपडपट्यांपर्यंत पायातली जोडे झिजवुन ही लोकं घर ना घर पिंजून ‘ मतं दया ’ च्या नावाखाली काढतात . निवडुन आल्यानंतर व निवडणुकीपुर्वीची गत म्हणजे निवडणुकीपुर्वी मतं मागायला येणारी पुढारी मंडळी ही तेहतीस कोटी देवांची माता ‘ गाय ’ (Cow) च्या रुपात येतात अन् निवडणुकीत विजय प्राप्त झाल्यानंतर त्यांचे ‘ वाघाच्या ’(Tiger) रुपात प्रवेश होतो . मत मागायला आपलेल्या नेत्यामध्ये जी नम्रता असते ती निवडणुकीत निवडून दिलेल्या नेत्यामध्ये नसते , असते ती फक्त उध्दट डरकाळी . असो , गेले ते दिवस अन् राहिल्या त्या फक्त आठवणी , अशा गोष्टींच्या इतिहासाचा अभ्यास करण्यात काही अर्थ नाही . आत्ता वेळ आहे ...