Posts

Showing posts from March, 2017

साहेब ! मी शेतकरी बोलतोय …

Image
साहेब ! मी शेतकरी बोलतोय …   साहेब ! मी शेतकरी बोलतोय … रोज रोज शेतात राब राब राबतोय कितीही मेहनत घेतली तरी पोटाला आर्धीच खातोय वाटलं होतं ऐकेल कोणी माझी हाक होईल कोणी माझ्या आयुष्याच्या प्रगतीचं चाक पण मला आजवर सगळयांनी दिला ठेंग्याचा हात माझ्याविषयी सगळयांच्या मनात पापच पाप पोटभर खाऊन ढेकर देता तुम्ही शिळया तुकडयावरच दिवस काढतो आम्ही असाच संसाराचा गाढा हजारो वर्षे ओढतोय साहेब ! मी शेतकरी बोलतोय … दुष्काळ आला, त्याला पाहुणा समजुन पाहुणचार केला सावकार आला, त्याचाही खिसा भरता केला अजुनही बँकाची कर्ज फेडतोय साहेब ! मी शेतकरी बोलतोय … एसीत बसुन आमच्यासाठी संघर्षाचं नका घेऊ सोंग संघर्ष तर आम्ही करतोय, नका करु तुम्ही नुसतंच ढोंग दुपारचा सुर्य डोक्यावर घ्या मग कळेल तुम्हाला आम्ही कसे कष्ट करतोय साहेब ! मी शेतकरी बोलतोय … मंत्रालयात बसुन फक्तं बोलनं असतं लई सोप्पं कितीही खोटी आश्वासनं दिले तरीही आम्ही आजवर गप्पं आम्ही काय गुन्हा केला तुमच्याकडं नाही पैका आमच्यासाठी एकतरी आयोग लागू करा, एवढं तुम्ही ऐका पोराच्या शिक्षणापाई आज सुध्दा मी आनव

लोकशाहीच्या बेड्या …

Image
लोकशाहीच्या बेड्या … गुन्हा केल्यास कायद्यानुसार एखाद्या आरोपीला गुन्हा सिध्द झाल्यानंतर बेडया घालून न्यायालयाने जी शिक्षा सुनावली आहे ती शिक्षा भोगण्यासाठी आरोपी कुठेही पळून जाऊ नये व तो आरोपी पोलीसांच्या ताब्यात असावा यासाठी पोलीस कायद्याच्या बेडया गुन्हेगाराला घालतात. हया झाल्या कायदयाच्या बेड्या. पण लोकशाहीच्या बेडया म्हणजे जरा वेगळंच प्रकरण आहे. लोकशाही म्हणजे लोकांनी, लोकांच्या हिताकरिता, लोकांकरीता चालवलेले राज्य   म्हणजे लोकशाही. पण असे आहे का आपल्या देशात ? जिसकी लाठी उसकी भैंस असाच प्रकार पहावयास मिळतोय. लोकशाही राज्यामध्ये हुकूमशाहीची चाहूल लागतेय असं जनता व्यक्त होत आहे. इंग्रज भारतातून परत गेल्यानंतर पासूनचा काळ पाहिला असता लोकशाहीच्या नावाखाली फक्त आणि फक्त जनतेची पिळणूक, राजकिय तसेच शासकिय घोटाळे, मनमानी कारभार, अरेरावी, गुंडागर्दी, खून, दंगे अशा प्रकारच्या अंडरवर्ल्ड साम्राज्याचा विस्तार मोठया प्रमाणात वाढला आणि अजूनही प्रचंड गतीने वाढतोय. कोणताही पक्ष किंवा व्यवस्था याला थांबवू शकत नाही. कितीही सज्जन असल्याची चादर पांघरली तरी. हे वास्तव आहे. आजवर सत्ता मिळवण्

अरे गुंडांनो विचार मारता येतात का ?

Image
अरे गुंडांनो विचार मारता येतात का   ? लोकांना व्यक्ती स्वातंत्र्य असल्यामुळे लोकशाहीचा असाही दुरूपयोग होतोय. मुळात या देशात लोकशाही नसून गुंडशाही चालू आहे. फक्त नावालाच लोकशाही. देशाची व्यवस्थाच चुकीची आहे असंच मी म्हणेन. गुन्हेगाराला सोडून निर्दोशालाच सजा देण्याचं काम गुंडशाहीच्या माध्यमातून व्यवस्था करत असल्याचे समजते. धिक्कार आहे अशा लोकशाहीचा व असल्या व्यवस्थेचा. गुन्हेगाराला पोसणं यात करसली आलीय लोकशाही. मनाला वाटेल तेव्हा निर्णय घ्यायचे. मनाला वाटेल तेव्हा गुन्हेगाराला निर्दोष सोडून दयायचं. गुंडाना मोकाट सोडून त्यांना वेगळा कायदा व सर्वसामान्यांना वेगळा कायदा याला मी तर हुकूमशाही व ढिसाळ राज्यकारभार चालवणारी यंत्रणाच म्हणेल. किती दिवस झाले कोपर्डी प्रकरणाला. साधं राज्याचे मुख्यमंत्री या प्रकरणाविषयी गंभीर नाहीत. निवडणुकीमध्ये मग्न असून राजकारण करण्यापुरते जुने प्रश्न उपस्थित करुन त्याला उजाळा देवून तेच तेच प्रश्न उपस्थित करुन राजकारण करायचं. विट आलाय या सगळया गोष्टींचा. दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी आणि आता जेष्ठ आंबेडकरवादी लेखक डॉ. कृष्णा किरवले यांचा खून झाला. मारेकऱ्यां