दीड जीबीनं ‘घोडे’, लावले कामाला …

दीड जीबीनं ‘घोडे’, लावले कामाला …

 pic source by : google.com

इथं प्रत्येकजण मोबाईलच्याच भाषेत बोलतोय ! म्हणलं बुवा आपण पण थोडंसं बोलूयात म्हणून आज जवळ जवळ शालजोडे हाणायचा ईचार आला अन मग केलं सुरु, तर त्याचं असंय की, दीड जीबी इंटरनेटचा डेटापॅक एका दिवसात दिवाळीचं रॉकेट उडवावं तसं संपवणारी तरुण मंडळी अर्थात लंबे रेस के घोडे अर्थात देशाचा मजबूत असा भक्कम  पाया अर्थात उदयाचा भारत देश वगैरे वगैरे.  महिना असो अथवा तीन महिने असोत अन्न, वस्त्र, निवारा आणि स्मार्टफोन व त्यात दीड जीबीचा डेटा पॅक हया नवतरुण मंडींसह सर्वांच्याच मुलभूत गरजा बनल्या आहेत. इथं प्रत्येकाकडं मोबाईमध्ये दीड जीबी डेटापॅक असतोच व त्या मोबाईलवरच्या त्या टचपॅडवर अंगठा खाली वर सरकतांना कधी दिवस उगवला अन कधी मावळला याची जराशीही चाहूल तरुण मंडळींना आजकाल लागत नाही. त्या टाईमपासच्या नादात वडीलधाऱ्यांनी सांगितलेली कामं सुध्दा रेंगाळली जातात. तसेच जीवनात अमुलाग्र असा नको तो बदल हया दीड जीबी च्या पॅकनं समाजात करुन ठेवला आहे. कधी काळी इंटरनेचा वापर हा संदेशवहन तसेच महत्वाच्या कामासाठीच असतो असं समीकरण होतं व अशी व्याख्या होती. मात्र आता ती व्याख्या खोडण्यात आली आहे. आता इंटरनेचा वापर हा महत्वाच्या कामासाठी कमी व टाईमपास करण्यासाठी जास्त प्रमाणात होतो आहे. त्यात चूक ही तरुणाईची नाहीच मुळी. चुक ही पालकांची आहे.पालकांनी आपल्या पाल्याला जगात सुरु असलेल्या जीवघेण्या स्पर्धेसाठी त्याचा घोडा म्हणून वापर केला आहे व आपल्या पाल्याला त्या त्या खेळण्यासाठी उतरवलं आहे. पालक मुळात त्याच्या मुलावर चांगले संस्कार करायचे विसरला आहे. पालक हा त्या पाल्याला इतरांच्या तुलनेत न पेलावणारं ओझं देऊन मोकळा झाला आहे. त्यानं स्वत:चं आयुष्य जगणं अगदी हालाखीचं केलं आहे. अगदी मुलबलक पैसा असून सुध्दा. मित्रांनो पालकांनी आपली पाल्य कशी असावीत यापेक्षा कशी दिवसावीत याकडे लक्ष केंद्रीत करण्याचा कल अंगीकारला आहे. त्यामुळे पालक व पाल्य यांच्यातील संभाषण अगदीच संपुष्टात आले आहे. आजकालच्या इंग्रजी शाळांनी पालकांच्या खिशाला कात्री लावून ज्ञानमंदीराचं दुकान सुरु केलं आहे. पालकं आपल्या पाल्याला शाळेत नव्हे तर विदया शिकण्यासाठी ज्ञान मिळवण्यासाठी आता शाळा नावाच्या दुकानातच जणू पाठवत आहेत. जिथं ज्ञानापेक्षा पैसा श्रेष्ठ त्याला शाळा म्हणू नये. शिक्षणाचं बाजारीकरण झालं असं अगदी सहज म्हणतो, पण बाजारीकरण का झालं याचा मात्र आपण विचार मुळीच करत नाही. शिक्षण हे वाघीणीचं दूध आहे असं भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलं, पण ते दूध आता इथल्या व्यवस्थेनं स्वार्थापोटी नासवलं आहे. ही खंत याच समजाव्यवस्थेची आहे आणि या सगळयांना जबाबदार इथले सुशिक्षीत व उच्चशिक्षीत पालकं. प्रत्येकजण रोज सुविचार वाचतो, ऐकतो, पाहतो पण अनुकरण मात्र शुन्यच. उपदेश हा दुसऱ्यांसाठी व स्वत: मात्र सर्व नियम धाब्यावर बसवत असतांना दिसतात. हे चक्र न थांबणारं आहे असंच एकंदर वाटत आहे. समाजप्रबोधनाची अनेक माध्यमं आहेत. पण हल्ली ते फक्त वेळकाढू व मनोरंजन म्हणून ऐकणारी स्वार्थी व कपटी मानवजात इथं उदयास येत आहे. तरुणाई गुटखा, मावा, बोकडाच्या नळया खाऊन नशेत बेधूंद होत आहे, दीडजीबीनं त्याला गुरफाटलं आहे. जिथं सकारात्मक विचारांची जास्त गरज आहे तिथं नकारात्मक विचारांना पोषक वातावरण हया दीड जीबीच्या डेटा प्लॅन मुळे तयार झाले आहे. हवी ती माहिती क्षणात मिळते पण त्याच माहितीचा दुरूपयोग जास्त व टाईमपास यासाठी होतो आहे. यामुळे नक्कीच देशातील मनमानी करणारे व गैरफायदा घेणारे यांच्यासाठी वेळच वेळ आहे व तरुणाई मात्र दीड जीबीमध्ये दंग आहे. यापेक्षा दुसरी मोठी खंत कुठली बरं असेल. काळाच्या ओघात तरुणाईवर नको त्या गोष्टी मनावर बिंबवण्याचा कट ज्यांनी कोणी केला त्यांना देश हवा तसा करण्यात यश आलं आहे हे मान्य करावंच लागेल. इथं सज्जनांपुढं दुर्जनांचा विजय झालाय, खऱ्यापुढं खोटं जिंकलं, सत्यापुढं असत्याचा विजय झाला आहे. त्यामुळे आता गुलामगिरीचे दिवस येतील व देशाचा आधार असणारा तरुण वर्ग हा गुडघ्यांमध्ये डोके खुपसून त्या सहा इंच मोबाईलच्या खोकडयाकडं डेटा पॅक संपेपर्यंत देश लुटतांना फक्त आणि फक्त सोशलमिडीयावर स्वत:ची अक्कल पाजळतांना दिसेल. हे वास्तव डोळयासमोर पहावं वाटत नाही ना कोणाला सांगावं वाटत नाही, कारण इथं प्रत्येकजण दीडजीबीत गुंतला आहे आणि टाईमपास करण्यात मग्न आहे. चल उठ तरुणा जागा हो, घे क्रांतीची मशाल हाती आणि लढ देशासाठी असं म्हणणारं इथे कोणी उरलंच नाही. सकारात्मक विचारांचा पाईक होण्यापेक्षा सकारात्मक विचाराच्या अनुकरण करण्याचा पाईक हो आता असं म्हणावं लागणार आहे.  तरुण मंडळींच्या प्रगतीच्या, नवनिर्मितीच्या, कलागुणांच्या, ज्ञानाच्या आधारावर देशाची नाळ जोडलेली व देशाचे भवितव्य अवलंबून असते हे विसरुण चालणार नाही ते तितकंच महत्वाचंही आहे.  त्यामुळे आता दिवस असे आलेत की, हया दीड जीबीनं आपल्या देशातील तरुण घोडे नको त्या कामाला लावले आहेत.  त्यामुळे होत असलेलं नुकसान भरपाईही होणं अवघड होऊन बसलं आहे. आधिच कोरोनामुळे देश व संपूर्ण समाजव्यवस्था व जनजीवन विस्खळीत झालं आहे त्यातूनच आपण सावरलो नाहीत. देशातील तरुणाईला आता खऱ्या जीवन जगण्याच्या कला शिकवणाऱ्या शिक्षणाची व ज्ञानमंदिराची मोठया प्रमाणात गरज आहे असं आवर्जून सांगावसं वाटतं व तरुणमंडळींवर व दीडजीबी वाल्यांवर सकारात्मक संस्कार व्हावेत व त्यांच्या मनावर आपण देशाचे भावी आधार आहोत याची जाणीव करुन देऊन तसे बिंबवावे अर्थात ही काळाची गरज आहेच.

 

- शंकर चव्हाण, ९९२१०४२४२२

 

Comments

  1. सत्य आणि वास्तव लिखाण केलंय .शंकरराव

    ReplyDelete

Post a Comment

दर्जेदार साहित्य वाचा :

साहेब ! मी शेतकरी बोलतोय …

आई माझी मायेचा सागर …

लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ हरवत चाललाय !

राहुल जोगदंडची “यशोगाथा” आनंदगाव ते दुबई जीवनप्रवास

लेडीज फस्ट मग ‘आई शेवटी का जेवते’ ?

चालक, वाहक व प्रवाशांसाठी थोडसं !

‘व्यसन एक फॅशन’

अै बाप पोरगं संभाळ ! शेंबडं खूनं करायलंय …

'यशाला' शॉर्टकट नाहीच !

आदर्श पत्रकार वसंत मुंडे यांची यशोगाथा