कोणासाठी काहीतरी करायला हवं !
कोणासाठी काहीतरी करायला हवं ! भविष्यकाळ सुखाचा जावा म्हणून प्रत्येकजण वर्तमानकाळात अहोरात्र परिश्रम करत असतो, अनेक संकटांना सामोरे जाऊन दिवसेंदिवस संघर्ष करत असतो, परंतू जीवावर बेतलेल्या कोरोनासारख्या संकटामुळं व एकूणच सर्वच परिस्थितीमुळं जनजीवन विस्कळीत होऊनल छिन्न विछीन्न झालं आहे. काय करावं सुचत नाही, जगावर ओढावलेल्या संकटामुळे स्थिती व परिस्थिती एकूणच चिंतन करायला लावणारी बाब बनली आहे. असं असतांनाच तरुण पिढी, व्यापारी, रोजंदारी करुन उदरनिर्वाह करणारे, शेतकरी राजा सर्वच जनता हैराण आहेत. प्रत्येकाच्या घरचं आर्थिक गणित कोलमडलं आहे आणि अत्यंत दयनीय अवस्था अनेकांची झाली आहे. एवढं भयान वास्तव असतांना देखील तरुण पिढीसह अनेक हौशी त्या सोशल मिडीयावर व्यंग, अश्लिल, कॉमेडी, स्टंट व्हिडीओ तयार करुन प्रसिध्द करत आहेत व नकोत्या बाबींचा प्रसार व प्रचार करण्यात मग्न आहेत. दिवसाला दिडजीबी इंटरनेट डेटा मिळतोय म्हणून आपण कोण, कुठं चाललोय, आपल्याला जीवनात येऊन काय करायचंय हेच मुळात विसरुन गेले आहेत, फक्त आणि फक्त टाईमपास बस्सं !. जागतीक महामारी कोरोनासारख्या रोगामुळे गेल्या दीड वर्षापासून जी स...