Posts

Showing posts from January, 2017

'ई' कचरा वाढतोय...

Image
'ई' कचरा वाढतोय... जगात तंत्रज्ञान विकसित झाल्यामुळे सर्वच गोष्टी आता पेपरलेस झाल्या आहेत. दिवसेंदिवस जग प्रगतीपथावर जात आहे. ही एक अभिमानाची बाब असू प्रत्येक देशाचा विज्ञान युगात तंत्रज्ञान विकासात भर टाकणे ही अभिमान बाळगण्याची गोष्टी असल्याने युगे युगे ही डिजीटल टेक्नाॅलाॅजी प्रगतीच करेल यात शंक्का नाही. स्मार्ट फोन च्या दुनियेत, इंटरनेच्या अवाढव्य वाढलेल्या जाळयामध्ये सर्वच गोष्टी सोईच्या झाल्याने सर्व कामे अगदी पटा पटा होवू लागल्या आहेत. एकमेकांशी संवाद साधन अधिकच सोपे झाले आसल्याने जगात कोठेही असो संवाद मात्र चालूच आहे. साधारणतः मोबाईलवर इंटरनेट प्रणाली गतिने चालू झाल्यापासून सर्वच गोष्टींचा अतिरेक वाढल्याचे आढळून आले. गेल्या काही वर्षांपासून इंटरनेचा जास्तीत जास्त वापर हा सोशन मिडीयासाठी जास्त व दैनंदिन कामासाठी काहीशाप्रमाणात होत असतांना दिसतोय. माणसाला एका जागेवरुन न उठता सर्वच गोष्टी इंटरनेटमुळे जागच्या जागी मिळू लागल्याने माणूस तसा आळशी झाला आहेच. सोबतच सोशन मिडीयावर तसेच ईमेलींग माध्यमाद्वारे माहतीची देवाणघेवाण होत असल्याने व त्याचा अतिरेक होत असल्याने ई कच

"मोदीराज चांगभलं" ...

Image
"मोदीराज चांगभलं "... भाजप सरकारने हल्ली जनतेमध्ये स्वतःचा विश्वास संपादन करण्याचं काम सुरु केलं आहे . ते असं की भाजप सरकार कामगिरी दमदार असे बोलून भाजप सरकारचा जाहिरात बाजीवर प्रचंड   प्रमाणात खर्च करुन उधळपटटी करण्याचं काम सध्या सुरु आहे . भाजप सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेतला हे खरे आहे पण या ऐतिहासिक निर्णयामध्ये सर्वसामान्य जनतेचं वाटोळं आणि पैसेवाल्याचं चांगभलं झालं हे स्पष्ट . यात काही टिकात्मक भुमिका नाही वा पक्षविरोध नाही . पण सत्य परिस्थिती लक्षात घेता हल्ली देशभरामध्ये नोट   बंदीमुळे बॅंकाच्या पाय - या झिजवले कोणी ? तर ते   सर्वसामान्य गोरगरीब जनतेनं . बॅंकाच्या मागच्या दरवाज्यातून भल्या भल्यांनी आपली गाठोडी रातोरात बदलून घेतली . बॅंकेतील कर्मचा - यांना हातशी धरुन आपल्या ताकतीचा दुरुपयोग ज्यांच्याकडं काळा पैसा आहे त्यांनी केला . मोदींच्या या ऐतिहासिक हजार पाचशेच्या नोटा बंदी केल्यामुळे व दोन हजाराच्या व पाचशेच्या नविन नोटा छपाई खर्च व कागदाचा

बळीराजाच्या आत्महत्येला कृषी सेवा केंद्र व महावितरण सुध्दा जबाबदार ?

Image
बळीराजाच्या आत्महत्येला कृषी सेवा केंद्र व महावितरण सुध्दा जबाबदार ? विदयुत दर आकारणी महावितरण कंपनीने अतिरिक्त व अगाऊचे बिलं देऊन कहर केलाय तसेच उधारीच्या व सवलतीच्या नावाखाली खतं, बी-बियाण्यांच्या मागं अर्ध्याहून अधिक कमाई करुन दिन दुबळया बळीराजाला लुटण्याचा प्रकार निश्चितच वाढला असल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. कृषी सेवा केंद्रांकडून दुप्पटीने लुट तर महावितरणकडून अतिरिक्त बिलं देऊन गळा घोटण्याचा प्रकार  अगदी तारेवरची कसरत करुन पोटाची खळगी भरण्यासाठी, लेकरांची शिक्षणं, कुटूंबाचा उदरनिर्वाह, मुक्या जनावरांचा सांभाळ, नैसर्गिक संकटं यातून पायपीट करुन, मार्ग काढून अनेक संकटांना तोंड देत कृषीप्रधान भारत देशात लाखोंचा पोशिंदा म्हणून ओळख असणारा बळीराजा आपले स्वत:चे हाल करुन इतरांना आजवर जगवत आला आहे. पण त्याच्याच वाटयाला दु:खाचे भोग आले आहेत. त्या होणारी पिळवणूक, त्याला फसवणारे दुष्टजन यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यात म्हणजे शेतीसंबंधीत सेवा पुरवणारे कृषी सेवा केंद्र व विदयुत पुरवठा करणारी महावितरण कंपनीचा सिंहाचा वाटा दिसतो याच शंकाच नाही असे या ठिकाणी आवर्जुन सांगावेसे