Posts

Showing posts from February, 2024

महाराष्ट्राचं भूषण द ग्रेट माऊंट एव्हरेस्टवीर कॅप्टन नंदकुमार जगताप सेना मेडल – दैनिक शिवजागर टीम

Image
  महाराष्ट्र ाच्या पावन भूमीत   एव्हरेस्टवीर कॅप्टन नंदकुमार जन्माला आले ,   महाराष्ट्र ाच्या पावन भूमीत अनेक वीरांनी देशाला वीर योध्दे दिले आहेत .   या मातीत जन्माला येणं म्हणजे नशीबच लागतं .   माऊंट एव्हरेस्टवीर नंदकुमार जगताप यांच्या देशसेवेमुळे व कामगिरीमुळे   महाराष्ट्र ाच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला आहे हे मान्य करावेच लागेल .   बीड जिल्हयात ,   अंबाजोगाई तालुक्यात वसलेलं मुडेगाव हे त्यांचं मुळ गाव .   याच गावच्या शूरवीरानं व त्यांच्या टीमने आज जगात आपल्या देशाचं नाव उंचावलं आहे .   माऊंट एव्हेरेस्ट सर करुन सहीसलामत परत येणं म्हणजे जीवघेण्या संकटावर मात करुन जणू मृत्यूच्या दारातून परत येणं .   दोन मजली घराच्या पायऱ्या चढणं सर्वसामान्य माणसाला असाह्य होतं आणि तो धापा टाकायला सुरुवात करतो .   समुद्रसपाटीपासून ८८४८   मीटर उंच असे जगातील सर्वोच्च शिखर माऊंट एव्हरेस्ट पादाक्रांत करणारे नंदकुमार जगताप हे भारतीय सैन्य दलातील चौथा मराठा एल . आय . रेजीमेंट मध्ये कार्यरत असतांना जगताप यांनी एव्हरेस्ट टीममधील दोन नंबर दुकडीचे एव्हरेस्ट चढाईसाठी सफल नेतृत्व केले .   मराठा रेजीमेंट तुकडी