ही वेळ पुन्हा येणे नाही !
ही वेळ पुन्हा येणे नाही ! वेळ ही प्रत्येकाच्या जीवनामध्ये अमूल्य असते . या वेळेचा उपयोग जर योग्य पद्धतीने झाला त रजीवन अधिकच सुंदर होते , हे माहित असतांना सुद्धा आपण आपला अमूल्य वेळ बहुतेक वेळा वाया घालवतोच . माणसाला जीवनामध्ये संधी हीखूप कमी वेळा मिळते , ती संधी ओळखली पाहिजे , ती वेळ ओळखता आली पाहिजे , ज्याला ही वेळ ओळखता आली त्याला यशाची गुरुकिल्ली सापडली , कारण जीवनामध्ये एकदा गेलेली वेळ परत कधीच मिळत नाही हे जगाच्या पाठीवरील सत्य आहे . शालेय जीवना पासून किशोर अवस्थेपर्यंत संधीच सोनं ज्यांनी - ज्यांनी केलं , त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये सुवर्णक्षण मिळाले . म्हणूनच त्यांच्या जीवनाचं सार्थक झालं . वेळ हा विषय प्रत्येकाच्या आयुष्या मध्ये प्रथम स्थानी आहे . योग्य नियोजन झाल्यास संधीसाधून त्याचा योग्य तो उपयोग केल्यास व्यवसायामध्ये सुद्धा सर्वात जास्त फायदा होतो . स्पर्धा परीक्षा देणारे भावी अधिकारी होवू पाहणारे इच्छुक उमेदवार यांना वेळेची किंमतविचारा ते नक्कीच तुम्हाला वेळे...