'ती' ला न्याय कधी मिळणार ?
'ती' ला न्याय कधी मिळणार ? दिवसेंदिवस अल्पवयीन मुलींवर पाशवी बलात्कार करुन त्यांच्या क्रुर हत्या केल्या जात आहेत. ही भारताची गंभीर समस्या बनली असतांना सत्ताधारी, पोलीस यंत्राणा, न्यायालय मात्र हातावर हात ठेवून मुग गिळून गप्प असल्याची भूमिका बजावत असतांना दिसून येत आहे. कोपर्डी बलात्कार हत्याकांड, निर्भया हत्याकांड व अता कठुआ मधील आठ वर्षाच्या चिमुरडीवर झालेला बलात्कार व हत्या करण्यात आली. ती बातमी वाऱ्यासारखी देशभरात पासरली. त्यात आणखीण भर सुरतमध्येही अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन हत्या करण्यात आली तीच्या अंगावर 86 जखमा असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा घटना दिवसेंदिवस वाढतच आहे. दिवसागणीक कित्येक बलात्कार होत असतील. कित्येक हत्या होत असतील हे मोजणे कठीणच. स्त्री शक्तीची इज्जत करायला शिकलं पाहिजे तिची इज्जत लुटायला नाही. कित्येक समाजप्रबोधक समाजप्रबोधन करुन आपले जीवन पणाला लावले, कित्येक विचार त्यांनी समाजमनावर बिंबवले तरीही अशा प्रकारच्या घटना घडतातच कशा ? यावर तात्काळ उपाय शोधणे गरजेचे आहे. अशा प्रकारचे पाशवी अत्याचार झाल्यास त्या आरोपीला तात्काळ गुन्हा सिध्द झाल्यास...