लाखोंचा पोशिंदा जगलाच पाहिजे …..
लाखोंचा पोशिंदा जगलाच पाहिजे ….. पहाटे पहाटे जीवा शिवाची बैल जोडं …… असं गाणं म्हणत चार पाच च्या सुमारास गणपत रोज उठायचा , नांगर घेऊन शेतात नांगरत असे , लवकर लवकर शेतातलं काम आटोपून , आपल्या बैलजोडीला वैरण काडी करुन , बरोबर सात वाजता घरी यायचा हात पाय धुवायचा अन् बायकोला म्हणलायचा अगं ए कारभारणी रातीचं पिठलं अन् शिळी भाकर हाय का ? बाको लाडात येऊन म्हणायची आवं कारभारी आहे त्या दुरडीत घ्या अन रानातच जाऊन खावा . भाकरी आणि रातीचं पिठलं घरच्यापरीस रानातच गोड लागतय . हसून खेळुन दिवस जायचे . घरची सुखाची मीठ भाकरी खाऊन गणपत व त्याची कारभारीन सुखानं संसाराचा गाढा ओढत होते . रानात सगळीकडं हिरवळ पहावयास मिळायची वेळेवर पेरण्या व्हायच्या , वेळेवर शेतातली सर्व कामे आटपायची , शेतात पिकवलेला माल तातडीने आडती दुकानादारांडे नेऊन विकून त्यात मिळालेला पैका पाहिजे तेवढा वर खर्चासाठी ठेऊन उरलेला जीभेला आवर घालून , काळजाला कुलूप लावून पुढील आयुष्यासाठी जतन करुन बँकेत ठेवायचा . ...