ऑटोमेशन इंजिनियर बालाजी शेषेराव चव्हाण या तरुणाचा "नांदगाव ते जर्मनी" संघर्षमय प्रवास
नांदगाव हे अंबाजोगाई तालुक्यातलं छोटसं खेडंगाव, खरं पाहिलं तर या तरुणाची ही एक विलक्षण यशोगाथा आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण ऑटोमेशन इंजिनियर बालाजी शेषेराव चव्हाण या तरुणाचा प्रवास संघर्षमय आहेच तेवढा. जीवनाच्या वाटेवर समस्यांचा सामना करत कठीण परिस्थितीवर मात करुन यशाचं शिखर गाठून त्यानं यशाला गवसणी घातली आहे. कारण केल्याने होत आहे रे आधि केलेची पाहिजे असं ब्रीदवाक्य आहे. यश मिळवण्यासाठी कसल्याही प्रकारचा शॉर्टकट पर्याय नसतो याचं ज्ञान बालाजी या तरुण अभियंत्याला ज्ञात होतं. त्यामुळं अगदी लहानपणापासूनच त्याची चिकाटी व जिद्दी स्वभाव असल्यामुळं एखादं काम हाती घेतलं की तो ते काम पूर्ण केल्याशिवाय शांत बसत नसे. कष्ट हेच भांडवल असतं या तत्वाला धरुन आयुष्यात पुढं वाटचाल करावी लागते याचं भान बालाजी या तरुणाला होतं. विदेशात जाण्याचं स्वप्न प्रत्येक तरुण तरुणींचं असतं पण ते स्वप्न साकार करण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते. तेव्हा कुठं ते स्वप्न प्रत्यक्षात साकार होतं, ते बालाजीनं आज पूर्ण केलं आहे याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे व तेवढाच त्यानं मिळविलेल्या या यशाबद्दल त...