Posts

Showing posts from February, 2018

असला माज येतो कुठून ?

Image
असला माज येतो कुठून ? ज्यांनी इतिहास घडवला, ज्यांनी स्वराज्य निर्माण करण्यासाठी स्वत:चं संपूर्ण आयुष् ‍ वेचलं, ज्यांच्यामुळे आज आपण लोकशाहीमध्ये वावरतो. अशा महापुरूषंबददल अश्लिल भाषा वापरण्याची हिंम्मत होतेच कशी ? हा खुप चिंचेचा विषय आहे. स्वराज्य निर्माते जाणता राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्याबददल अश्लिल भाषेत वक्तव्य करणारा अहमदनगरचा नगरसेवक बडवा श्रीपाद छिंदम मोकाट आणि आपण षंढासारखे मुग गिळून धुमधडाक्यात शिवजयंती साजरी करतो ही शोकांतिका आहे या पुरोगामी महाराष्ट्रांची, ही शोकांतिका आहे त्या मातीची जिथं महापुरूषांच्याविचाराने पावन ती पावन झाली. एकीकडे शिवरायांचं जगात सर्वात उंच स्मारक करण्याकडे भाजप सरकार जनतेला व शिवप्रेमींना आश्वासनं देवून कोपराला गुळ लावत आहे व एकीकडे भाजप सत्तेतले नगरसेवक श्रीपाद छिंदम यांनी कानात शिशाचा रस ओतावा , कानालाही न ऐकावे वाटणरे, शिवप्रेमींच्या भावना दुखावनारे वक्तव्य केले. कारण फक्त वैयक्तिक होते. कारण फक्त मर्यादीत होते पण महापुरूषांना यात ओढायचे काय कारण ? एवढा द्वेष का ? याचा खोलवर विचार व्हावा. एवढे मावळे आज शांत का ? ज्या ठिकाणी विचारांच...