Posts

Showing posts from August, 2020

दीड जीबीनं ‘घोडे’, लावले कामाला …

Image
दीड जीबीनं ‘घोडे’, लावले कामाला …  pic source by : google.com इथं प्रत्येकजण मोबाईलच्याच भाषेत बोलतोय ! म्हणलं बुवा आपण पण थोडंसं बोलूयात म्हणून आज जवळ जवळ शालजोडे हाणायचा ईचार आला अन मग केलं सुरु, तर त्याचं असंय की, दीड जीबी इंटरनेटचा डेटापॅक एका दिवसात दिवाळीचं रॉकेट उडवावं तसं संपवणारी तरुण मंडळी अर्थात लंबे रेस के घोडे अर्थात देशाचा मजबूत असा भक्कम  पाया अर्थात उदयाचा भारत देश वगैरे वगैरे.  महिना असो अथवा तीन महिने असोत अन्न, वस्त्र, निवारा आणि स्मार्टफोन व त्यात दीड जीबीचा डेटा पॅक हया नवतरुण मंडींसह सर्वांच्याच मुलभूत गरजा बनल्या आहेत. इथं प्रत्येकाकडं मोबाईमध्ये दीड जीबी डेटापॅक असतोच व त्या मोबाईलवरच्या त्या टचपॅडवर अंगठा खाली वर सरकतांना कधी दिवस उगवला अन कधी मावळला याची जराशीही चाहूल तरुण मंडळींना आजकाल लागत नाही. त्या टाईमपासच्या नादात वडीलधाऱ्यांनी सांगितलेली कामं सुध्दा रेंगाळली जातात. तसेच जीवनात अमुलाग्र असा नको तो बदल हया दीड जीबी च्या पॅकनं समाजात करुन ठेवला आहे. कधी काळी इंटरनेचा वापर हा संदेशवहन तसेच महत्वाच्या कामासाठीच असतो असं समीकरण होतं व ...