खेडयातही माणसंच राहतात ...

खेडयातही माणसंच राहतात ...
शहरांपेक्षा खेडयांमध्ये आजही खेडयातील लोक समस्येच्या विळख्यात पार अडकलेले पहावयास मिळतात शासकीय लाभपासून प्रत्येक व्यक्ती हा तितकाच तहानलेला असतो हे मान्य करावेच लागेल. देश स्वतंत्र झाल्यापासूनचा आजपर्यंतचा अभ्यास केला असता. शहरांचा विकास अतिशय तेजीत होतोय परंतू खेडयांमध्ये आजही अन्न, वस्त्र निवारा इतर मुलभूत हक्कांपासून खेडयातील माणसं आजही वंचीत आहेत. आजही बऱ्याच खेडेगावात पिण्यासाठी मुबलक पाणी नाही, रस्ते नाहीत, विज नाही, बऱ्याच नागरीकांना स्वत:ची पक्की घरं नाहीत. बरेच मजुर हे कामापासून वंचीत आहेत पत्येकाच्या हाताला काम हे वाक्य सुध्दा आता अपुरी पडत आहेत अपुरी नाही तर हे म्हणणे लागूच होत नाही. हे वाक्य सत्ताधाऱ्यांनी जाहिरातीत वापरंलेलं आहे आत्ताचे सत्ताधारी असोत किंवा यापूर्वी होवून गेलेले आत्ताचे विरोधक. मात्र प्रत्येकाच्या हाताला काम कोणीच देवू शकलं नाही ही या महान अशा महाराष्ट्र राज्याची शोकांतीका आहे. राज्यात कित्येक तरुण तरुणी बेरोजगार आहेत. त्या बरोजगारीमुळे तरुण वर्गात चिंतेचं वातावरण आहे, प्रत्येक तरुण चिंताग्रस्त आहे. तो आत्यहत्या करतोय, व्यसनांच्या आहरी गेलेला आहे . हा चिंतेचा विषय असतांना या गंभीर बाबीकडे लक्ष दयायला कोणाला वेळ नाही. हे प्रत्येक जण जाणतोय मात्र याचे काही देणे घेणे कोणालाच नाही. सेवाभावी संस्था फक्त कागदावरच आहेत. त्या समाजसेवेसाठी नाही तर स्वत:चा व्यवसाय म्हणून समाजसेवा करतात, लोकप्रतिनिधी भाषणं ठोकून जातात पुन्हा कधी फिरकतही नाहीत. खेडयात घरोघरी नळ योजनानेच्या माध्यमातून नळ आले पण पाणी ? कुठंय पाणी ? इथं दिवसभर राबराब राबून थकून भागून शेतातून आल्यास, कामावरुन आल्यास वीस वीस घागरीने खांदयावर कोस कोस चालून पाणी आजही खेडयात भरणारी माणसं अशा व्यवस्थेचे बळी पडले आहेत. हे भयाण वास्तव आपल्या महाराष्ट्राचं आहे. खेडयातही माणसं राहतात. त्यांना पण शहरातल्या इतर लोकांप्रमाणेच जीव आहे. त्यांनाही जीवन जगायचंय, त्यांनाही सर्व सुख सोई मिळाल्या पाहिजेत. बऱ्याच खेडोपाडी आजही रस्त्यांनी दैना कायम आहे. अशा स्वतंत्र भारतात कृषीप्रधान देशात अशा प्रकारचे हाल होत असतील. माणसांना मुबलक सोयई सुविधा उपलब्ध होत नसतील. तर देश महासत्ता होइल तरी कसा हा एक प्रश्नच आहे. प्रत्येक शासनाच्या योजनेचा लाभ सामान्यांपर्यंत पोहचत नाही, त्याचं कारण म्हणजे शिकलेल्या माणसांची गिळाऊ वृत्ती. ही वृत्ती सर्वात बुध्दीमान असणाऱ्या मानव प्राण्यामध्येच आढळून येते खरं तर, प्रत्येक शासकीय योजनेच्या कामात ढवळाढवळ करुन त्यात आपला हिस्सा कसा काढून घेता येईल असं केंद्रापासून ते ग्रांमपंचायत पर्यंतच्या अधिकाऱ्यांपर्यंत घडणारं चक्र आहे. तर मग सर्वसामान्यांना लाभ कसा मिळेल. अरे थांबवा हा भ्रष्टाचार, अरे थांबवा ही गिळाऊ वृत्ती. शहरांप्रमाणेच खेडेही सुधारली पहिजेत. खेडयातील माणसांनाही त्यांचा हक्क मिळाला पाहिजे. त्यांनाही त्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी त्यांना मुबलक सोईंनीयुक्त सर्व हक्क मिळवून देण्यासाठी सर्वांनी सर्वांसाठी प्रयत्नशिल राहिलं पाहिजे तरच खरंच समाजवेसेचं दर्शन घडू शकतं.
- शंकर चव्हाण , अंबाजोगाई 
9921042422

Comments

दर्जेदार साहित्य वाचा :

साहेब ! मी शेतकरी बोलतोय …

आई माझी मायेचा सागर …

लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ हरवत चाललाय !

लेडीज फस्ट मग ‘आई शेवटी का जेवते’ ?

राहुल जोगदंडची “यशोगाथा” आनंदगाव ते दुबई जीवनप्रवास

चालक, वाहक व प्रवाशांसाठी थोडसं !

आदर्श पत्रकार वसंत मुंडे यांची यशोगाथा

मैत्री पुस्तकांशी

'यशाला' शॉर्टकट नाहीच !

लाखोंचा पोशिंदा जगलाच पाहिजे …..