'ती' ला न्याय कधी मिळणार ?

'ती' ला न्याय कधी मिळणार ?

दिवसेंदिवस अल्पवयीन मुलींवर पाशवी बलात्कार करुन त्यांच्या क्रुर हत्या केल्या जात आहेत. ही भारताची गंभीर समस्या बनली असतांना सत्ताधारी, पोलीस यंत्राणा, न्यायालय मात्र हातावर हात ठेवून मुग गिळून गप्प असल्याची भूमिका बजावत असतांना दिसून येत आहे. कोपर्डी बलात्कार हत्याकांड, निर्भया हत्याकांड व अता कठुआ मधील आठ वर्षाच्या चिमुरडीवर झालेला बलात्कार व हत्या करण्यात आली. ती बातमी वाऱ्यासारखी देशभरात पासरली. त्यात आणखीण भर सुरतमध्येही अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन हत्या करण्यात आली तीच्या अंगावर 86 जखमा असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा घटना दिवसेंदिवस वाढतच आहे. दिवसागणीक कित्येक बलात्कार होत असतील. कित्येक हत्या होत असतील हे मोजणे कठीणच. स्त्री शक्तीची इज्जत करायला शिकलं पाहिजे तिची इज्जत लुटायला नाही. कित्येक समाजप्रबोधक समाजप्रबोधन करुन आपले जीवन पणाला लावले, कित्येक विचार त्यांनी समाजमनावर बिंबवले तरीही अशा प्रकारच्या घटना घडतातच कशा ? यावर तात्काळ उपाय शोधणे गरजेचे आहे. अशा प्रकारचे पाशवी अत्याचार झाल्यास त्या आरोपीला तात्काळ गुन्हा सिध्द झाल्यास कठोरात कठोर जनतेसमोर शिक्षा करायला हवी. त्याशिवाय आरोपी गुन्हा करतांना दहा वेळा विचार करेल. आपल्या भारत देशामध्ये कायदयात एवढया पळवाटा करुन ठेवलेल्या आहे की, त्यामुळे लोकशाहीचा अतिरेक होतांना दिसून येतो. कोपर्डीसारख्या भयानक माणूसकीला काळीमा फासणारा प्रकार घडला. त्या घटनेने किंवा निर्भया हत्याकांडामुळे सारा भारत देश हादरवून टाकला. ठिकाठिकाणी देशभरामध्ये मोर्चे निघाले, उपोषणं झाली, कायदा हातात असणाऱ्यांना निवेदनं दिली, निषेध व्यक्त करण्यात आले. पण प्रकारणाचा निकाल लागायला न्यायालयाने खूप कालावधी लावला. अखेर त्या नराधमांना फाशी झाली व कोपर्डीतील ताईला न्याय मिळाला. पण तीचा निष्पाप जीवाचा जीव विनाकारण गेला त्याचं काय ? तीची काय चुक? स्त्री म्हणून जन्माला आली हीच का तीची चुकी ? आत्ताही अनेक समाजामध्ये स्त्रीया आहे. त्यांच्याकडं वाईट भावनेनं, नजरेनं बघणारी अप्रत्यक्ष रित्या बालात्कार करणारे अनेक सापडतील त्यांचं काय ? कित्येक अशा स्त्रीया आहेत, त्यांची न्यायालयात प्रकरणं सुरू आहेत. त्यांना न्याय कधी ? त्यांनी काय गुन्हा केलाय ?अशा प्रकारचे पशवी अत्याचार करणारांविरोधात तात्काळ कायदा करुन कठोर शिक्षा करण्याचा कायदा आमलात आणला तरच अशा प्रकाराच्या घटना थांबवता येतील. नाही तर दिवसेंदिवस आणखीणच अशा बलात्काराच्या घटना होतच राहतील. एवढयाश्या चिमुरडीवर अत्याचार करतांना त्या नराधमांना नसेल का हो आठवली त्याची बहिण, आई. भारत देशामध्ये बलात्कार झालेल्या व्यक्तीला जोपर्यंत कठोर शिक्षा होणार नाही तोपर्यंत असे क्रुर कृत्य करणारांना आळा बसणार नाही. पोलीस प्रशासनाने सुध्दा शाळा कॉलेजं येथे मुलींच्या संरक्षणासाठी पोलीस पथक कार्यरत करावेत. नुसतेच नावाला पथकं काही कामाचे नाहीत. हल्ली शाळा कॉलेजांमध्ये महाविदयालयातील मिशा न फुटलेले तरुण भरधाव वेगाने मुलींना कट मारुन दुचाकी चालवतांना कित्येकदा प्रत्येकानं पाहिलं आहे. छेड काढणे, भरधाव दुचाकी चालवणे, मुलींसमोरुन जातांना स्टाईल मारत कमेंट करणे, टिंगल करणे इत्यादी प्रकार रोजच घडतात. हे थांबले पाहिजे. उघडया डोळयांनी आपण पाहतोय व मुली त्या दिवसेंदिवस सहन करुन सर्व गप्प  गिळून घेतात. हीच ती स्त्री शक्तीची सहनशिलता आहे. नाही तर त्यांना शस्त्र परवाने दया त्यांना त्यांच्या संरक्षणाची गरज सध्या आहे. अनुचित प्रकार घडल्यास न्याय मिळून काय फायदा. कठोर शिक्षा होण्यापेक्षा अशा प्रकारच्या गुन्हेगारीला आळा कसा बसेल याकडे संपूर्ण भारतातील सत्ताधारी व प्रशासकीय गटांनी एकत्र येवून यावर पायबंद घातला पाहिजे. नाहीतर तुमच्या उदया घरात घुसून तुमच्या डोळयादेख असे प्रकार घडल्याशिवाय राहणार नाहीत. कारण गुन्हागाराला कायदयाचे भयच उरले नाही. आपण अशा घटना घडल्यास श्रध्दांजली अर्पण करतो, मोर्चे काढतो एवढे पुरेसे नाही. समाजामध्ये स्त्रीयां विषयी आदर वाढायला हवा, त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलालयला हवा तरच अशा घटनांना समाजात सुध्दा आळा बसू शकतो. कठुआ मधील व सुरतमधील घडलेल्या घटनेतील त्या दोघी बहिणींना भावपूर्ण श्रध्दांजली.

   - शंकर चव्हाण , अंबाजोगाई 
9921042422

Comments

दर्जेदार साहित्य वाचा :

साहेब ! मी शेतकरी बोलतोय …

आई माझी मायेचा सागर …

लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ हरवत चाललाय !

लेडीज फस्ट मग ‘आई शेवटी का जेवते’ ?

चालक, वाहक व प्रवाशांसाठी थोडसं !

राहुल जोगदंडची “यशोगाथा” आनंदगाव ते दुबई जीवनप्रवास

'यशाला' शॉर्टकट नाहीच !

आदर्श पत्रकार वसंत मुंडे यांची यशोगाथा

मैत्री पुस्तकांशी

लाखोंचा पोशिंदा जगलाच पाहिजे …..