Posts

Showing posts from 2018

पत्रकार जनतेच्या सदैव पाठीशी पण जनता ?

Image
पत्रकार जनतेच्या सदैव पाठीशी पण जनता ? सकाळी झोपेतून उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जनतेची सेवा करण्यार् ‍ या , जनतेसाठी नेहमी आपली लेखणी सढळ ठेवणारा , जनतेसाठी अहोरात्र आपल्या लेखणीच्या माध्यमातून न्याय व हक्कासाठी लढणारा पत्रकार , लोकशाहीचा चौथा स्तंभ , लोकशाहीचा आरसा आज एकटा पडलाय . सदैव जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभा असणारा त्याच्यापाठीशी आता कोणीच नाही , जणू तो आज घडीला पोरकाच झाला आहे . जनतेने मोर्चा काढला कर बातमी , उपोषणास बसलात कर बातमी , जाळपोळ केली कर बातमी , चक्काचाम केला कर बातमी , बस फ ोडल्या कर बातमी , आरक्षण मोहिम असली की कर बातमी , मंत्री आला कर बातमी , पत्रकार परिषद घेतली कर बातमी , दंगा झाला कर बातमी , पक्ष प्रवेश केला कर बातमी , निवेदन दिलं कर बातमी , कोणाच्या नळाला पाणी नाही आलं कर बातमी , पालिकेनं कचरा नाही उचलला कर बातमी , राशन दुकानदार , रॉकेलवाला मापात पाप करतोय की , लगेच कर बातमी , कोणी आत्महत्या केली सर्व कामं सोड व कर बातमी , खून झाला घटनास्थळा

मोर्चे इथले संपत नाहीत ...

Image
मोर्चे इथले संपत नाहीत भारत देशामध्ये न्याय व हक्कासाठी मोठ्या प्रमाणात मोर्चे काढले जातात, समाजातील वंचित घटक आपल्या मागण्या मान्य व्हाव्या यासाठी मोर्चे काढतात, शेतकरी त्यांच्या न्याय व हक्कासाठी मोर्चे काढतात, विद्यार्थी त्यांच्या न्याय व हक्कासाठी व त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी मोर्चे काढतात, समाजातील विविध धर्मातील विविध जाती आरक्षणासाठी मोर्चे काढतात, शहराला पाणी मिळालं नाही म्हणून मोर्चे काढले जातात, वीज वेळेवर मिळत नाही म्हणून मोर्चे काढले जातात, शहरांमध्ये घाणीचे साम्राज्य वाढलं म्हणून मोर्चे काढले जातात, राज्यात वाहतूक व्यवस्था सुरळीत चालावी म्हणून मोर्चे काढले जातात, अमानुषपणे बलात्कार होतात तेव्हा मोर्चे काढले जातात, डॉक्टर संप करतात, संविधान जाळले जाते म्हणून मोर्चे काढले जातात, भारत माता की जय कुणी म्हणत नाही म्हणून मोर्चे काढले जातात, सोशल मीडियावर एखादया महापुरूषाची बदनामी होते म्हणून मोर्चे काढले जातात,तिरंगा जाळला जातो म्हणून मोर्चे काढले जातात.   देशांमध्ये अशा अनेक समस्या आहेत की त्यासाठी आंदोलनं, मोर्चे, उपोषणं करावी लागतात. सत्ताधारी व प्रशासकीय अधि

फक्त दृष्टिकोन चांगला ठेवा …

Image
फक्त दृष्टिकोन चांगला ठेवा … समाजामध्ये चांगल्या गोष्टी खूप काही आहेत, पण त्या हल्ली अदृश्य होत चालल्या आहेत. एकूणच काय तर प्रत्येक व्यक्तीचा मानसिक दृष्टिकोन हा एकमेकांविषयी बदलत चाललेला आहे. असे आढळून आले.   यामध्ये बदल घडवायचा तरी कसा ? हा मोठा यक्ष प्रश्न. यावर उपयोजना ही स्वतःच करावी लागेल. समाजामध्ये काम करत असतांना “ लोक काय म्हणतील ” ? या तीन शब्दामुळे हिम्मत असून सुध्दा पुढचं पाऊल उचलायला अनेकजण घाबरतात. व त्याची प्रगती तिथेच खुंटते. प्रत्येकाने जीवन जगताना दृष्टीकोन बदलला पाहिजे. ज्या क्षणाला आपण आपला दृष्टिकोन बदलू त्या क्षणापासून आपला व समाजातील प्रत्येक व्यक्तीचा दृष्टिकोन बदललेला असेल. प्रत्येक व्यक्ती हा प्रामाणिक असतो, फक्त त्याचे विचार प्रामाणिक असायला हवे. प्रत्येक व्यक्ती हा बुद्धिमान असतो, पण त्याच्या अप्रामाणिक विचारशक्ती मुळे तो त्याच्या बुद्धीचा आवश्यक तेवढा वापर करत नाही. म्हणजे तो त्याचा नकारात्मक दृष्टिकोन बदलायला तयार नसतो, त्यामुळे तो माणूस वाईट आहे असा समज समाजामध्ये होतो. ज्या क्षणाला त्या व्यक्तीने त्याचा दृष्टिकोन बदलला व विचार प्रामाणिक करायला स

पक्ष काढणार म्हणे …

पक्ष काढणार म्हणे …   महाराष्ट्रामध्ये पक्ष नावाच्या टपऱ्या दिवसेंदिवस वाढत आहेत. हा लोकशाही व्यवस्थेला बाधक परिणाम ठरत आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला स्वातंत्र्य दिलेले असल्यामुळे त्याच स्वातंत्र्याचा वापर करून लोकशाही मधल्या समाजाची दिशाभूल करून पक्ष नावाची नवीन टपरी चालू करून सर्वसामान्य जनतेची लूट करू पाहणारे, लूट करणारे, लूट केलेले असे अनेक टपरी संस्थापक आपल्या महाराष्ट्राच्या माती मध्ये अजूनही ताठ मानेने जगत आहेत. तसेच असे डोमकावळे संस्थापक यांच्या नावाने राज्यभर गडगंज संपत्ती जमा आहे. ज्याला आपण घबाड असं म्हणतो. ते घबाड येणाऱ्या सात पिढ्या खातील एवढी संपत्ती यांनी जनतेची दिशाभूल करून पक्ष नावाच्या टपरी च्या माध्यमातून कमावलेली आहे ती कमावलेली संपत्ती चांगल्या मार्गाने कमावली आहे असे कागदोपत्रावर दाखवून राज्यातील सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावण्याचं काम या पांढऱ्या पोशाखातील चोरांनी केली आहे. याठिकाणी पक्ष नावाच्या शब्दाला मुद्दाम टपरी हा शब्द वापरला आहे त्याचं कारण म्हणजे कोणत्याही एखाद्या शहरांमध्ये आपण गेलो असता पावला दोन पावलावर चहाची, पान टपरी इ. यांची मांडणी केलेली

बेरोजगारी इथली संपत नाही ...

Image
बेरोजगारी इथली संपत नाही ... देशामध्ये बेरोजगारीचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढले असून, बेरोजगारी सारखी मोठी समस्या युवकांच्या जणू पाचवीलाच पूजली आहे. येथील प्रशासन व सत्ताधारी आश्वासनांचे गाजर व कागदी घोडे नाचवण्याशिवाय काहीच करत नाही. दरवर्षी कित्येक डॉक्टर, इंजिनियर, पदवीधारक पदवी घेऊन रोजगार मिळवण्यासाठी बाहेर पडतात. परंतु शेवटी त्यांच्या हाती नैराश्याशिवाय काहीच मिळत नाही. खाजगी नोकरी असो व शासकीय नोकरी येथील रिक्त पदांच्या एका जागेसाठी दहा हजार अर्ज प्राप्त झालेले असे बरेच उदाहरणं आहेत. देशांमध्ये एवढी मोठी गंभीर समस्या असतांना, प्रशासन व सत्ताधारी हातावर हात ठेवून गप्प बसले आहेत. एकमेकांवर टिका करण्यात सत्तेतले पाच वेर्षे कसे निघून जातात यांचं यांनाच कळत नाही. बघ्यांची भूमिका घेऊन बसलेले सत्तेमध्ये येताना विरोधकांच्या नाकर्तेपणाचे भांडवल करून सत्तेवर येतात व शेवटी ‘जैसे थे’ असाच प्रकार घडत असल्यामुळे कित्येक तरुणांना रोजगार मिळत नाही त्यामुळे आत्महत्येचे पाऊल उचलले जात आहे. भारत महासत्तेची स्वप्न पाहतोय. भारत मंगळवार यान पाठवून तेथे शोध मोहीम सुरू करून वेगवेगळे शोध लाव

कर्तव्यापासून दूर गेलेली पत्रकारिता

Image
कर्तव्यापासून दूर गेलेली पत्रकारिता लोकशाहीचा चौथा स्तंभ, लोकशाहीचा आरसा ज्याला दर्पण म्हणतो, त्या लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला लोकशाहीचा व कर्तव्याचा हल्ली विसर पडल्यासारखं वाटतंय. त्याचं कारण म्हणजे एक पाऊल जनतेच्या हितासाठी, अशी शपथ घेतलेल्या लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला आपण कशा प्रकारची पत्रकारिता, कशाप्रकारचे कर्तव्य बजावतोय, याचाच जणू विसर पडला आहे. उगाच लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर तोंडसुख न घेता खरंच त्याच्याकडून काही नकळत होत चुकांसाठी हा शब्दप्रपंच. अगदी थोडक्यात आणि स्पष्ट. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला देशात एक वेगळे स्थान आहे. त्याची एक वेगळीच ओळख आहे. ती ओळख निर्माण झाली ती त्याच्या कर्तव्यामुळे, तो त्या क्षेत्रात कार्य करत असल्यामुळे, लोकशाहीचा अर्थ आरसा, दर्पण. त्याच्याकडे पाहिलं की अन्याय झालेल्याला न्याय नक्कीच मिळणार आहे याचं समाधान असतं. त्याला मिळणारे समाधान हे पत्रकारितेत कार्यरत असलेल्या स्वच्छ पाण्याप्रमाणे, पारदर्शी कर्तव्य करणाऱ्या पत्रकाराकडून मिळते. पण हल्ली याची व्याख्या काही वेगळी झाली आहे, हा खरंच चिंतन करण्याचा विषय आहे. ज्या गोष्टी समाजाला पत्रकारांकडून