देश डिजिटल झाला पण शासकीय कार्यालयं मात्र जैसे थे!
देश डिजिटल झाला पण शासकीय कार्यालयं मात्र जैसे थे! अवघड कामे सोपे व्हावी म्हणून संगणक प्रणाली आपण दैनंदिन व्यवहारांमध्ये वापरत असतो. गणित असो वा विज्ञान तसेच मोठ्यात मोठी आकडेमोड असो अथवा गुंतागुंतीची कामं असो संगणक प्रणालीचा वापर करून अगदी सहज व सोप्या पद्धतीने कामं अगदी सुलभतेनं करता येतात. म्हणूनच देशाचे पंतप्रधान यांनी डिजिटल इंडिया चे स्वप्न पाहिलं व ते साकार करण्यासाठी, अंमलबजावणी करण्यासाठी त्यांनी त्यांच्या परीने संपूर्ण देशात तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी जनतेला आवाहन केले. जग स्मार्टफोनमुळे जवळपास डिजिटल झालंच आहे. देशात तंत्रज्ञानाचा उपयोग करून अनेक अवघड कामे सोपी झाली आहेत. डिजिटल इंडियामुळे जवळपास बँकिंग व्यवहार, माहितीची देवाण-घेवाण, ऑनलाईन बैठका, जनसंवाद इत्यादी काम अत्यंत जलद गतीने होत असतांना दिसत आहेत. ब्रिटिशांनी भारत देशामध्ये पहिले पाऊल ठेवले तेव्हापासून त्यांनी अनेक नियम अटी त्यांचे सोयीचे कायदे तयार करून ठेवले. आपल्या देशातील जनतेला स्वातंत्र्य मिळवून 73 वर्षे पूर्ण झाली तरीही हा देश मानसिक रित्या गुलामगिरीत जगतोय असं म्हटल...