बंड करा …
बंड करा …
तुम्ही
एखाद्या ठिकाणी कोणत्याही स्तरावर काम करत असाल तर तुम्हाला मानसिक त्रास हा होतोच.
हा कृत्रिम मनुष्यनियम झाला आहे. जीवघेण्या
स्पर्धेच्या व धकाधकीच्या जीवनात फास्ट फॉरवर्ड दुनियेत माणुसकी अजिबातच शिल्लक राहिली
नाही. जो तो मानसिक तणावात वावरत आहे. ज्याला त्याला मानसिक त्रासामधुन आपले जीवन जगावे
लागत आहे. जोतो वरिष्ठांचा, समाजातील विशिष्ठ व वरिष्ठ घटकांच्या दबावाखाली येऊन काम
करतो आहे. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक व इतर विविध क्षेत्रांमधील वाढत्या मानसिक दबावतंत्रामुळे
अनेकांनी आपली जीवनयात्रा संपवली. त्याचं कारण म्हणजे ते समाजामध्ये एडजस्ट झालेच नाही
व त्याचा परिणाम म्हणून मरण पत्कारलं. जीवनात काही लोकं तत्वनिष्ठ व स्वाभिमानी असतातात.
त्यांना समाजातल्या काही गोष्टी नेहमीच बोचत असतात, खटकत असतात. त्यामुळे अशा घोडयांचा
आणि समाजामधील कुविचारी गाढवांसोबत मुळीच ताळमेळ लागत नाही. त्यामुळे ते बंड करतात
व आपला स्वतंत्र रस्ता निवडून समाजापासून अलिप्त राहण्याचा प्रयत्न करतात. अनेक संस्था,
कंपन्या, शासकिय कार्यालयं, पक्ष इत्यादी ठिकाणी अनेकांना काम करतांना आपल्या वरिष्ठांकडून
मानसिक त्रास होत असतो. ते त्यांच्या पदाचा दुरूपयोग करुन मनमानी करतात व त्याचा त्रास
हा त्यांच्या अंतर्गत काम करणारांना निश्चितच होत असतो. त्यामुळे मानवी मनावर प्रत्यक्ष
अप्रत्यक्ष बरडन येणारच. अशा वेळेला अनेकजण चुप्पी करुन गप्प बसतात व त्रास देणारे
मात्र त्यांचा सपाटा चालूच ठेवतात. त्यामुळे त्यांना अशा प्रकारे वागण्यासाठी भरपूर
प्रमाणात उर्जा मिळते. म्हणून असे कोणासोबत होऊ नये आणि जर का कोणी विनाकारण त्रास
देत असेल तर बंड करा व त्याला तिथेच ठेचा. शाब्दीक, शारिरीरिक, मानसिक अथवा इतर माध्यमातून
का होईना वेळीच उत्तर द्या. विनाकारण कोणच्याही दबावाला बळी पडू नका. बंड करायला शिका
अन्यथा घोडयांऐवजी समाजातील त्या कुविचारी व इतरांना त्रास देण्याऱ्या मानसिकतेच्या
गाढवांमध्ये तुमचीसुध्दा गणणा केली जाईल. स्वाभिमानाने जगायला शिका. आपल्या परिवारातील
सदस्यांचा व समाजातील प्रत्येकाने प्रत्येकाचा सन्मान करायला शिकलं पाहिजे. समाजामध्ये
अनेक प्रवृत्तीचे लोक असतात. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती. त्यामुळे त्यांच्या नादी न
लागता काही वेळेला आपण जाऊदया म्हणून काही गोष्टी सोडून देतो व पाहून न पाहिल्यासारख्या
करतो मात्र अशा वेळेला समोरच्याची ताकद अधिकच वाढते व त्याला लगाम लागत नाही. एरवी
काही गोष्टींमध्ये वायफळ वेळ वाया घालवून आपण विनाकारण आपली उर्जा खर्च करतो. विनाकारण
वाया जाणाऱ्या उर्जेची बचत करुन अशा महत्वाच्या ठिकाणी त्याचा उपयोग करावा जेणेकरुन
मानसिक त्रासात व कोणाच्याही दबावाखाली येऊन काम करावं लागणार नाही. महत्वाचं म्हणजे
असं जगण्यापेक्षा बंड केलेला केंव्हाही उत्तमच. इतिहास साक्षीला आहे बंड केल्यामुळे
व अन्यायाविरोधात आवाज उठवल्यामुळे आज आपण स्वातंत्र्यामध्ये व सुखात दिवस काढतो आहोत
अन्यथा आजही आपण कोण्या एका इंग्राजाच्या घरी गुलामी करत असू. हे एक उदाहरण आहे पण
हे बंड केल्यामुळेच क्रांती घडू शकली हे सत्य आहे. पण बंड हा नेहमी चांगल्या कामासाठी
केला गेला पाहिजे. विनाकारण प्रत्येकवेळी बंड करणे म्हणजे मनमानी असणारी एक घाणेरडी
सवय होऊ शकते. त्यासाठी वेळ ओळखा, स्वत:ला ओळखा व स्वाभिमानाने जगा. एखादी हक्काची
गोष्ट व्यवस्थेकडून, समाजाकडून मिळत नसेल तर ती मिळवण्यासाठी प्राण एकवटून प्रयत्न
करा. जगाच्या पाठीवर अशी एकही गोष्टी नाही की ती अशक्य आहे. पृथ्वीतलावर सर्वच गोष्टी
शक्य आहेत फक्त त्यासाठी आपण प्रयत्नशिल रहायला हवं. बाळ रडल्याशिवाय आईला कसं कळणार
की त्या बाळाला भुक लागली आहे. हा निसर्गनियम आहे. म्हणूनच तुम्हाला तुमच्या आयुष्यात
महान कार्य करुन दाखवायचं असेल व यशाच्या शिखरावर पोहचायचं असेल तर त्या बाळासारखं
रडलं पाहिजे, हक्क मिळवला पाहिजे. निवांत हातावर
हात ठेऊन अन्याय सहन करत न बसता समाजात होणाऱ्या अन्यायाविरोधात, विनाकारण त्रास देणारांच्या
विरोधात हिम्मत करुन आवाज उठवलाच पाहिजे. उठा जागे व्हा व अन्यायाविरोधात व समाजामध्ये
विनाकारण होणाऱ्या त्रासाच्या विरोधात बंड करा.
- शंकर चव्हाण (महाराष्ट्र राज्य) 9921042422
Comments
Post a Comment