देश डिजिटल झाला पण शासकीय कार्यालयं मात्र जैसे थे!

 देश डिजिटल झाला पण 

शासकीय कार्यालयं मात्र जैसे थे! 

अवघड कामे सोपे व्हावी म्हणून संगणक प्रणाली आपण दैनंदिन व्यवहारांमध्ये वापरत असतो. गणित असो वा विज्ञान तसेच मोठ्यात मोठी आकडेमोड असो अथवा गुंतागुंतीची कामं असो संगणक प्रणालीचा वापर करून अगदी सहज व सोप्या पद्धतीने कामं अगदी सुलभतेनं करता येतात. म्हणूनच देशाचे पंतप्रधान यांनी डिजिटल इंडिया चे स्वप्न पाहिलं व ते साकार करण्यासाठी, अंमलबजावणी करण्यासाठी त्यांनी त्यांच्या परीने संपूर्ण देशात तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी जनतेला आवाहन केले. जग स्मार्टफोनमुळे जवळपास डिजिटल झालंच आहे. देशात तंत्रज्ञानाचा उपयोग करून अनेक अवघड कामे सोपी झाली आहेत. डिजिटल इंडियामुळे  जवळपास बँकिंग व्यवहार, माहितीची देवाण-घेवाण, ऑनलाईन बैठका, जनसंवाद इत्यादी काम अत्यंत जलद गतीने होत असतांना दिसत आहेत. ब्रिटिशांनी भारत देशामध्ये पहिले पाऊल ठेवले तेव्हापासून त्यांनी अनेक नियम अटी त्यांचे सोयीचे कायदे तयार करून ठेवले.  आपल्या देशातील जनतेला स्वातंत्र्य मिळवून 73 वर्षे पूर्ण झाली तरीही हा देश मानसिक रित्या गुलामगिरीत जगतोय असं म्हटलं तर वावगं ठरू नये, कारण स्वतःची विवेकबुद्धी वापरून काम करण्याच तर सोडाच पण इतरांनी सांगितलेले चार चांगल्या गोष्टी आत्मसात करणं सुद्धा या देशातील जनतेला विश्वासनिय वाटत नाहीत. डोळ्यानं पाहिल्याशिवाय आणि कानाने ऐकल्याशिवाय कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नये असे म्हणतात, पण इथली लोकं स्वतः पेक्षा इतरांनी केलेल्या भाकीतावर  जास्त विश्वास ठेवतात. एकमेकांचे पाहून चढाओढ, बरोबरी, तुलना या गोष्टींकडे अनेकांचा कल असतो. कधीकधी तर आपल्या पूर्वजांनी मांडून ठेवलेल्या प्रथा परंपरेचा कसलाही विचार न करता तशाच पुढे चालू ठेवणे, पूर्वजांनी अर्थ नसलेल्या गोष्टींची आपण कसलाही विचार न करता पुनरावृत्ती करतो म्हणजे आपण आपल्या बुध्दीचा थोडाही वापर न करता पूर्ववत प्रथा पुढे चालू ठेवतो. एकदा एक ऋषी मुनी आश्रमात राहत होते त्यांना एक यज्ञ करायचं असतो. यज्ञ करण्यासाठी सर्व साहित्य एकत्र जमा करतात व यज्ञ करण्यासाठी तयार होतात व ध्यान लावून बसतात. ऋषिमुनींचे काही शिष्य त्यांच्या बरोबर असतात. आपले गुरू काय काय करतात याकडे त्यांचे बारीक लक्ष असते. यज्ञ सुरू असताना त्या आश्रमात ऋषिमुनींनी पाळलेली एका मांजराचे पिल्लू ध्यान करते समयी त्यांच्या यज्ञ प्रक्रियेमध्ये व्यत्यय आणण्याचे काम करत होते. त्या मांजराच्या पिल्लाला ऋषींनी यज्ञ प्रक्रियेमध्ये व्यत्यय आणत असल्यामुळे जवळच असलेल्या एका छोट्याशा झाडाला बांधून ठेवले. काही वर्षे उलटली यज्ञ करण्याची वेळ शिष्यांवर आली यज्ञ करण्यासाठी लागणारे सर्व साहित्य एकत्र जमा केले पण करताना त्यांच्याकडे मांजराचे पिल्लू नव्हते मांजराचे पिल्लू यज्ञ करण्यासाठी लागते म्हणून ते मांजराच्या शोधात गेले व एका मांजराचे पिल्लू पकडून आणून यज्ञ सुरू असलेल्या परिसरात जवळच छोट्याशा झाडाला बांधले, पण मांजराचे पिल्लू झाडाला का बांधून ठेवले हे शिष्यांना माहीत नव्हते. अर्थात मांजराचा आणि यज्ञाचा काहीच संबंध नव्हता तरीही शहानिशा न करता शिष्यांनी असे केले. बिनाकामाच्या अर्थ नसलेल्या गोष्टींना विज्ञानवादी युगात आपण प्रथा-परंपरा समजून पुढे चालवतो हा निव्वळ मूर्खपणा यातून स्पष्ट होतो. मांजराच्या पिल्लाने यज्ञ प्रक्रियेमध्ये व्यत्यय आणू नये म्हणून ऋषींनी त्याला यज्ञ करताना झाडाला बांधले होते. पण ते का बांधले हा विचार शिष्यांच्या डोक्यात आला असता तर त्यांची बौद्धिक दिवाळखोरी चव्हाटयावर आली नसती. या गोष्टीवरून सांगायचं एवढेच आहे की, डिजिटल तंत्रज्ञान आपल्या सर्वांसाठी वरदान आहे, त्याचा वापर केल्यामुळे दैनंदिन व्यवहारात त्याचा सकारात्मक व सोईस्कर परिणाम होतो, एकूणच कामात स्मार्टनेस येतो. हातात स्मार्ट फोन आला त्यामुळे माणूस स्मार्ट झाला, पण शासकीय कामांमध्ये डिजिटल प्रणाली असून सुद्धा नको असलेल्या बिनकामाच्या काही वरील गोष्टीतील प्रथेनुसार कामाच्या पद्धती नियमांची पुनरावृत्ती नेहमीच होत असते. हे कुठेतरी थांबले पाहिजे. देश डिजिटल झालाय पण अनेक शासकीय कार्यालयांमध्ये डिजिटल तंत्रज्ञान असूनही खरडपट्टीचा अवलंबून करून नको त्या गोष्टींना जास्त महत्व दिले जाते. छोट्या गोष्टीच्या संगणकाचा वापर न करता नोंदवहीमध्ये केला जातो. जिथे खरंच आवश्यक आहे तिथे नोंदवही चा वापर केला तर ते योग्य आहे, परंतु नको त्या ठिकाणी अमूल्य असा वेळ वाया घालून करण्यात येणाऱ्या नोंदी शेवटी निष्फळच. त्यामुळे देश डिजिटल झाला  पण शासकीय कार्यालयं मात्र आजही जैसेथेच आहे.

 - शंकर चव्हाण, 9921042422

hr.shankarchavan@gmail.com

Comments

  1. कटू सत्य आहे हे..

    ReplyDelete
  2. खूप छान मार्गदर्शन केले सर !🙏🙏🙏

    ReplyDelete

Post a Comment

दर्जेदार साहित्य वाचा :

साहेब ! मी शेतकरी बोलतोय …

आई माझी मायेचा सागर …

लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ हरवत चाललाय !

लेडीज फस्ट मग ‘आई शेवटी का जेवते’ ?

चालक, वाहक व प्रवाशांसाठी थोडसं !

राहुल जोगदंडची “यशोगाथा” आनंदगाव ते दुबई जीवनप्रवास

'यशाला' शॉर्टकट नाहीच !

आदर्श पत्रकार वसंत मुंडे यांची यशोगाथा

मैत्री पुस्तकांशी

लाखोंचा पोशिंदा जगलाच पाहिजे …..