Posts

Showing posts from May, 2021

कोरोना एक विदारक वास्तव …

Image
  कोरोना एक विदारक वास्तव … माणूस आयुष्यभर मी पणामध्ये जगतो. पण आजच्या घडीला कोरोनामुळे त्याच्या वाटयाला आता शेवटची अंघोळ सुध्दा नशिबात नाही, शेवटची मिरवणूक नाही, तिरडी नाही, सोबत नातेवाईक नाहीत, नातेवाईकच काय तर स्वत:च्या घरातील सदस्य देखील सोबत नाहीत, एकुणच काय तर मरणाचा सोहळा अंत्यसंस्कार आता कोणालाच साजरा करता येणार नाहीत. मृत्यूनंतर लगेच प्लास्टीक पॅकींग आणि प्रेत सरळ स्मशानभुमीत. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांवर अंत्यसंस्कार सुध्दा आता विधीप्रमाणे होत नाहीत, कारण तेवढा वेळच कुणाकडे नाही एवढी मृत्यूची संख्या वाढत आहे. हे वास्तव आहे. मृत्यूची वेळ आणि काळ खरंच खूप बदलला आहे, कधी काय होईल सांगता येत नाही. कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर प्रेतं जाळण्यासाठी आता लाकडं सुध्दा कमी पडत आहेत. शासकीय यंत्रणेमार्फत प्रेतांची विल्हेवाट लावण्याच्या प्रक्रियेस मृत्यूसंख्या वाढत असल्यामुळे विलंब लागत आहे.   प्रेतं जाळण्यासाठी भली मोठी रांग लागलेली दृश्यं उघडया डोळयांनी पहावे लागत आहेत. ही बाब अत्यंत दुर्देवी आहे शिवाय अलीकडे तर त्याहूनही अधिक विदारक वास्तव चित्र पहावयास मिळालं की, नदीपात्राच्या पाण्या