Posts

Showing posts from April, 2017

आक्रोश शेतकऱ्यांचा !

Image
आक्रोश शेतकऱ्यांचा !   कुणाचं काय तर कुणाचं काय ? म्हणजे आपल्या देशामध्ये सर्व धर्म समभाव असे मानले जाते . ते कितपत हे स्वत : च स्वत : ने ठरवावे . गेली कित्येक वर्षे जाती जाती मध्ये मतभेत तर आहेतच पण धर्मामध्ये सुध्दा मतभेद आहेत . आपापल्या धर्माचे पालन कसे करायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे . पण हल्ली या धर्मापरिसरामध्ये एक राजकारण चालू झाले आहे . कोणाला मंदीरामधील काकड आरती ची   ऍलर्जी   आहे म्हणजेच त्यामुळे झोप मोड होते असे बऱ्याच जणांचे म्हणणे आहे , तर कोणाला   मशिदीमधील नमाजाच्यावेळी होणाऱ्या भोंग्याच्या त्रासामुळे झोप उडते असे बरेच जण व्यक्त होतात . असो , मला धर्मा विरोधात कोणतेही भाष्य करायचे नाही किंवा कोण्या धर्माविरोधात चांगली अथवा वाईट चर्चा करायची नाही . आपल्या देशामध्ये नको त्या गोष्टीला महत्वाचं स्थान देण्याची सवय असल्यामुळे असे प्रकार नेहमी घडतच असतात . पण शेतकऱ्यांचा आक्रोश अजुनही कोणाला जाणवला नाही , शेतकऱ्यांच्या आक्रोशामुळे कोणाची झोप उडाली ना

महापुरूषांच्या जयंतीला ‘डॉल्बी’ कशाला ?

Image
महापुरूषांच्या जयंतीला ‘डॉल्बी’ कशाला ? अखंड भारत देशामध्ये जागतिक किर्तीच्या महापुरूषांची किर्ती आजच्या शतकातसुध्दा तेवढीच आहे. खरंतर महापुरूषांच्या कार्याचा इतिहास आपण अभ्यासून आपला वर्तमानकाळ सुखकर व्हावा व त्यांच्या आदर्शाचं रोपटं आपल्या मनी रुजवण्यासाठी अभ्यासतो. शिवछत्रपती शिवाजी राजे भोसले, भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतीबा फुले, छत्रपती शाहु महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, टिपू सुलतान, डॉ ए.पी.जे.अब्दुल कलाम अशी किती तरी महापुरूष होऊन गेले ज्यांनी नावं लिहिण्यासाठी एक पुस्तक सुध्दा कमी पडेल. आज त्यांच्या एका एका कार्याचा इतिहास वाचत असतांना आपण रोमांचक होतो व अंगावर काटा आणणाऱ्या घटना त्यांच्यासोबत घडल्या, स्वराज्य मिळवण्यासाठी व आपल्याला लोकशाही मिळवून देण्यासाठी कित्येक महापुरुष व क्रांतीकारकांनी आपल्यासाठी प्राणांची आहुती दिली. ते हे दिवस पाहण्यासाठी नाही. काय नशीब काढलंय आपण. आज समाजामध्ये निस्वार्थ वृत्तीने समाजप्रबोधन करणारे कित्येक अविलये सापडतील. अशा महापुरषांच्या कर्तृत्वाचं हेच पांग फेडता का तुम्ही ? महापुषांच

अस्तित्वाच्या लढाईत कुठे जाऊन बसलाय आधारस्तंभ ‘माझा’ ?'

Image
अस्तित्वाच्या लढाईत कुठे जाऊन बसलाय आधारस्तंभ ‘माझा’ ?' गेल्या काही दिवसांपासून लोकशाहीच्या चौथ्या अधारस्तंभावर सोशल मिडीयाच्या माध्यमातून सर्वसामान्य भारतीय नागरीकांनी निषेधाच्या फैरी झाडल्या. तीव्र संताप व्यक्त करण्यात आला व अजूनही हे सत्र चालूच आहे. हा राग इलेक्ट्रॉनिक मिडीया म्हणजेच एका नामांकित वृत्तवाहिनीबद्दलचा होता. मिडीयाने काय केले पाहिजे व काय केले गेले याबाबतच्या टिपण्‍ण्या युवा पिढीसह सर्वच स्तरातुन  सोशल मिडीयाच्या माध्यमातून नोंदवल्या गेल्या. खरंच आता माध्यमांना विचार करायला लावणारी गोष्ट आहे का हो ? जेंव्हा सर्वसामान्य जनताच लोकशाहीच्या चौथ्या खऱ्या खुऱ्या अधारस्तंभावर एवढी भडकावी ? त्यांनी निषेध व्यक्त करावा ? मला वाटते आजवर इतपत अशी वेळ इलेक्ट्रॉनिक माध्यमे किंवा मुद्रीत माध्यमे (प्रिंट मिडीया) बहुतांश कोणावरच आली नसावी. म्हणतात ना, की सामान्य माणसांमध्ये एक असामान्य ताकद असते. मग ही ती ताकद तर नव्हे ? कदाचित याचा परिणाम खरंच भारी पडेल ? स्पर्धेच्या युगामध्ये आणखी एका गोष्टीचे भान सर्वच माध्यमांनी लक्षात ठेवायला हवे. मुळात स्पर्धा एवढी वाढली आहे आणि त्या

आपण संस्कार विसरोलत का ?

Image
आपण संस्कार विसरोलत का ? धकाधकीच्या जीवनात प्रत्येकजण पैशांच्या मागे धावत आहे. प्रत्येकाला स्ट्रगल करायचं आहे व जीवनात आपलं काही तरी अस्तित्व निर्माण करायचं आहे. त्यामुळे दिवस रात्र पैसा कोणत्या मार्गाने कमावता येईल असा विचार प्रत्येक जण करतो. प्रत्येकाला गाडी, बंगला, ऐशो आरामाचे जीवन आवडते. हाताखाली नोकर असावेत. एन्जॉय करायला एखादं फार्म हाऊस असे तर चांगलंच. पण मेहनत न करता असं फक्त स्वप्नातच होऊ शकतं. असे आयुष्य प्रत्येकाच्या वाटयाला नाही येत. कधी कधी तर खुप कष्ट करुनही यापैकी एक सुध्दा सुख अनुभवन्यासाठी मिळत नाही. आयुष्यामध्ये नाती खुप महत्वाची असतात. ती नाती जपण्यासाठी खुप काळजी घ्यावी लागते. अगदी तळहातातल्या फोडाप्रमाणे. कारण नाती ही खुप नाजुक असतात. त्याला तडा जाऊ नये म्हणून आपण्‍ काळजी करतोच पण काही लोकांमध्ये संस्कार म्हणजे काय या गोष्टीशी यांना काही देणं घेणंच नसतं असं वाटायला लागलेलं आहे. वाटेल तसं वागायचं, वाटेल त्या ठिकाणी काही पण करायचं, दुसऱ्याचे नुकसान झाले तर आपल्याला काय त्याचं. अशा प्रवृत्तीच्या काही लोकांमुळे संस्कार या सुसंस्कृत शब्दाची व्याख्या पार बदलू