Posts

Showing posts from August, 2017

जातीवरुन लायकी ठरवणारा देश !

Image
जातीवरुन लायकी ठरवणारा देश ! घरातून बाहेर पडलं की, प्रत्येकाला समाजात वावरंत असतांना समाजामध्ये नवनविन माणसं भेटतात, नविन ओळख निर्माण करायची असेल तर प्रथम आपलं नाव सांगावं लागते, अर्थात स्वत:चा अल्पसा परिचय दयावा लगतो. ही खूप सामान्य व गंभीर बाब नसली तरी त्यापासून निर्माण होणाऱ्या भयावह संकटांना प्रत्येकाला सामोरे जावेच लागते. त्यात आपला देश अठरा पगड जातीचा, अन अठरा विश्व दारिद्रयात असला तरी, इतर देशांपेक्षा गरीब देश म्हणून ओळखला जातो व लोकसंख्येच्या बाबतीत सध्या तरी दुसरा क्रमांक लगतोय, तो पहिला ही होईल कारण लोकसंख्या एवढी झपाटयाने वाढत आहे की, त्याचा परिणाम हा सर्वसामान्य जनजीवन विस्कळीत झाल्याशिवाय रहात नाही. यंदाच्या वर्षी तरी देशात अमुलाग्र बदल होईल. सत्तापरिवर्तन केल्यास देश खरंच स्वतंत्र होईल. भेदभाव, जातीव्यवस्था, धर्मव्यवस्था, श्रेष्ठ, कनिष्ठ, गरीब श्रीमंत, हे असणारे भेद कमी प्रमाणात पहावयास मिळतील. पण नाही ! हे काही होणारच नाही, सक्षम पर्याय मिळावा,  याला काही मर्यादा असावी.  पण तेही नाही ! असो, असं मी कदापीही म्हणणार नाही. कारण शंभर टक्के प्रबोधन करायचं आणि शंभर टक्

सावधान ! आपली मुलं सैराट तर होत नाहीत ना !

Image
सावधान !  आपली मुलं सैराट तर होत नाहीत ना ! धावपळीच्या जीवनात व स्पधेर्र्च्या युगात टिकूण राहण्यासाठी पालकांना अतिशय कष्टयातनेतून आपला उदरनिर्वाह करावा लागतो. पाल्यांच्या शिक्षणासाठी पैसाच लागतो म्हणून पोटाला मारुन तारेवरची कसरत करावी लागत आहे. हे चालू असतांनाच हल्लीची तरुन पिढी पार बिघडून वाया चाललेली दिसून येत आहे, आपली संस्कृती, पालकांचे संस्कार, वडीलधाऱ्यांचा मान राखणे जणू हे सर्व विसरुनच गेले आहेत असंच वाटतं. कधी कधी तर समोरुन येणारा मुलगा आहे की, मुलगी हे ओळखणंच फार कठीण झालं आहे. त्याचं कारण म्हणजे आजकालची फॅशन, अंगप्रदर्शन वगैरे वगैरे. राहणीमाना सोबतच वागण्यातही मोठा परिणाम झालेला दिसतो. कधी काळी महिला वर्गाला चूल आणि मूल यापुढे काहीही करु दिलं जात नव्हतं. मात्र लोकशाही राज्यात स्वातंत्र्याचा एवढाही दुरूपयोग कधी कुठं झाला असेल तर तो फक्त भारतातच. स्वातंत्र्य असावं, याला विरोध नाही पण स्त्री वर्गाने व पुरूष वर्गाने त्याचा वापर चांगल्या कामासाठी केला तर स्वत:साठी व देशहीतासाठी व आपल्या पालकांसाठी वरदान ठरेल. गेल्या काही वर्षांपासून अल्पवयीन प्रेमप्रकरणे, घरातून पळून

व्हाट्सअँप, फेसबुकमुळे दूर गेलेल्या मित्रांना लुडोने एकत्र आणले, पण, लुडोच्या वेडया नादापाई मैत्रीचं नातं जुगारात गुंतले.

Image
व्हाट्सअँप, फेसबुकमुळे दूर गेलेल्या मित्रांना लुडोने एकत्र आणले, पण, लुडोच्या वेडया नादापाई मैत्रीचं नातं जुगारात गुंतले. चहाच्या टपरीवर, भिंतीच्या कठडयावर, रस्त्यांच्या दुभाजकांवर, बगीचामध्ये, मिळेल त्या ठिकाणी दोन मित्र किंवा चार मित्रांनी मिळून खेळायचा हा मोबाईल खेळ हल्ली सर्रास पहावयास मिळतोय. जिकडं नजर जाईल तिकडं टाईमपास म्हणून, पैसे लावून अर्थात जुगारच अशा प्रकारे हा खेळ खेळणार मित्र समूह पहावयास मिळतोय. व्हॉट्सॲप, फेसबुक व इतर सोशल मिडीयामुळे मोबाईलमध्ये डोकं घालून एकटं एकटं अनेक ठिकाणी बसलेली मंडळी आपण अनेक ठिकाणी पाहिली असेल. मित्र मित्र एकमेकांच्या शेजारी बसून सुध्दा मोबाईल मधील सोशल मिडीयाच्या अति वापरामुळे एकमेकांकडे पहायला सुध्दा वेळ नव्हता बोलण्याचा प्रश्न तर दूरच. अशा प्रकारे लागलेला नाद आता लुडो  नामक मोबाईल खेळामुळे मैत्रीमधील भिंत आता पार कोसळली असून मित्रांना एकत्र आणण्याचं काम या खेळाने नक्कीच केलं आहे. मात्र या खेळाचे रुपांतर आता मैत्रीच्या नात्यापलीकडं गेलं असल्यामुळे एक वेगळीच भिती निर्माण झाली आहे. कारण हा खेळ आता खेळ राहिला नसून तो आता पैशांवर

आधी मन स्वच्छ करा, देश आपोआप स्वच्छ होईल !

Image
आधी मन स्वच्छ करा , देश आपोआप स्वच्छ होईल ! आपल्या देशाचं दुर्देव एवढंच आहे की , आपल्या देशात स्वच्छताविषयी जनजागृती करावी लागते . देशात घाणीच्या पसरलेल्या व बरबटलेल्या शहरांमुळे मानीव आरोग्यावर हानीकारक परिणाम होतोय तरी देशातील अस्वच्छता काही नाहीसं होण्यास तयार नाही . देश स्वच्छ करण्यासाठी अभियान राबवावे लागतात , जनजागृती करावी लागते . ही देशासाठी कौतुकाची नाही तर मान खाली घालण्याची बाब आहे . स्वच्छता बाळगा , कचरा इतरत्र टाकू नका , येथे थुंकू नका , कचरा पेटीचा वापर करा , शौचालयाचा वापर करा वगैरे वगैरे पाटया या देशात लावल्या जातात . हे काम ग्रामपंचायत , नगर पालीका , महानगरपालिका व इतर सबंधीत कार्यालयांना करावे लागते . जिथं करुन नका अशा नावाची पाटी लिहिलेली असते त्या ठिकाणी मुद्दाम आपल्या देशातल जनता तिथं उलट पध्दतीने काही तरी विरोध दर्शवुन विकृती केल्याशिवाय रहात नाही . स्वच्छ भारत अभियानावर आपल्या देशामध्ये कोटयावधी रुपये खर्च होतो . परंतू जनतेला त्याचा काहीही फरक