“सेल्फी विथ विशाल”
“सेल्फी विथ विशाल”
डोळयांना
एखादी चांगली बाब दिसली की सेल्फीचा मोह कोणालाच आवरत नाही. स्मार्टफोन आणि सेल्फी
(स्वयंप्रतिमा) या दोन्ही गोष्टींच्या संसाराचा गाढा ओढून आनंद प्रत्येकजण उपभोगत असतोच.
पर्यटन स्थळी, नेते, नायक, नायिका, वेगवेगळया क्षेत्रातील कलाकार यांच्यासोबत सेल्फी
घेतलेल्या आपण आजवर आपण बऱ्याचदा पाहिल्या. पण साऱ्या जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्यांसोबत
आजपर्यंत सेल्फी घेतांना कोणाला पाहिलं आहे का ? तुम्हाला वाटलंच असेल की हा नक्की
विशाल कोण ? तो विशाल कोण आहे हे सांगण्यासाठीच हा शब्दप्रपंच मी आपणासमोर थोडक्या
शब्दांमध्ये मांडत आहे. ज्या दिवशी विशाल नावाचा मुलगा मला भेटला तेव्हा मलाही कॉमन
मॅन प्रमाणे सेल्फीचा मोह आवरता आलाच नाही. विशाल हा एका शेतकरी कुटूंबातील असून तो
एका शेतकरी शेतमजुराचा मुलगा आहे. सध्या तो इयत्ता आठवी वर्गात शिकत आहे. घरची परिस्थीती
प्रत्येक शेतकरी व शेतमजुरांच्या कुटूंबाप्रमाणेच हालाखीची. इयत्ता आठवीत शिकणाऱ्या
या बालकाचे स्वप्नं व जिद्द पाहिली असता बऱ्याच गोष्टी अशा आहेत की, आयत्या पिठावर
रेघोटया मारणारांच्या नक्कीच तोंडात बोट जाईल व शरमेने मान खाली. मागील एक वर्षापासून
शेतामध्ये रोजगार करुन आपला शैक्षणिक खर्च भागवण्यासाठी हातभार लावणारा हा विद्यार्थी
नक्कीच एकमेव असेल. मजुरांच्या जोडीला सोयाबीन काढणीपासून इतर बरीच शेतामधील कामं करुन
रोजगार मिळवून हा बालक पालकांना व कुटूंबाला आधार देण्याचं काम एवढयाश्या लहान वयात
सध्या करत आहे. आई वडील त्याला अशा कामांना जाऊ देत नाहीत त्यांचा विरोध असतांनासुध्दा
घरची परिस्थिती सुधारावी या हेतूपोटी तो अशा प्रकारची मदत कुटूंबाला करत आहे. त्याचबरोबर
शैक्षणिक खर्च भागण्यासाठी हातभार लावण्याचे पुण्यकर्म तो करत आहे. इंग्रजी शाळेत लाखांवर
डोनेशन देण्याची विशालच्या पालकांची ऐपत जरी नसली तरी त्याची ही स्वप्नं व उद्देश डोंगराएवढी
नक्कीच आहेत हे मात्र मान्य करावेच लागेल. अशा या बालकाला, त्याच्या विचारांना, त्याच्या
कर्त्वत्वाला सलाम व त्याची ही स्वप्नं पूर्ण होवोत हयाच शुभेच्छा. म्हणूनच या बालकासोबत
मला सेल्फी घ्यावी वाटली व माझ्याही अंगी असे गुण यावे व त्याच्या विचारांचे आपणही
सर्वांनी पालन करावे. वय जरी लहान असले तरी विचार मोठे आहेत. नेहमी अशा गोष्टींचे स्वागत
आपल्या पुरोगामी विचारांच्या राज्यात होत आले आहे व होतच राहिली यात शंक्काच नाही.
- शंकर चव्हाण अंबाजोगाई, जि. बीड (महाराष्ट्र राज्य)
मोबाईल : 9921042422
hr.shankarchavan@gmail.com
hr.shankarchavan@gmail.com
Nice thoughts. Keep to write blog.
ReplyDeleteNice thoughts. Keep to write blog.
ReplyDelete