“सेल्फी विथ विशाल”
“ सेल्फी विथ विशाल ” डोळयांना एखादी चांगली बाब दिसली की सेल्फीचा मोह कोणालाच आवरत नाही. स्मार्टफोन आणि सेल्फी (स्वयंप्रतिमा) या दोन्ही गोष्टींच्या संसाराचा गाढा ओढून आनंद प्रत्येकजण उपभोगत असतोच. पर्यटन स्थळी, नेते, नायक, नायिका, वेगवेगळया क्षेत्रातील कलाकार यांच्यासोबत सेल्फी घेतलेल्या आपण आजवर आपण बऱ्याचदा पाहिल्या. पण साऱ्या जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्यांसोबत आजपर्यंत सेल्फी घेतांना कोणाला पाहिलं आहे का ? तुम्हाला वाटलंच असेल की हा नक्की विशाल कोण ? तो विशाल कोण आहे हे सांगण्यासाठीच हा शब्दप्रपंच मी आपणासमोर थोडक्या शब्दांमध्ये मांडत आहे. ज्या दिवशी विशाल नावाचा मुलगा मला भेटला तेव्हा मलाही कॉमन मॅन प्रमाणे सेल्फीचा मोह आवरता आलाच नाही. विशाल हा एका शेतकरी कुटूंबातील असून तो एका शेतकरी शेतमजुराचा मुलगा आहे. सध्या तो इयत्ता आठवी वर्गात शिकत आहे. घरची परिस्थीती प्रत्येक शेतकरी व शेतमजुरांच्या कुटूंबाप्रमाणेच हालाखीची. इयत्ता आठवीत शिकणाऱ्या या बालकाचे स्वप्नं व जिद्द पाहिली असता बऱ्याच गोष्टी अशा आहेत की, आयत्या पिठावर रेघोटया मारणारांच्या नक्कीच तोंडात बोट जाईल व शरमेने...