Posts

Showing posts with the label आक्रोश

बलात्कारांचा कहरच कहर ...

Image
आज दोन घटना समोर आल्या, एक मुंबईत बलात्कार झाला आणि दुसरीकडे पुण्यात अल्पवयीन मुलीवर दोन बलात्काराच्या घटना घडल्या या बालात्काराच्या घटना अतिशय भयंकर होत्या. सदर घटना माणुसकीला काळीमा फ ासणार्‍या आहेत. अमानुषपणे केले जाणारे अत्याचार दिवसेंदिवस वाढतच आहेत. पुण्यामध्ये एका 14 वर्षीय मुलीवर अत्याचार केले या घटनेचा विसर पडला नाही तोवरच दुसरी बलात्काराची धक्कादायक घटना घडते. हे किती दुर्देव आहे. नराधमांनी सहा वर्षाच्य चिमुकलीवर सामुहिक अत्याचार केल्याची घटना पुण्यामध्ये घडली. पुण्यात रेल्वे स्टेशनच्या फुटपाथवर झोपलेल्या आईच्या कुशीतून उचलून नेवून तिच्यावर सामुहीक अत्याचार झाला. मुंबईमध्ये तर याहीपेक्षा विचित्र व धक्कादायक प्रकार घडला. ही अतिशय निंदनीय घटना आहे. एका तीस वर्षीय पीडीतेवर बलात्कार करुन तिच्या गुप्तांगामध्ये रॉड घुसवला. र्‍ह्दय पिळवटून टाकणारी अशी ही घटना साकीनाका परिसर मुंबई याठिकाणी घडली. राज्यात महिला तर सुरक्षित नाहीतच. बलात्कारांच्या वाढत्या घटनांमुळे राज्यात व देशात वासनांध व व्यसनांध झालेल्या नाराधमांकडून बलात्काांच्या अपराधाचे सत्र  कमी होतांना दिसून येत नाही. माणुसक...

पोरगं हाटेलात तुपाशी, अन् मायबाप रानात उपाशी ! ...

पोरगं हाटेलात तुपाशी,  अन् मायबाप रानात उपाशी ! ... पोटाची खळगी भरण्यासाठी बाप शेतात राब राब राबतोय, कृषीप्रधान देशात शेतकरी अर्ध्या पोटावर, आनवाणी पायानं     चालतोय, का ? तर, आपल्या मुलांनी शिकावं, खुप मोठं व्हावं म्हणून. पण देश जसाजसा महासत्ता होत आहे ? तसं तसं देशतील परिस्थिती मात्र   हाताबाहेर जातांना दिसत आहे. आई वडील आपल्या पाल्याला शिक्षणासाठी वाटेल तेवढे पैसे पुरवठा करतात, वाटेल तशी हौस करतात, लाड करतात, कसल्याही प्रकारची कमतरता भासू देत नाहीत, का? तर आपला मुलगा-मुलगी शिकावी, मोठा अधिकारी व्हावेत व आपल्या घरची परिस्थीतीमध्ये बदल करावा. गरीबी दुर करावी, आई वडीलांची हालाखीची परिस्थिती बदलून टाकावी. शेतकर्‍यांशिवाय इतर पालकांचीही या पिढीनं हीच अवस्था करुन ठेवली आहे आणि त्यात भर म्हणजे सेन्सॉर बोर्डच्या कृपाशिर्वादामुळे अख्खा देश बरबाद करुन ठेवला आहे. तो कसा ? देशात काय प्रकाशित व्हावं व काय होऊ नये यासाठी काही बंधनं असावेत, देशात ब्रॉडकास्टींग व्यवस्था, मिडीया यांनी काय प्रसार करावा व काय करु नये यासाठी परवानाग्या देण्याचं काम सेन्सार बोर्ड व ब्रॉडका...

तरुणाईचा संघर्ष

तरुणाईचा संघर्ष आयुष्यामध्ये तीन गोष्टींसाठी संघर्ष करावा लागतो. जगण्यासाठी, स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी व ओळख टिकवण्यासाठी. पण हे सर्व होण्याआधी काहीतरी उदरनिर्वाह करण्याचे साधन असणे अत्यंत गरजेचे असते. जेणेकरुन हया तीन गोष्टींचा संघर्ष पूर्ण होऊ शकेल. ते म्हणजे नोकरी, व्यवसाय किंवा इतर अन्य माध्यम तरुणांकडे असायला हवे. ‍नोकरी मिळवण्यासाठी ती करण्यासाठी व टिकवण्यासाठी, आज देशामध्ये तरुणाईला अत्यंत तारेवरची कसरतच करावी लागत आहे, तिथं मग शासकीय असो किंवा खाजगी. अतिशय हालाखीच्या स्थितीमधून जावून संघर्ष करावा लागत आहे. लोकसेवा आयोग राज्यपातळीवर व देशपाळीवर स्पर्धा परिक्षांच्या माध्यमातून अनेक रिक्त पादांच्या भरतीसाठी परीक्षा घेतं.  पण तिथं एवढी मोठी स्पर्धा असल्यामुळे सर्वांनाच नोकरी मिळेल असे नाही. पैकी दरवर्षी संघ लोकसेवा आयोगामार्फत हजाराच्या आसपासच अधिकारी म्हणून तरुण-तरुणींची निवड होत असते. तसेच महाराष्ट्र व अन्य राज्यांच्या राज्य आयोगांमार्फत रिक्त पादांच्या भरतीसाठी पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षा व नंतर मुलाखत या प्रक्रियेद्वारे भरती करण्यात येते मात्र या भरतीची सरासरी...

अन् पुन्हा एकदा ‘ती’ नकोशी झाली …

Image
अन् पुन्हा एकदा ‘ती’ नकोशी झाली … ज्याच्याकडं आई नाही त्याच्याकडं काहीच नाही, ‘आ’ म्हणजे आत्मा आणि ‘ई’ म्हणजे ईश्वर. एखादी स्त्री जेव्हा अपत्यास जन्म देते त्यावेळेस तिला मातृत्व प्राप्त होते आणि समाजाच्या दृष्टीने ती त्या अपत्याची आई बनते. आई हा शब्द जीवंत व्यक्तींच्या भावनाशी निगडीत असा शब्द आहे. त्यामुळे आईला जगात सर्वश्रेष्ठ मानले जाते. ज्याच्याकडे आई नाही त्याला जाऊन विचारा आईची किंमत काय असते. मातृत्व ज्या स्त्रीला मिळाले तीला जाऊन विचारा मातृत्व स्विकारल्यानंतर त्यात तिला कसले समाधान वाटते. मराठीतील प्रसिद्ध कवी यशवंत यानी आपल्या कवितेत "स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी " ही ओळ लिहून आई या शब्दाची व्याख्या जगासमोर मांडली आहे, परंतू ही मातृत्वाची जाणीव एकीकडे व महाराष्ट्रातील बीड जिल्हा पुन्हा एकदा हादरला आहे. कारण, इथं मातृत्वाला काळीमा फासणारी या महिन्यातील दुसरी घटना घडली, चक्क आईने जिच्या विना जीवनाची सुरूवातच होत नाही, अशा एक वैरीणीने आपल्या दोन दिवसाच्या स्त्री अर्भकाला बाभळीच्या काटयाच्या आळयामध्ये टाकून दिले. अरे ! हे काय ऐकतोय ? असा प्रकार ऐकायला सुध्दा ...

तुमचं समदं खरं हाय ! पण माझं काय ?

Image
तुमचं समदं खरं हाय ! पण माझं काय ? माननीय महोदय तुमचं सारं काही खरं झालं, माझा महाराष्ट्र, माझा देश हा विकासाच्या उंबरठ्यावर आहे. असं तुम्ही जाहिरातींमधून आम्हा शेतकऱ्यांना सांगता. पण, मला या विकास जो काय असतो त्याबाबत थोडं मन मोकळं करायचं आहे. माझं काहीच भांडण नाही तुमच्याशी. पण, तुम्ही म्हणता शेतकऱ्यांचा विकास झाला, तुम्हाला कुठे दिसला हो शेतकऱ्याचा विकास ? तुम्ही साधी कर्जमाफी करायला, अभ्यास करत बसला होता ! खरंच अभ्यास करण्याने कर्जमाफीचा गुंता सुटला का हो  ? तुम्ही बुलेट ट्रेन, विमानसेवा, रेल्वे सेवा, रस्ते, उड्डाणपूलं वगैरे वगैरे, विकासाच्या बाता करता. पण, माझ्या अंगावरचे मळकटलेले कपडे मात्र अजूनही बदलले नाहीत. याला आपण खरंच विकास म्हणणार का हो ? मला एक सांगा !  शेतीमालाला भाव देण्यासाठी मला प्रतिवर्षी संघर्ष करावा लागतो. त्याचा तिढा आजपर्यंत एकही प्रतिनिधी सोडवू शकला नाही. खत बियाणे घ्यायचं म्हटलं की, दरवर्षी मला पहिल्या वर्षांपेक्षा जास्त दराने मिळतात. याचा गंभीर्याने विचार तुम्ही कधी केलाय का ? महोदय, आम्हा शेतकऱ्यांना शेतीव्यतिरिक्त इतर काहीही उत्पन्न नाही,...

माणुसकी हरवलेला माणुस ...

Image
माणुसकी हरवलेला माणुस ... माणसाच्या शरीराचा विचार केल्यास त्याच्या शरीराला चालना देणारा मेंदू हा सर्व प्रक्रियांना जबाबदार असतो . त्याचे मुख्य कारण म्हणजे त्याची नियंत्रण व्यवस्था ही मेंदूद्वारे चालते . समाजामध्ये वावरत असतांना या मेंदूचा कोणत्या ना कोणत्या घटकाची संबंध येतोच . या मेंदूचे लक्ष सकारात्मक व नकारात्मक आहे हे कळते . काहीसं माणुसकीचा माणुसकीच्या शब्दांमध्ये बेरीज - वजाबाकी होतेच , परंतु माणूस या मेंदूचा उपयोग निगेटिव चालना देण्यासाठी जास्त वापरतो . या निगेटिव पावरचा समाजामध्ये विपरीत परिणाम होणारच . स्वतःचे अस्तित्व टिकवायचं की घालवायचं हे या मेंदूवर अवलंबून असते . आपल्याकडे या मेंदूचाच फारसा प्रमाणामध्ये दूरुपयोग होताना दिसतोय . आपल्या देशाची संरक्षण व्यवस्था ही काही प्रमाणात या मेंदूसारखे काम करत असते . अर्थात पोलिस यंत्रणा . मला पोलिस यंत्रणेच्या चांगल्या कामाबद्दल बोलायचे असल्यास नक्की अभिमान वाटेल पण नकारात्मक गोष्टींचा लेखाजोखा जर पाहिला तर शरमेनं मान ...