कोणासाठी काहीतरी करायला हवं !

 कोणासाठी काहीतरी करायला हवं !

भविष्यकाळ सुखाचा जावा म्हणून प्रत्येकजण वर्तमानकाळात अहोरात्र परिश्रम करत असतो, अनेक संकटांना सामोरे जाऊन दिवसेंदिवस संघर्ष करत असतो, परंतू जीवावर बेतलेल्या कोरोनासारख्या संकटामुळं व एकूणच सर्वच परिस्थितीमुळं जनजीवन विस्कळीत होऊनल छिन्न विछीन्न झालं आहे. काय करावं सुचत नाही, जगावर ओढावलेल्या संकटामुळे स्थिती व परिस्थिती एकूणच चिंतन करायला लावणारी बाब बनली आहे. असं असतांनाच तरुण पिढी, व्यापारी, रोजंदारी करुन उदरनिर्वाह करणारे, शेतकरी राजा सर्वच जनता हैराण आहेत. प्रत्येकाच्या घरचं आर्थिक गणित कोलमडलं आहे आणि अत्यंत दयनीय अवस्था अनेकांची झाली आहे. एवढं भयान वास्तव असतांना देखील तरुण पिढीसह अनेक हौशी त्या सोशल मिडीयावर व्यंग, अश्लिल, कॉमेडी, स्टंट व्हिडीओ तयार करुन प्रसिध्द करत आहेत व नकोत्या बाबींचा प्रसार व प्रचार करण्यात मग्न आहेत. दिवसाला दिडजीबी इंटरनेट डेटा मिळतोय म्हणून आपण कोण, कुठं चाललोय, आपल्याला जीवनात येऊन काय करायचंय हेच मुळात विसरुन गेले आहेत, फक्त आणि फक्त टाईमपास बस्सं !. जागतीक महामारी कोरोनासारख्या रोगामुळे गेल्या दीड वर्षापासून जी स्थिती जगात आहे त्यामुळं अनेकांची संसारं उघडयावर येऊन उध्वस्थ झाले आहेत. भिका मागणं सुध्दा कठीण झालं आहे, कारण भिक देण्याइतपतसुध्दा अनेकांकडं पैसा नाही, पैशांअभावी अनेकांनी आत्महत्या केल्या, बेकारी वाढल्यामुळे अनेकजण आत्महत्येच्या वाटेवर आहेत, हळहळ व्यक्त करु नका तर मदतीचा ओघ सुरु करा कारण आपल्याला प्रत्येक मौल्यवान माणूस वाचवायचाच आहे. अनेकांचे रोजगार बुडाले, अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, जगभरामध्ये प्रत्येकांनी आपल्या जवळचं आपलं कोणी ना कोणी नातेवाईक या कठीण प्रसंगी गमावलं आहे, अतिशय दु:खद प्रसंग असल्यामुळे कोणासाठी काहीतरी करायला हवं ही भावना जागृत व्हायला पाहिजे. अनेकजण मदतीच्या आशेने आस लावून तुमच्या मदतीच्या अपेक्षेने वाट पहात बसलेले आहेत, कोणीतरी येईल व आपलं दु:ख दूर करेल, कोणीतरी येईल आपल्याला दोन वेळेचं जेवण देईल, कोणीतरी येईल व माझ्यावर ओढावलेलं आर्थिक संकट बाजूला करील अशा प्रकारच्या अनेक प्रश्नांचा तिढा सोडवण्यासाठी दानशुरांनी पुढं आलं पाहिजे व संकटात, विवंचनेत सापडलेल्यांना मदतीचा हात दिला पाहिजे. तसेच मानसिक आधार देऊन धीर दिला पाहिजे, ज्यांच्याकडं मुबलक पैसा आहे, धनदौलत आहे अशा दानशुरांनी दिनदुबळयांना गोरगरीबांना निस्वार्थ आर्थिक मदत केली पाहिजे. “मरावे परी किर्तीरुपी उरावे” असं म्हणतात. याप्रमाणे किर्तीवंत होऊन दानधर्म करुन पुण्य कमावले पाहिजे.  अनेकांचे रोजगार या लॉकडाऊन काळात गेले आहेत, तरुण वर्ग नोकरी गेल्यामुळे आर्थिक विवंचनेत आहे, त्यांना होताहोईल तेवढी मदत केली पाहिजे, अनेकांचे संसार हे व्यापार, रोजगार, मोलमजुरी करुन उदरनिर्वाह केला जातो अशांना सुध्दा मदतीचा हात देऊन त्यांच्या पाठीशी खंबीरपणाने उभं राहिलं पाहिजे. कोणीतरी महापुरूष येईल व सर्व संकटे दूर करील असे अनेकांचे डोळे त्या महापुरूष येण्याच्या वाटेकडे लागले आहेत, त्यामुळे आपणच त्या महापुरषाच्या रुपाने रुप धारण करुन मदतीचा हात पुढं करायला हवा. आपल्याकडं असलेली संपत्ती आपण मेल्यानंतर सोबत घेऊन जाणार नाही याचा विचार करुन जाता जाता आशिर्वाद व पुण्य सोबत न्या व किर्ती रुपी या पृथ्वीतलावर अजरामर व्हा अशी ओळख निर्माण करण्यासाठी मैदानात उतरा कारण, तुमची कोणालातरी अत्यंत गरज आहे, तुम्ही त्यांच्यासाठी देवच आहात. संपत्ती घरात ठेऊन वाढत नाही तर ती वाटल्याने आपली किर्ती महान होते, त्यामुळं तो माणूस किर्तीवंत होतो, अनेक महापुरषांच्या विचारावर चालणारी समाजात अनेकजण आहेत परंतू त्यांच्याकडे फक्त विचार आहेत पैसा नाही आणि ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांच्याकडे महापुरुषांचे प्रभावी विचार नाहीत अशी अडचण झाल्यामुळे पैसा पैशाच्या जागेवर व विचार विचारांच्या जागेवर स्थिर आहेत. पैशावाल्यांकडं खुपच पैसा आहे आणि ज्यांच्याकडं काहीच नाही अशांना विष विकत घ्यायला सुध्दा पैसे नाहीत हे वास्तव आहे. अहोरात्र जो कष्ट करतोय तो पिढयान पिढया कष्टच करतोय आणि फुकट मजा मारणारे मजा मारतांना पाहून मनाला अत्यंत वेदना होत आहेत, प्रामणिक वागणऱ्याच्या वाटेला फक्त आणि फक्त त्रास येतो आणि चुकीच्या विचारांचा जयजयकार. अशा परिस्थितीमुळे इंग्रज देशावर दीडशे वर्षे राज्य करुन गेले. गुलामीत जगणाऱ्यांना व्यक्ती स्वातंत्र्य मिळालं आहे म्हणून त्याचा योग्य वापर केला गेला पाहिजे परंतु परिस्थिती उलट झाली आहे. दिलेल्या स्वातंत्र्याचा अधिकाधिक दुरूपयोगच होत आहे, नियम व कायद्याचे तीनतेरा केले आहेत, लेखणी राजकारण्यांच्या दावणीला बांधली असल्याने धारदार लेखणीची धार बोथट झाली आहे हे किती मोठं दुर्देव म्हणावं लागेल. अशा परिस्थितीमध्ये अनेक कलावंत सुध्दा उपासमारीचे शिकार झाले आहेत. ट्रेंडच्या नावाखाली डोक्याच्या केसाच्या झिंज्या व दाढी वाढवून टपोरी पोरं हल्ली स्वत:ला डॉन समजायला लागले आहेत अशा वर्तणुकीमुळं पुढची पिढी चांगल्या विचारांपासून दुरावत आहे व अशा लोकांमुळं गुंड प्रवृत्तीला खतपाणी मिळत आहे. क्षणीक सुखासाठी अख्खी पिढी बरबाद होतांना उघडया डोळयांनी पहावत नाही. अशा व्यवस्थेला फाटा देऊन सर्वांनी स्वच्छ मनानं मदतीच्या रुपानं कोणासाठी काहीतरी करायला पाहिजे अशी भावना कर्तव्य म्हणून केली तर अनेकांवर उपासमारीचे वेळ येणार नाही व आर्थिक संकटाचा बोझा वाढणार नाही हे मात्र नक्की, बंधू आणि भगिनिंनो, येणाऱ्या काळात आपल्या सर्वांना एकमेकांना माणूसकी धर्माच्या नात्याने मदत करुन, सहकार्य करुन जीवन जगायचं आहे, लढायचं आहे. त्यामुळं मनामध्ये कुठंतरी माणुसकी शिल्लक ठेवा. येणारी पुढची पिढी सुसंस्कृत घडवायची आहे त्यासाठी तरी निदान प्रयत्नशिल रहा तुम्हा सर्वांकडून एवढीच अपेक्षा.

-          शंकर चव्हाण, महाराष्ट्र राज्य (9921042422)

Comments

  1. सद्यस्थिती अगदी योग्य आणि समर्पक शब्दांत अचूकपणे मांडली आहे आपण... यावर नक्की विचार करून ते प्रत्यक्षात आणण्याची गरज आहे... सुंदर लेख👌👌👌👍

    ReplyDelete
  2. Khup practical watl... Mst 💯

    ReplyDelete

Post a Comment

दर्जेदार साहित्य वाचा :

साहेब ! मी शेतकरी बोलतोय …

आई माझी मायेचा सागर …

लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ हरवत चाललाय !

राहुल जोगदंडची “यशोगाथा” आनंदगाव ते दुबई जीवनप्रवास

लेडीज फस्ट मग ‘आई शेवटी का जेवते’ ?

चालक, वाहक व प्रवाशांसाठी थोडसं !

‘व्यसन एक फॅशन’

अै बाप पोरगं संभाळ ! शेंबडं खूनं करायलंय …

'यशाला' शॉर्टकट नाहीच !

आदर्श पत्रकार वसंत मुंडे यांची यशोगाथा