असला माज येतो कुठून ?

असला माज येतो कुठून ?

ज्यांनी इतिहास घडवला, ज्यांनी स्वराज्य निर्माण करण्यासाठी स्वत:चं संपूर्ण आयुष्वेचलं, ज्यांच्यामुळे आज आपण लोकशाहीमध्ये वावरतो. अशा महापुरूषंबददल अश्लिल भाषा वापरण्याची हिंम्मत होतेच कशी ? हा खुप चिंचेचा विषय आहे. स्वराज्य निर्माते जाणता राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्याबददल अश्लिल भाषेत वक्तव्य करणारा अहमदनगरचा नगरसेवक बडवा श्रीपाद छिंदम मोकाट आणि आपण षंढासारखे मुग गिळून धुमधडाक्यात शिवजयंती साजरी करतो ही शोकांतिका आहे या पुरोगामी महाराष्ट्रांची, ही शोकांतिका आहे त्या मातीची जिथं महापुरूषांच्याविचाराने पावन ती पावन झाली. एकीकडे शिवरायांचं जगात सर्वात उंच स्मारक करण्याकडे भाजप सरकार जनतेला व शिवप्रेमींना आश्वासनं देवून कोपराला गुळ लावत आहे व एकीकडे भाजप सत्तेतले नगरसेवक श्रीपाद छिंदम यांनी कानात शिशाचा रस ओतावा , कानालाही न ऐकावे वाटणरे, शिवप्रेमींच्या भावना दुखावनारे वक्तव्य केले. कारण फक्त वैयक्तिक होते. कारण फक्त मर्यादीत होते पण महापुरूषांना यात ओढायचे काय कारण ? एवढा द्वेष का ? याचा खोलवर विचार व्हावा. एवढे मावळे आज शांत का ? ज्या ठिकाणी विचारांची लढाई चालते त्या ठिकाणी शिवारायांची जयंती नाचून नाही तर वाचून साजरी व्हायला हवी होती. परंतू असे झाले नाही आणि भविष्यात होणार नाही असे दिसते. त्याचं कारण म्हणजे आजच्या तरुणाईवर शिवराय वेगळेच बिंबले आहेत असं वाटतं. खरंच मनात विचार केला तर ताजी घटना घडली अन शिवजयंती जोरात सुरू झाली, फक्त सोशल मिडीयावर निषेधाच्या पोस्ट पडल्या मात्र शिवरायांची अपमान होणारी, मानहानी होणारी घटनेचे गांभीर्य कोणाच्याच लक्षात कसे बरे आले नसेल.? सत्तेचा एवढा माज असलेलं भाजप सरकार नेमकं कुठं नेऊन ठेवणार आहे महाराष्ट्र माझा ? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मुख्य प्रवाह असलेलं दळभद्री भाजप सरकार आल्यापासून गुन्हेगारी वाढली, भ्रष्टाचारांचे थैमान माजले. मंत्रीमंडळ विस्ताराचे सोडाच साधे गावातील, शहरातील व तालुक्यातील व राज्यातील एकही प्रलंबीत प्रश्न सुटलेला दिसून आला नाही. फक्त टिका करणे हा हेतू नसून ही सत्य परिस्थीती आहे. हा सत्तेचा माज जास्त दिवस टिकत नसतो. हे पण लक्षात घ्या. जनता खरंच माफ नाही करणार तुम्हाला. महापुरूषांच्या विचारांचे पाईक होण्यासाठी सुध्दा वाघाचे काळीज लागते. बोकडाच्या काळजाचे तुम्ही अन तुमचे माजलेले सत्ताधारी बोकडं यांचा माज उतरवण्यासाठी शिवप्रेमींच्या सयंमाचा अंत पाहून नका असं शिवप्रेमी व्यक्त होतात. ते विचारांचे पाईक आहेत. दुखाची ही पोकळी भरुण येणार नाही परंतू अशा प्रकारची चुक पुन्हा कोणी करुन नये व कोणत्याच महापुरूषांच्या बाबतीत असा प्रसंग होऊ नये यासाठी कठोर शिक्षा आरोपीला व्हावी. हीच शिवप्रेमींची अपेक्षा. देशात बदल करायचा असेल तर शिवरायांचे विचार डोक्यात घाला तरच देश बदलेल राज्यव्यस्था कशी असावी हे जाणत्या राजाकडून शिकावं .
शंकर चव्हाण अंबाजोगाई, जि. बीड (महाराष्ट्र राज्य)
मोबाईल : 9921042422 hr.shankarchavan@gmail.com

Comments

Post a Comment

दर्जेदार साहित्य वाचा :

साहेब ! मी शेतकरी बोलतोय …

आई माझी मायेचा सागर …

माणुसकी हरवलेला माणुस ...

आदर्श पत्रकार वसंत मुंडे यांची यशोगाथा

ॲड. शंकर चव्हाण परिवर्तनवादी नेतृत्व

महापुरूषांच्या जयंतीला ‘डॉल्बी’ कशाला ?

लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ हरवत चाललाय !

पुढारी बोलीव वजन वाढतंया ! ...

चला पत्रकारितेवर बोलू काही ! ...

लाखोंचा पोशिंदा जगलाच पाहिजे …..