ऑटोमेशन इंजिनियर बालाजी शेषेराव चव्हाण या तरुणाचा "नांदगाव ते जर्मनी" संघर्षमय प्रवास

 


नांदगाव हे अंबाजोगाई तालुक्यातलं छोटसं खेडंगाव, खरं पाहिलं तर या तरुणाची ही एक विलक्षण यशोगाथा आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण ऑटोमेशन इंजिनियर बालाजी शेषेराव चव्हाण या तरुणाचा प्रवास संघर्षमय आहेच तेवढा. जीवनाच्या वाटेवर समस्यांचा सामना करत कठीण परिस्थितीवर मात करुन यशाचं शिखर गाठून त्यानं यशाला गवसणी घातली आहे. कारण केल्याने होत आहे रे आधि केलेची पाहिजे असं ब्रीदवाक्य आहे. यश मिळवण्यासाठी कसल्याही प्रकारचा शॉर्टकट पर्याय नसतो याचं ज्ञान बालाजी या तरुण अभियंत्याला ज्ञात होतं. त्यामुळं अगदी लहानपणापासूनच त्याची चिकाटी व जिद्दी स्वभाव असल्यामुळं एखादं काम हाती घेतलं की तो ते काम पूर्ण केल्याशिवाय शांत बसत नसे. कष्ट हेच भांडवल असतं या तत्वाला धरुन आयुष्यात पुढं वाटचाल करावी लागते याचं भान बालाजी या तरुणाला होतं. विदेशात जाण्याचं स्वप्न प्रत्येक तरुण तरुणींचं असतं पण ते स्वप्न साकार करण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते. तेव्हा कुठं ते स्वप्न प्रत्यक्षात साकार होतं, ते बालाजीनं आज पूर्ण केलं आहे याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे व तेवढाच त्यानं मिळविलेल्या या यशाबद्दल त्याचा सर्वांना अभिमान वाटत आहे. विषय कोणताही असो बालाजीकडं त्याचं सोल्यूशन आहेच. अभियांत्रीकी या एकाच क्षेत्रात तो पारंगत नसून विविध इतर क्षेत्रातही त्यानं आपला ठसा उमटवला आहे. बालाजी याचे १ ली ते 6 वी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण जि.प. प्राथमिक शाळा नांदगाव येथे झाले. त्यानंतर तो 7 वी ते 10 पर्यंत श्री योगेश्वरी शिक्षण संस्थेचे योगेश्वरी नूतन विद्यालय अंबाजोगाई येथे शिकला. दहावी झाल्यानंतर टी.बी. गिरवलकर पॉलेटेक्नीक कॉलेजला इलेक्ट्रील इंजिनियरींगचा डिप्लोमा करुन त्यानं लगेच पुढील शिक्षणासाठी व नोकरीसाठी औरंगाबाद गाठलं. शाळेत असतांना बालाजी हा सर्वच शिक्षकांचा अगदी लाडका विद्यार्थी असायचा. अंबाजोगाई येथे माध्यमिक शिक्षण घेत असतांना वडीलांची इच्छा होती की घरात कोणी तरी संगीत क्षेत्रामध्ये असावं. बालजीनं वडीलांची तिही इच्छा पूर्ण केली. बालाजी तबला, पखवाज, ढोलकी वादनात पारंगत आहे. त्यानं विविध मोठया समारंभामध्ये, सांस्कृतीक कार्यक्रमांमध्ये अनेक दिग्गजांना तबल्याची साथ दिली आहे. कला क्षेत्राशी त्याची नाळ जुळलेली असल्यामुळे  त्याची कलेविषयी असणारी आवड यावरुन लक्षात येते. बालाजी यास लहाणपणी शाळेत, आई वडीलांनी किंवा नातेवाईकांनी जर विचारणा केली की, बालाजी मोठं झाल्यास तुला काय व्हायचंय ? तर तो म्हणायचा मला फौजदार व्हायचंय. घरची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट असतांना त्यानं डिप्लोमा इंजिनियरिंगचे शिक्षण घेतले व त्यानंतर त्यानं स्वत: नोकरी करत करत इंजिनियरींगची पदवी घेतली हा त्याचा खरा संघर्षमय प्रवासातला एक महत्वाचा टप्पा आहे असं म्हणता येईल. औरंगाबादला पहिल्यांदा नामांकित या कंपनीत काही काळ काम केल्यानंतर त्याने जागतिक स्तरावर नावाजलेली मल्टीनॅशनल कंपनीत ट्रेनी इंजिनियर म्हणून नोकरी केली. तिथं त्याने कौशल्याचा जोरावर लगेच ऐरोली मुंबई येथे त्याच कंपनीच्या प्लॅन्टवर प्रमोशनवर रुजू झाला. बालाजी आता ट्रेनी अंजिनियरचा एक्सीक्युटीव्ह इंजिनियर झाला होता. ट्रेनी इंजिनिअर म्हणून काम करत असतांना तुटपुंजा पगारावर घरगाडा चालवणे कठीण झाल्यामुळे, नोकरी करत करत इलेक्ट्रीकची कामे, मोटार रिवांयडींगचीसुध्दा कामे त्यानं करुन परीस्थितीवर मात केली. लहाणपणी तो घरात बिघाड झालेल्या इंलेक्ट्रीक वस्तू दुरुस्त करण्यात पारंगत होता. इतरांकडून माहिती घेऊन तो घरात काही बिघाड झालेल्या वस्तूंवर एक्सपेरीमेंट करुन तो लगेच दुरुस्त करत असत. वयाच्या 25 व्या वर्षी स्वत:चे पुणे रावेत येथे स्वत:चं हक्काचं घर व चारचाकी गाडीचा मालक झाला. त्याच्या आयुष्यात चांगल्या पगाराची नोकरी, बंगला व गाडी आली ही खुप कौतुकाची व अभिमानाची बाब आहे. शेतकरी आई व मजुर वडील यांचा मुलगा मोठा इंजिनियर झाला तेंव्हाच आई वडीलांचं स्वप्नं पूर्ण झाल होतं. प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर बालाजी जेंव्हा अंबाजोगाई येथे शिक्षणासाठी आला तेव्हा त्याच्या खाण्यापिण्यापासून सर्व इंतिजाम त्याची मोठी बहिण शितल करायची त्यावेळी बालाजीची आई नांदगाव या गावी असायची व वडील अंबाजोगाई येथे खाजगी नोकरीस होते, त्यावेळी बहिणच बालाजीचा आईप्रमाणे सांभाळ करायची ही बालाचीच्या यश संपादनाच्या संघर्षमय प्रवासाची एक भरीव बाजू आहे. बालाजी हा त्याच्या बहिणीमुळेच आज या यशाच्या शिखरावर पोहोचला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. बालाजीने विदेशात जायचं ठरवलं तेंव्हापासून अगदी दोन महिन्यातच जर्मनी येथे मोठया कंपनीत त्याला ॲटोमेशन इंजिनियर या पदावर नोकरी मिळाली व ब्ल्यूकार्ड महत्वाचा व्हीसासुध्दा मिळाला त्यामुळे त्याच्या पुढील आयुष्यातील त्याच्या परिवारासह सर्वच स्तरांतून कौतुकांचा व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्याच्या संर्घमय प्रवास संपला असून त्यानं यशाला आता गवसणी घातली आहे त्यामुळे पुढील आयुष्य हे जागतिक स्तरावर नाव मिळवण्यासाठी व देशाचे नाव उंचावण्यासाठी त्याला उज्वल अशी संधी मिळाली आहे, त्यानं या संधीचं सोनं करुन आपल्या गावाचे, तालुक्याचे, राज्याचे तसेच देशाचे नाव उंचावावे अशी भावना सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे.

-          शंकर चव्हाण, 9921042422

Comments

दर्जेदार साहित्य वाचा :

साहेब ! मी शेतकरी बोलतोय …

आई माझी मायेचा सागर …

लाखोंचा पोशिंदा जगलाच पाहिजे …..

मैत्री पुस्तकांशी

पुढारी बोलीव वजन वाढतंया ! ...

लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ हरवत चाललाय !

महाराष्ट्राचं भूषण द ग्रेट माऊंट एव्हरेस्टवीर कॅप्टन नंदकुमार जगताप सेना मेडल – दैनिक शिवजागर टीम

आदर्श पत्रकार वसंत मुंडे यांची यशोगाथा

'यशाला' शॉर्टकट नाहीच !

लेडीज फस्ट मग ‘आई शेवटी का जेवते’ ?