ही वेळ पुन्हा येणे नाही !
ही वेळ पुन्हा येणे नाही !
वेळ ही प्रत्येकाच्या जीवनामध्ये अमूल्य असते.या वेळेचा उपयोग जर योग्य पद्धतीने झाला त रजीवन अधिकच सुंदर होते, हे माहित असतांना सुद्धा आपण आपला अमूल्य वेळ बहुतेक वेळा वाया घालवतोच. माणसाला जीवनामध्ये संधी हीखूप कमी वेळा मिळते, ती संधी ओळखली पाहिजे, ती वेळ ओळखता आली पाहिजे,ज्याला ही वेळ ओळखता आली त्याला यशाची गुरुकिल्ली सापडली, कारण जीवनामध्ये एकदा गेलेली वेळ परत कधीच मिळत नाही हे जगाच्या पाठीवरील सत्य आहे. शालेय जीवना पासून किशोर अवस्थेपर्यंत संधीच सोनं ज्यांनी-ज्यांनी केलं, त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये सुवर्णक्षण मिळाले. म्हणूनच त्यांच्या जीवनाचं सार्थक झालं. वेळ हा विषय प्रत्येकाच्या आयुष्या मध्ये प्रथम स्थानी आहे. योग्य नियोजन झाल्यास संधीसाधून त्याचा योग्य तो उपयोग केल्यास व्यवसायामध्ये सुद्धा सर्वात जास्त फायदा होतो. स्पर्धा परीक्षा देणारे भावी अधिकारी होवू पाहणारे इच्छुक उमेदवार यांना वेळेची किंमतविचारा ते नक्कीच तुम्हाला वेळेची किंमत काही शब्दांमध्ये खूप मोठा अर्थ देणारा वाक्य सांगतील. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारीकरतात पण वेळेचे नियोजन त्यांना जमत नाहीते नक्कीच अयशस्वी तर होतातच पण काही कालावधीनंतर त्यांच्या लक्षात येतं की, आपण वेळेचे नियोजन करण्यामध्ये चुकलो आहोत. आपण संधी ओळखायला कमी पडलो. पणतेव्हा वेळ निघून गेलेली असते. त्याचा काहीच उपयोग होत नाही. म्हणूनच आपल्या सशक्त मस्तका मध्ये जेव्हा विचार येतो तेव्हा तो मांडा!तो आत्मसात केला पाहिजे, त्यावरविचारविनिमय करून योग्य वेळेची ओळख झाल्यास व ती वेळ योग्यच आहे असे समजल्यास त्या सुवर्ण संधीचा फायदा घेऊन त्यात्या वेळी ती कामे केली तर निश्चितच यशाला गवसणी घातल्या शिवाय तुम्ही राहणार नाहीत.वेळ निघून गेल्यानंतर आयुष्या मध्ये पश्चातापा शिवाय काहीच उरत नाही हे जगाच्या पाठीवरील सर्वात मोठं सत्य आहे. हे मान्य करावंच लागतं. त्यामुळे आपल्या आयुष्यातील प्रत्येक मिनिट, प्रत्येक क्षण, प्रत्येक तास हा आपल्यासाठी अमूल्य असतो. त्याचा सदुपयोग करून जीवनामध्ये यश कसे मिळवायचे, सुंदर पद्धतीने जीवन जगण्यासाठी वेळेचा योग्य उपयोग कसा करायचा याचं मॅनेजमेंट करायला हवं. ज्याच्याकडे ज्ञानाचे भांडार आहेत्या च्याकडून मार्गदर्शन आवश्यक घ्या.कसल्याही प्रकारचं न्यूनगंड बाळगू नका, संकोचकरू नका, कमी पणा वाटून घेऊ नका. कारण माणूस हा आयुष्यभर शिकतच असतो. हाताची पाच बोटं सारखी नसतात, तसेच पृथ्वीतलावर माणसंही सारखी नसतात. त्यामुळे स्वतःला कधीच कमी लेखू नका. स्वतःचा आत्मविश्वास वाढवा व आजच तयारीला लागा कारण तुमच्या जीवनातून एकदा निघून गेलेली वेळ पुन्हा कधीच येत नाही या छोट्याशा गोष्टीचा खूप मोठा अर्थ आहे हे समजून घ्या व आपल्या आयुष्याचं सोनं करा.
- शंकर चव्हाण, अंबाजोगाई, 9921042422
hr.shankarchavan@gmail.com
व्हा, खूप छान लिहले आहे, वेळेचे महत्त्व पटवून दिले.. ही खरच महत्वाची बाब आहे.👌👌👍
ReplyDeleteसंधीच सोनं केल पाहिजे ,नाही तर पश्चाताप करून फायदा होत नाही.वेळेच बंधन पाळले पाहिजे. . पैशापेक्षा वेळेला किमंत दिली तरच फायदा....छान लिहीले संपादक
ReplyDelete