Posts

Showing posts from March, 2024

मैत्री पुस्तकांशी

Image
  ज्ञानाचा अथांग महासागर जर कुठं असेल तर तो पुस्तकं वाचण्यात आहे असं माझं मत आहे. ज्याची मैत्री पुस्तकांशी असते त्याचं मस्तक सशक्त असतं हे माझ्या अनेक संशोधनावरुन मला उमजलेलं आहे. हे सुध्दा माझं मत आहे. त्यामुळे विचारल प्रगल्भ करायचे असतील तर पुस्तकांशी मैत्री जेवढं लवकर होईल तेवढं करा. कारण या जगात पुस्तकांएवढं सुंदर काहीच नाही. आपण धरतीवर जन्म फक्त चांगलं जीवन जगण्यासाठी घेतला आहे. म्हणूनच जीवन चांगलं केंव्हा होईल जर विचार सशक्त असतील व सकारात्मक असतील. विचार तेंव्हाच सकारात्मक व सशक्त होतील जेंव्हा तुम्ही फक्त आणि फक्त पुस्ताकांशी मैत्री कराल. हे एक वेगळंच विश्व आहे आणि या विश्वास रमणारी माणसं ही अतिशय आनंदी असतात हे माझ्या वैयक्तिक संशोधनावरुन मला लक्षात आलेली बाब आहे. हल्ली सोशल मिडीया व उगवत्या तंत्रज्ञानाच्या वाटचालीवरुन असं लक्षात येतं की पुस्तकाच्या दुनियेचा ऱ्हास झाला आहे. पण असं काहीच नाही जसं दारुडयाला दारुचं दुकान न सांगता सापडतं तसेच पुस्तक वाचणाऱ्या वाचनवेडया व्यक्तीला पुस्ताकाचं वाचनालय न सांगता सापडतं. त्याचं महत्वाचं कारण म्हणजे त्याची असलेली पुस्तकांशी मैत्री. त्यामु