Posts

Showing posts from 2016

“सेल्फी विथ विशाल”

Image
“ सेल्फी विथ विशाल ” डोळयांना एखादी चांगली बाब दिसली की सेल्फीचा मोह कोणालाच आवरत नाही. स्मार्टफोन आणि सेल्फी (स्वयंप्रतिमा) या दोन्ही गोष्टींच्या संसाराचा गाढा ओढून आनंद प्रत्येकजण उपभोगत असतोच. पर्यटन स्थळी, नेते, नायक, नायिका, वेगवेगळया क्षेत्रातील कलाकार यांच्यासोबत सेल्फी घेतलेल्या आपण आजवर आपण बऱ्याचदा पाहिल्या. पण साऱ्या जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्यांसोबत आजपर्यंत सेल्फी घेतांना कोणाला पाहिलं आहे का ? तुम्हाला वाटलंच असेल की हा नक्की विशाल कोण ? तो विशाल कोण आहे हे सांगण्यासाठीच हा शब्दप्रपंच मी आपणासमोर थोडक्या शब्दांमध्ये मांडत आहे. ज्या दिवशी विशाल नावाचा मुलगा मला भेटला तेव्हा मलाही कॉमन मॅन प्रमाणे सेल्फीचा मोह आवरता आलाच नाही. विशाल हा एका शेतकरी कुटूंबातील असून तो एका शेतकरी शेतमजुराचा मुलगा आहे. सध्या तो इयत्ता आठवी वर्गात शिकत आहे. घरची परिस्थीती प्रत्येक शेतकरी व शेतमजुरांच्या कुटूंबाप्रमाणेच हालाखीची. इयत्ता आठवीत शिकणाऱ्या या बालकाचे स्वप्नं व जिद्द पाहिली असता बऱ्याच गोष्टी अशा आहेत की, आयत्या पिठावर रेघोटया मारणारांच्या नक्कीच तोंडात बोट जाईल व शरमेने

बळीराजाची होतेय दिशाभुल अन् सरकारचं चालूय ‘आठ हात लाकूड, नऊ हात धलपी’ काढण्याचं काम

बळीराजाची होतेय दिशाभुल अन् सरकारचं चालूय ‘आठ हात लाकूड, नऊ हात धलपी’ काढण्याचं काम' शेतकऱ्यांना , कामगारांना व सर्वसामान्य भोळयाभाबडया जनतेला खोटी आश्वासनं देऊन गेली पन्नास वर्षे पुढाऱ्यांनी गादया मिळावल्या . विकासाच्या नावचा पत्ताच नाही , निवडणुक जवळ आली की नेतेमंडळीचा शहणपणा जागा होतो . गल्ली बोळांपासून ते झोपडपट्यांपर्यंत पायातली जोडे झिजवुन ही लोकं घर ना घर पिंजून ‘ मतं दया ’ च्या नावाखाली काढतात . निवडुन आल्यानंतर व निवडणुकीपुर्वीची गत म्हणजे निवडणुकीपुर्वी मतं मागायला येणारी पुढारी मंडळी ही तेहतीस कोटी देवांची माता ‘ गाय ’ (Cow) च्या रुपात येतात अन् निवडणुकीत विजय प्राप्त झाल्यानंतर त्यांचे ‘ वाघाच्या ’(Tiger) रुपात प्रवेश होतो . मत मागायला आपलेल्या नेत्यामध्ये जी नम्रता असते ती निवडणुकीत निवडून दिलेल्या नेत्यामध्ये नसते , असते ती फक्त उध्दट डरकाळी . असो , गेले ते दिवस अन् राहिल्या त्या फक्त आठवणी , अशा गोष्टींच्या इतिहासाचा अभ्यास करण्यात काही अर्थ नाही . आत्ता वेळ आहे