अै बाप पोरगं संभाळ ! शेंबडं खूनं करायलंय …
अै बाप पोरगं संभाळ ! शेंबडं खूनं करायलंय … सध्या देशाची मानसिक स्थिती अशी झाली आहे की , ट्रेंडच्या नावाखाली काहीही खपवलं जात आहे . काहीतरी नवीन कुरापती करायच्या व त्याला नवीन ट्रेंड आला म्हणून आपण साऱ्यांनी अशा बाबींना अगदी डोक्यावर घ्यायाचं . ट्रेंडींगच्या नावाखाली मग तो देशाचा , धर्माचा अपमान का असेना . देशप्रेम नाही , धर्मप्रेम नाही , आदर सन्मान नाही आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कायद्याचा धाक मुळीच नाही . ट्रेंडींच्या नावाखाली या ट्रेंडवाल्यांनी कायद्याच्या चौकटी मोडून त्याच्या शेकोट्या केंव्हाच केल्यात आणि शेकोटया करुन त्याची पार राखरांगोळी झाली हे मात्र अद्याप कोणाच्याही लक्षात आलंच नाही . अलीकडेच एका बारावीत शिकत असलेल्या शेंबडया पोरानं एका समवयस्क पोराला साऊथच्या सिनेमाच्या सिनप्रमाणे धारदार कोयत्याने भोसकले . त्यात त्याचा मृत्यू झाला . हे सगळे त्या ट्रेंडींग रिलचे व साऊथच्या सिनेमांमधील विकृत दृष्यांचे दुष्परीणाम आहेत यात शंक्काच नाही . ट्रेंडच्या नावाखाली काही महिला व मुलींनी रिल तयार करुन...