Posts

Showing posts from October, 2017

तरीही आत्महत्या थांबेनात …

Image
तरीही आत्महत्या थांबेनात शेतकऱ्यांच्या बाबतीत सर्वच घटकांनी संकटाची दारे उघडी करुन ठेवली आहेत. खरा शेतकरी, शेतमजुर बिचारा लाभापासून वंचित तर सालो साल झाली आहेच. परंतू दैनंदीतन जीवनातील संकटं काही पाठ सोवडवेनात. शेतकरी गरीब का असतो ? या प्रश्नाचं उत्तर का शब्दा काढला की लगेच मिळतो. कारण शेतकरी हा गरीबच असतो. देश कृषीप्रधान अन साऱ्या देशाला जवगवणाराच आज भिकारी झाला आहे. शेतकऱ्यांच्या बाजून निवडणुका आल्यावरच सर्वजन त्यांच्या समस्यांचं भांडवल करुन खुर्च्या बळकावतात. शेतकरी विवंचेने दाद मागयला गेल्यावर त्याला त्याच्या पार्श्वभागावर लाथ मारुन मोकळया हाताने परत पाठवण्याची मालिका पांढऱ्या कपडयातील माणूसकी संपलेली गटारातील किडे करत असतात. अंह ! हा शब्दा सुध्दा खुप वजनाचा आहे. तो त्यांना वापरणेही योग्य नाही. कारण माणसातला माणूस आज संपलाय. तो कुठेतरी पैशांना पैसा जोडण्यात गुंतलाय. अन असा गुंतलाय की दुसऱ्याच्या मुंडीवर पाय ठेऊन, इतरांचे नुकसान करुन, गोलमाल करुन, अवैध मार्गाने, भ्रष्ट परंपरेचाच अवलंब करुन पैसा जोडण्याची तयारीला लागला असल्यानेच शेतकऱ्यांच्या नशिबी शेवटी गोटाच आहे. शेतकऱ्यांना

लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावरच प्रहार ?

Image
लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावरच प्रहार ? खबरदार मोंदींवर टीका कराल तर, अशा शब्दात सायबर सेलने पत्रकार बांधवांना नोटीसा पाठवल्या. त्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली असल्यामुळे भाजप सरकार पत्रकारांना एवढे घाबरते व दुसरे म्हणजे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाच्या चमत्कार इथे पहावयास मिळतो. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभामुळेच आज देश सुव्यवस्थित टिकून आहे, शासनाची व्यवस्था टिकून आहे. शासन दरबारी होणाऱ्या बदलाचा विकासाचा, भ्रष्टाचाराचा वा इतर बाबींचा आढावा जनता दरबारी ठेवण्याचं काम लोकशाहीचा चौथा स्तंभ पत्रकार करत असतो. मात्र भाजप सकाराच्या काळामध्ये याच पत्रकाराच्या लेखणीवर दबाव आणण्याचे षडयंत्र वापरले जात असून लोकशाहीवरच प्रहार करणयाचं काम या सत्ताधाऱ्यांनी केला आहे. निश्चितच या घटनेचा तीव्र निषेध आहेच. परंतू अशा घटना होत असतील आणी जनता मात्र हातावर हात ठेवून बसत असेल तर एवढे दिवस, दिवसाचा, रात्रीचा, उन, वारा, पाउसाची तमा न बाळगता अहोरात्र पत्रकारांनी जनतेची सेवा केली त्याबाबत जनता मात्र काहीच बोलत नसून कोणात्याही प्रकारच्या अडचणीत सापडलेल्या पत्रकार बांधावांच्या बाजूने उठाव करत नसल्याने पत्रकार ब