ब्लॉग विषयी
देशभरामध्ये सामान्य, शेतकरी, शेतमजुर, विद्यार्थी, कामगार, गोरगरीब नागरीक
व इतर वंचित घटक अन्यायाला बळी पडत असल्याचे माझ्या अभ्यासादरम्यान निदर्शनास आले.
तसेच ही सत्यता माझ्याकडून पडताळली गेली. तेव्हा मी निशब्द झालो व भयान वास्तव डोळयासमोर
उभे राहिले. डोक्यातील विचार सैरावैरा डोक्यात तांडव करु लागले. अरे आपण शिकलो सवरलो
पण समाजासाठी काहीच नाही केलं. माझ्या जन्मानंतर मला जेंव्हा समाजातील चांगल्या वाईट
गोष्टींची जाणीव होऊ लागली, तेंव्हाच ठरवलं आपण कॉमन मॅनसारखं आयुष्य नाही जगायचं.
जागतिक पातळीवर काही तरी केलं पाहिजे. जेणे करुन आपलं कार्य आपल्या किर्तीरुपाने जगात
राहिल व त्या दिशेनं माझी वाटचाल मी सुरु केली आहे. या जगात विविध भाषेमधून, विविध
माध्यमांद्वारे अन्यायाला वाचा फोडण्याचं, न्याय मिळवून देण्यासाठी व समाजप्रबोधन करण्याचं
तसेच वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी अनेकांनी प्राणांची आहूती दिली आहे. कित्येक
क्रांतीकारकांनी या देशासाठी अन्यायाच्या विरोधात आपले बलिदान दिले व शहीद झाले. कित्येक
साहित्यीकांचे, समाजहितासाठी लढणाऱ्या समाजसुधारकांचे खूण करण्यात आले. लोकशाही देशामध्ये
नावालाच लोकशाही उरली आहे अशी भीती मनात वाटत होती. काही तरी समाजासाठी करण्याची धडपड
व उर्मी मला शांत बसून देत नव्हती. तेंव्हा कुठं निर्भिड ब्लॉगचा जन्म झाला. निर्भिड
लेखणीतून प्रकट झालेला प्रत्येक शब्द हा अन्याय करणांना आपली जागा व त्यांची औकात दाखवण्यासाठी
फार मोठे प्रभावी माध्यम ठरते. भल्याभल्यांना लेखणीने पाणी पाजले. याचाच उपयोग एक पाऊल
जनतेच्या हितासाठी म्हणून ब्लॉगचे निर्माते शंकर चव्हाण म्हणजे मी हा ब्लॉग निर्मिती
करुन त्यामाध्यमांद्वारे, आपल्या लेखणीतून आजवर निर्भिड लिखाण केले आहे. हे या ठिकाणी
आवर्जुन सांगावेसे वाटते. तसे पुरावे तुम्हाला ब्लॉगवरील दर्जेदार निर्भिड साहित्य
वाचल्यानंतर मिळतीलच. एखादा विषय हाती घेतला की, त्या विषयावर सखोल अभ्यासपूर्ण लिखाण
करणं व परखड शब्दांमध्ये शब्दांची उकल करुन अगदी सोप्या, प्रत्येक वाचकाला समजणाऱ्या
भाषेत मांडणी सदर ब्लॉगवर केली आहे. जेणेकरुन प्रत्येक वाचकाला अर्थ समजेल. या ब्लॉगच्या
निर्मातीमागे समाजहित हा निव्वळ हेतू डोळयासमोर ठेवून समाजामध्ये अमुलाग्र बदल करण्याचा
मानस आहे. या ब्लॉगच्या माध्यमातून निर्भिड लेखणी व कसलेही भय मनात न ठेवता निर्भिडपणे
धारदार शब्दांनी प्रहार करण्याचं काम सुरू केले आहे, त्यामुळे वाचकांच्या प्रतिक्रीयाच
पुढील दिशा ठरवतील.
Comments
Post a Comment