आणखी किती करावा संघर्ष …
आणखी किती करावा संघर्ष … समुद्रात एखादा व्यक्ती पडला तर त्याला किनाऱ्यावर येण्यासाठी जीवाचा आटापीटा करुन आकांताने समुद्र किनाऱ्यावर पोहचण्यासाठी जसा संघर्ष करावा लागतो तसा संघर्ष महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला एखादी हक्काची बाबत मिळवण्यासाठी करावा लागतोय . महाराष्ट्रातील राजकारण भलीतकडेच जात असल्याने त्याने उग्र रुप धारण केले आहे . जिथं तिथं चौकटी तयार झाल्या आहेत . त्यात जातीपातीच्या चौकटीबाबत तर बोलायलाच नको . एखादया व्यक्तीची ओळख करण्यापासून ते तो मरेपर्यंत आयुष्यात प्रत्येक क्षणाक्षणाला त्याची जात काही जाता जात नसल्यामुळे हया संघर्षमय जीवनाची वाटचाल हा माणूस प्राणी करत आहे . प्रत्येकाला आरक्षण हवंय , प्रत्येकाला आरक्षण कोठयातून नौकरी हवी आहे , प्रत्येकाला शासनाच्या प्रत्येक योजनेचा लाभ हा जातीच्या आरक्षणातून हवाय . मात्र या सर्व गोष्टींपासून एखादा समाज का वंचित राहतो याचा खरंच विचार करावा ? हा विचार नक्कीच नैतीक जबाबदारीने करावा लागेल . भारतीय राज्यघटनेप्रमाणे प्रत्...