मर्द मराठ्यांनो आत्महत्या करू नका रे …




मर्द मराठ्यांनो आत्महत्या करू नका रे …

आज घडीला संपूर्ण महाराष्ट्रभर मराठा समाज मुक मोर्चानंतर मराठा समजाला आरक्षण मिळावे यासाठी ठोक मोर्चा आंदोलन सुरू आहे, मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे, मराठा आरक्षणासाठी मराठा समाज बांधव आक्रोश करत आहे. शिक्षणात व नोकरीमध्ये आरक्षण नसल्यामुळे मराठा समाजावर अतिशय वाईट वेळ आली आहे,  असे प्रसंग झेलत असताना कौटुंबिक उदरनिर्वाह भागवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतोय, मराठा समाज आरक्षणा अभावी मागे पडतोय. शासन स्तरावर या गंभीर विषयाची जराशीही दखल घेतली जात नाही, तालुक्यातालुक्यात गावागावात मराठा आंदोलक रस्त्यावर उतरून सत्ताधाऱ्यांचा व शासन स्तरावरील प्रशासनाचा जाहीर निषेध व्यक्त करत आहेत. वेगवेगळ्या पद्धतीचे मोर्चे, उपोषणं, आंदोलनं करून मराठा आरक्षण मिळावे या मागणीसाठी टाहो फोडत आहेत. तरीही शासनस्तरावर याची दखल घेतली जात नसल्याने या गंभीर विषयाकडे  ढुंकूनही पहायला कोणीही तयार नाही. दिली जातात ती फक्त आश्वासनं, यापूर्वी सत्तेत अससलेले व आत्ताचे सत्ताधारी यांनी मराठा समाज बांधवांना फक्त आश्वासनाचं लाल गाजर दाखवला आहे, कृती मात्र शून्य ! मराठा समाजातील तरुणांना कौशल्य असून पैशांअभावी व आरक्षणाअभावी शिक्षण घेणं अवघड झालं आहे, आरक्षण नसल्यामुळे शासकीय नोकरी मिळत नाही, शासकीय नोकरीचा अर्ज करताना आरक्षण असणाऱ्यांना उदा. शंभर रुपये व खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना जवळपास सहाशे ते सातशे रुपये खर्च करावे लागतात अशा प्रकारचा भेदभाव शिक्षण घेणाऱ्या तरुणांना व नोकरी मिळवण्यासाठी बेरोजगार असणाऱ्या उमेदवारांना संघर्ष करावा लागतोय. मराठ्यांना आरक्षण मिळत नसल्यामुळे एकामागून एक तरुण दिवसेंदिवस आत्महत्येचा मार्ग अवलंबत आहेत. मराठा शेतकरी बांधव नापिकीला कंटाळून आत्महत्येचा मार्ग धरत आहेत. दिवसेंदिवस मोर्चाचे वातावरण बदलत आहे, दररोज एक ना दोन आत्महत्या होत आहेत, आजपर्यंत जवळपास पंधरा ते सोळा मराठा बांधवांनी व भगिनींनी प्राणांची आहुती दिली, आरक्षण मिळावे यासाठी आपल्या प्राणाचे बलिदान दिले या सर्व वीर शहीद बांधवांना भावपूर्ण श्रद्धांजली. परंतु जोपर्यंत मनगटामध्ये बळ आहे, तोपर्यंत लढलं पाहिजे ! आत्महत्या करणं हा मार्ग नाही, माझी सर्व मराठा बांधवांना कळकळीची विनंती आहे की, बांधवांनो आणि भगिनिंनो आरक्षण हे संघर्ष करून मिळवूया पण आत्महत्येचा मार्ग धरू नका ! आत्महत्या करून प्रश्न सुटत नसतात. मंत्रिमंडळामध्ये अनेक मराठा मंत्री आहेत अनेक आमदार मराठा समाजाचे आहेत, परंतु मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी यांची तीळ मात्र हालचाल दिसून येत नाही. मराठा मोर्चांमध्ये सहभागी असल्याचा ते सकल मराठा बांधवांना भासवतात. तसेच मराठा आरक्षण मिळण्यासाठी आपणही मराठा बांधवांसोबत आहोत अशा प्रकारचा देखावा निर्माण करतात. परंतु सकल मराठा बांधवांनी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. ती म्हणजे या आमदार, मंत्री व खासदारांची नौटंकी. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मी राजीनामा देतोय ! असे पत्र तयार करून सोशल मीडियावर प्रसार करून नाटकं करण्याचं काम मराठा बांधवांना दिवसाढवळ्या वेड्यात काढले जात आहे. या माध्यमातून स्वत:चा स्वार्थ साधून प्रसिध्दी मिळवू पहात आहेत. मराठा समाजाचे अनेक आमदारांनी जर ठरवलं, प्रत्यक्षात राजीनामा दिला, तर मराठा समाजाची शासन स्तरावर शंभर टक्के दखल घ्यावीच लागेल. यात शंकाच नाही. पण प्रत्येक आमदाराला, मंत्र्याला हिरो व्हायचंय . त्यासाठी हा त्यांचा अट्टाहास व पब्लिसीटी स्टंट. अनेक पुढारी, लोकप्रतिनिधी, आमदार मराठा समाजातील मोर्चात श्रेय लाटण्यासाठी व आम्ही मराठा मोर्चा साठी काहीतरी करत आहोत याचं श्रेय लाटण्यासाठी केविलवाणा प्रयत्न करत आहेत तसेच चेहऱ्यावर अशा प्रकारच्या भावना सकल मराठा बांधवांना दाखवत आहेत. परंतु मराठा समाजातील सकल मराठा बांधवांना व तरुण मराठा बांधवांना एवढीच विनंती आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत आपण, आपल्या मनगटातल्या बळावर ही आरक्षणाची लढाई आपल्याला जिंकायची आहे. एवढी गोष्ट ध्यानात ठेवा. आत्महत्या करू नका. स्वतः खचून न जाता इतरांनाही मानसिक बळ देण्याचं काम करा, असा विचार एखाद्या मराठा बांधवांच्या डोक्यात येत असेल त्याला समजावून सांगा व त्याचा जीव वाचवा कारण, आत्महत्या केल्याने आपल्या परिवाराचे जास्त नुकसान होते आरक्षण ही गोष्ट संघर्षाची लढाई करून मिळवून, येणाऱ्या काळात नक्कीच यश मिळणार आहे. मराठा आरक्षणाची फाईल कोणाच्याही टेबलावर असो, कोणी दखल घेऊन अथवा न घेवो, येणाऱ्या निवडणुकीत बिनकामाच्यांचा घरी बसवू हे फक्त मराठा समाजाच करुन शकतो हे दाखवून देऊ. मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य कराव्याच लागतील. शिवरायांच्या महाराष्ट्रात मरायला नाहीतर लढायला शिकल पाहिजे. छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये यापुढे एकही मराठा बांधव मरणाच्या वाटेवर जाणार नाही याची सर्व सकल मराठा बांधवांनी काळजी घ्यावी. अशा प्रकारची जनजागृती सर्व सकल मराठा बांधवांच्या वतीने करण्यात यावी. आरक्षण मिळवण्यासाठी शासनाला दाखवून द्या मर्द मराठ्यांचा सळसळतं रक्त पण मराठ्यांना तुम्ही आत्महत्या करू नका !

-         शंकर चव्हाण, अंबाजोगाई 9921042422
hr.shankarchavan@gmail.com

Comments

दर्जेदार साहित्य वाचा :

साहेब ! मी शेतकरी बोलतोय …

आई माझी मायेचा सागर …

लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ हरवत चाललाय !

लेडीज फस्ट मग ‘आई शेवटी का जेवते’ ?

चालक, वाहक व प्रवाशांसाठी थोडसं !

राहुल जोगदंडची “यशोगाथा” आनंदगाव ते दुबई जीवनप्रवास

'यशाला' शॉर्टकट नाहीच !

आदर्श पत्रकार वसंत मुंडे यांची यशोगाथा

मैत्री पुस्तकांशी

लाखोंचा पोशिंदा जगलाच पाहिजे …..