Posts

Showing posts from June, 2018

तुमचं समदं खरं हाय ! पण माझं काय ?

Image
तुमचं समदं खरं हाय ! पण माझं काय ? माननीय महोदय तुमचं सारं काही खरं झालं, माझा महाराष्ट्र, माझा देश हा विकासाच्या उंबरठ्यावर आहे. असं तुम्ही जाहिरातींमधून आम्हा शेतकऱ्यांना सांगता. पण, मला या विकास जो काय असतो त्याबाबत थोडं मन मोकळं करायचं आहे. माझं काहीच भांडण नाही तुमच्याशी. पण, तुम्ही म्हणता शेतकऱ्यांचा विकास झाला, तुम्हाला कुठे दिसला हो शेतकऱ्याचा विकास ? तुम्ही साधी कर्जमाफी करायला, अभ्यास करत बसला होता ! खरंच अभ्यास करण्याने कर्जमाफीचा गुंता सुटला का हो  ? तुम्ही बुलेट ट्रेन, विमानसेवा, रेल्वे सेवा, रस्ते, उड्डाणपूलं वगैरे वगैरे, विकासाच्या बाता करता. पण, माझ्या अंगावरचे मळकटलेले कपडे मात्र अजूनही बदलले नाहीत. याला आपण खरंच विकास म्हणणार का हो ? मला एक सांगा !  शेतीमालाला भाव देण्यासाठी मला प्रतिवर्षी संघर्ष करावा लागतो. त्याचा तिढा आजपर्यंत एकही प्रतिनिधी सोडवू शकला नाही. खत बियाणे घ्यायचं म्हटलं की, दरवर्षी मला पहिल्या वर्षांपेक्षा जास्त दराने मिळतात. याचा गंभीर्याने विचार तुम्ही कधी केलाय का ? महोदय, आम्हा शेतकऱ्यांना शेतीव्यतिरिक्त इतर काहीही उत्पन्न नाही, आमच्या उ