Posts

Showing posts with the label प्रशासकीय कौतुक

नेहमीच पोलीसांना का दोष द्यायचा ?

Image
कायदा व सुव्यवस्था जपणारं खातं, जनतेच्या सरंक्षणाची जबाबदारी असणारं खातं, उन, वारा, पाऊस याची तमा न बाळगतां दिवसाचे चोवीस तास जनतेच्या सेवेत तत्पर असणारं पोलीस खातं, सण वार विसरुन कर्तव्यदक्षतेचं उत्तम उदाहरण म्हणजे पोलीस खातं. देश म्हणजे आपण व आपली सेवा व संरक्षण करण्याचं पुण्यकर्म पोलीस विभागाकडे सोपलं आहे. पोलीस शिपायापासून ते अधिकाऱ्यांपर्यंत खाकी वर्दी दिली आहे ज्या वर्दीमध्ये ‘सत्य’ व गुन्हेगाराला ‘थरकाप’ उडेल अशी शक्ती आहे व त्यापेक्षाही शक्ती ही आपल्या सर्वसामान्य जनतेमध्ये एक असामान्य ताकद आहे. पण हल्ली जनतेच्या वर्दीला सर्दी झालेली दिसते. खून, चोऱ्या, बलात्कार, आत्महत्या, मोर्चे, संप, सांस्कृतिक, धार्मिक, राजकिय कार्यक्रमांचा बंदोबस्त ही सर्व कामे पोलीसांवर सोपवलेली आहेत. त्यासाठी रात्री बेरात्री देशसेवा करणारा जवान आज बोटावर मोजणाऱ्या पोलीस खात्यातीलच काही पोलीस कर्मचाऱ्यांमुळे बदनाम होत आला आहे. लाच घेणे, पिळवणूक करणे, खोटे गुन्हे दाखल करण्यात मदत करणे, विनाकारण दबाव आणून खंडणीस्वरुपात पैशांची मागणी करणे, राजकिय लोकांच्या पुढे गोंडा घोळून त्यांच्या मनमानीप्रमाणे वागून...