मर्द मराठ्यांनो आत्महत्या करू नका रे …
मर्द मराठ्यांनो आत्महत्या करू नका रे … आज घडीला संपूर्ण महाराष्ट्रभर मराठा समाज मुक मोर्चानंतर मराठा समजाला आरक्षण मिळावे यासाठी ठोक मोर्चा आंदोलन सुरू आहे, मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे, मराठा आरक्षणासाठी मराठा समाज बांधव आक्रोश करत आहे. शिक्षणात व नोकरीमध्ये आरक्षण नसल्यामुळे मराठा समाजावर अतिशय वाईट वेळ आली आहे, असे प्रसंग झेलत असताना कौटुंबिक उदरनिर्वाह भागवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतोय, मराठा समाज आरक्षणा अभावी मागे पडतोय. शासन स्तरावर या गंभीर विषयाची जराशीही दखल घेतली जात नाही, तालुक्यातालुक्यात गावागावात मराठा आंदोलक रस्त्यावर उतरून सत्ताधाऱ्यांचा व शासन स्तरावरील प्रशासनाचा जाहीर निषेध व्यक्त करत आहेत. वेगवेगळ्या पद्धतीचे मोर्चे, उपोषणं, आंदोलनं करून मराठा आरक्षण मिळावे या मागणीसाठी टाहो फोडत आहेत. तरीही शासनस्तरावर याची दखल घेतली जात नसल्याने या गंभीर विषयाकडे ढुंकूनही पहायला कोणीही तयार नाही. दिली जातात ती फक्त आश्वासनं, यापूर्वी सत्तेत अससलेले व आत्ताचे सत्ताधारी यांनी मराठा समाज बांधवांना फक्त आश्वासनाचं लाल गाजर दाखवला ...