Posts

मैत्री पुस्तकांशी

Image
  ज्ञानाचा अथांग महासागर जर कुठं असेल तर तो पुस्तकं वाचण्यात आहे असं माझं मत आहे. ज्याची मैत्री पुस्तकांशी असते त्याचं मस्तक सशक्त असतं हे माझ्या अनेक संशोधनावरुन मला उमजलेलं आहे. हे सुध्दा माझं मत आहे. त्यामुळे विचारल प्रगल्भ करायचे असतील तर पुस्तकांशी मैत्री जेवढं लवकर होईल तेवढं करा. कारण या जगात पुस्तकांएवढं सुंदर काहीच नाही. आपण धरतीवर जन्म फक्त चांगलं जीवन जगण्यासाठी घेतला आहे. म्हणूनच जीवन चांगलं केंव्हा होईल जर विचार सशक्त असतील व सकारात्मक असतील. विचार तेंव्हाच सकारात्मक व सशक्त होतील जेंव्हा तुम्ही फक्त आणि फक्त पुस्ताकांशी मैत्री कराल. हे एक वेगळंच विश्व आहे आणि या विश्वास रमणारी माणसं ही अतिशय आनंदी असतात हे माझ्या वैयक्तिक संशोधनावरुन मला लक्षात आलेली बाब आहे. हल्ली सोशल मिडीया व उगवत्या तंत्रज्ञानाच्या वाटचालीवरुन असं लक्षात येतं की पुस्तकाच्या दुनियेचा ऱ्हास झाला आहे. पण असं काहीच नाही जसं दारुडयाला दारुचं दुकान न सांगता सापडतं तसेच पुस्तक वाचणाऱ्या वाचनवेडया व्यक्तीला पुस्ताकाचं वाचनालय न सांगता सापडतं. त्याचं महत्वाचं कारण म्हणजे त्याची असलेली पुस्तकांशी मैत्री. त्यामु

महाराष्ट्राचं भूषण द ग्रेट माऊंट एव्हरेस्टवीर कॅप्टन नंदकुमार जगताप सेना मेडल – दैनिक शिवजागर टीम

Image
  महाराष्ट्र ाच्या पावन भूमीत   एव्हरेस्टवीर कॅप्टन नंदकुमार जन्माला आले ,   महाराष्ट्र ाच्या पावन भूमीत अनेक वीरांनी देशाला वीर योध्दे दिले आहेत .   या मातीत जन्माला येणं म्हणजे नशीबच लागतं .   माऊंट एव्हरेस्टवीर नंदकुमार जगताप यांच्या देशसेवेमुळे व कामगिरीमुळे   महाराष्ट्र ाच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला आहे हे मान्य करावेच लागेल .   बीड जिल्हयात ,   अंबाजोगाई तालुक्यात वसलेलं मुडेगाव हे त्यांचं मुळ गाव .   याच गावच्या शूरवीरानं व त्यांच्या टीमने आज जगात आपल्या देशाचं नाव उंचावलं आहे .   माऊंट एव्हेरेस्ट सर करुन सहीसलामत परत येणं म्हणजे जीवघेण्या संकटावर मात करुन जणू मृत्यूच्या दारातून परत येणं .   दोन मजली घराच्या पायऱ्या चढणं सर्वसामान्य माणसाला असाह्य होतं आणि तो धापा टाकायला सुरुवात करतो .   समुद्रसपाटीपासून ८८४८   मीटर उंच असे जगातील सर्वोच्च शिखर माऊंट एव्हरेस्ट पादाक्रांत करणारे नंदकुमार जगताप हे भारतीय सैन्य दलातील चौथा मराठा एल . आय . रेजीमेंट मध्ये कार्यरत असतांना जगताप यांनी एव्हरेस्ट टीममधील दोन नंबर दुकडीचे एव्हरेस्ट चढाईसाठी सफल नेतृत्व केले .   मराठा रेजीमेंट तुकडी

लेडीज फस्ट मग ‘आई शेवटी का जेवते’ ?

Image
लेडीज फस्ट मग ‘ आई शेवटी का जेवते ’ ? प्रश्न सरळ आणि साधा आहे ,  आपल्या अवती भोवती असे अनेक प्रश्न आपल्याला कदाचित माहित नसतात ,  कदाचित ते आपल्या जवळ असूनही आपण त्या गोष्टीपर्यंत पोहचत नाहीत .  पृथ्वीवरचा स्वर्ग म्हणजे आई .  आईविना जीवन व्यर्थ आहे .  जगातली सर्व ताकद एकीकडे व फक्त एकटी आई एकीकडे अशी ही आईची व्याख्या आहे .  म्हणतात ना आकशाचा कागद आणि समुद्राची शाई जरी केली तरी आईविषयी निबंध लिहिला जाऊ शकणार नाही कारण ते सुध्दा कमी पडेल . " स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी "  हे अगदी तंतोतंत खरं आहे .  ज्याच्याजवळ आई नाही त्याला विचारा आई खरंच काय असते .  आईची व्याख्या इतक्या सहज कोणीच करु शकत नाही .  देवाला प्रत्येकाडं वेळ देणं होत नाही त्यामुळं त्या परमेश्वरांन आईच्या रुपात आपल्यावर माया करत आहे .  आई वडीलांएवढं प्रेम जगाच्या पाठीवर कोणीच करु शकत नाही .  स्त्रीमध्ये नवनिर्माण करण्याची क्षमता असते .  तिच्यामध्ये असणारी सकरात्मक उर्जा परिवर्तन करण्याची हिम्मत असते .  प्रत्येक स्त्री कोणाची तरी आई ,  बहिण ,  पत्नी ,  मुलगी असते .  आईएवढं महान व्यक्तीमत्व जगात कोणीच नाही .